Offline Mode Sanch Manyata Circular
दिनांक :- 21 OCT 2024
विषय :- अंशतः अनुदानित तुकडया/शाखा असलेल्या उमावि / कमवि ची सन २०२४-२५ च्या ऑफलाईन संच मान्यते बाबत.
संदर्भ :- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे शासन निर्णय दि.१४.१०.२०२४
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, लातूर विभागातील उमावि कवि तील शैक्षणिक वर्षे २०२४-२५ साठी अंशतः अनुदानित तुकडया/शाखा असलेल्या कमवि/उमवि यांचे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्यासह ऑफलाईन संच मान्यता शिबीर खालील वेळापत्रका प्रमाणे आयोजित करण्यात आलेले आहे. प्राचार्य/मु.अ. यांनी शिबीरामध्ये उपस्थित राहुन २०२४-२५ ची ऑफलाईन संच मान्यता करून घ्यावी. संच मान्यता प्रपत्र अ मध्ये मागील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ व २०२३-२४ मधील मंजूर पदे नमुद करुन प्रारुप सादर करावे. तसेच प्रपत्र 'अ' 'ब' 'क' व कांही नवीन प्रपत्र संबंधित कार्यालयाकडून प्राप्त करुन घ्यावेत.
संच मान्यता प्रत डिसेंबर २०२४ च्या वेतनदेयका सोबत सादर करणे अनिवार्य आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये कोणीही संच मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करु नये, याउपरही प्रस्ताव सादर केल्यास ते स्विकारले जाणार नाहीत. सदर शिबीरात ज्या मु.अ./प्राचार्य यांनी संच मान्यता करुन घेतली नाही. व वाढीव अनुदान टप्पा पासून कर्मचारी वंचित राहील्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मु.अ./प्राचार्य यांची राहिल. तसेच सन २०२४- २५ ची संचमान्यता न केल्यास आपल्या उमावि/कमवि चे माहे डिसेंबर २०२४ पासूनचे वेतन थांबविण्यात येईल याची नोंद घ्यावी.
वेळापत्रक
अ.क्र जिल्हा दिनांक अनुदान प्रकार स्थळ
१ धाराशिव २८.११.२०२४ अंशतः अनुदानित श्रीपतराव भोसले उमावि धाराशिव
२ नांदेड २६.११.२०२४ अंशतः अनुदानित राजर्षी शाहू उमावि नांदेड
३ लातूर २७.११.२०२४
अंशतः अनुदानित बसवेश्वर महाविद्यालय लातूर
टिप :- प्रपत्र अ खालील डाव्या बाजुस उपलब्ध अभिलेख्यानुसार प्रारूप सादर असे लिहून खाली मु.अ./ प्राचार्य यांनी उमावि/कमविच्या शिक्कयासह स्वाक्षरी करावी. प्रपत्र ब च्या प्रत्येक पेजवर डाव्या बाजूस मु.अ./ प्राचार्य यांनी उमावि/कमविच्या शिक्कयासह स्वाक्षरी करावी.
संच मान्यतेस येताना सोबत जोडलेल्या अनुक्रमणिकेप्रमाणे कागदपत्रे व विहित प्रपत्रामध्ये माहिती भरुन सोबत आणावी. प्रस्तावाची संपूर्ण फाईल शिबीरामध्ये सादर करावी.
१. फक्त टप्पा वाढ अनुज्ञेय असणाऱ्या उमावि / कमवि यांनीच उपरोक्त तारखेस संच सादर करावेत.
२. सन २०२४-२५ साठीचा वैध आधार विद्यार्थी संख्या तक्ता सरल गोषवाऱ्यासह मुअ/प्राचार्य यांनी सांक्षाकित करून सादर करावा.
३. सर्वांनी सुधारित संच मान्यतेचे प्रपत्र अ व ब वापरावे.
४. प्रपत्र ब मध्ये विषयानुसार पदसंख्येसमोर वैयक्तिक मान्यता/सेवासातत्य असलेल्या कार्यरत शिक्षकांचे नावे लिहावीत. वैयक्तिक मान्यता / सेवासातत्य न मिळालेल्या किंवा मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केलेल्या सहशिक्षकाचे नाव लिहू नये. असे पद रिक्त पद म्हणून नमूद करावे.
५. सन २०१८-१९ च्या संचाप्रमाणे असलेली पदे ही पायाभूत पदे मानलेली असल्यामुळे त्यापेक्षा जास्तीची पदे संचामध्ये दर्शवू नये. प्रपत्र व मध्ये सन २०२४-२५ ची विद्यार्थी संख्या, विषय निहाय दर्शवून कार्यभार काढावा. मात्र पदसंख्येमध्ये बदल करु नये. सन २०२३-२४ च्या संच मध्ये मंजूर असलेली पदे नमूद करावीत.
६. सन २०१८-१९, सन २०२२-२३ व सन २०२३-२४ चा यापूर्वी प्रमाणित केलेला संच सादर करावा. संच मान्यतेस येताना प्रस्तावातील कागदपत्रे व विहित प्रपत्रे व्यतिरिक्त खालील प्रपत्राच्या जादा प्रती स्वतंत्रपणे दयाव्यात.
१. उमावि/कमवि ची माहिती प्रपत्र.
२. उमावि/कमवि तील एकूण प्रवेशित विद्यार्थी संख्या गोषवारा तक्ता.
३. उमावि/कमवितील एकूण कर्मचारी संख्या गोषवारा
४. रिक्त पदाचा तपशील
५. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहिती.
६. अनुदानित मध्ये कायम विना अनुदान तत्वावर चालू असलेल्या विषयाची माहिती.
७. वैध विद्यार्थी संख्या स्टुडंट पोर्टल अहवाल.
८. मागील वर्षात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षकांची नियुकती झाली असल्यास तशी नोंद संबंधित शिक्षकांच्या नावासमोर करावी व पुरावा जोडावा.
(डॉ. गणपत मोरे)
शिक्षण उपसंचालक लातूर विभाग लातूर
जा.क्र./शिउसं/ला/कार्या-२/२०२३-२४/7483 कार्यालय विभागीय शिक्षण उपसंचालक, लातूर विभाग लातूर.
दिनांक :- 21 OCT 2024
प्रति,
प्राचार्य/मुख्याध्यापक, उमावि/कमवि जिल्हा धाराशिव / लातूर/नांदेड.
Also read -
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता अनुदानित व अंशतः अनुदानित (२० टक्के व ४० टक्के) उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत
विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग, पुण
जा.क्र. शिउस/उमाशि/४०२/४०३/४०४/संच मान्यता / २९६१
संचमान्यता बेळापत्रक
प्रति,
प्राचार्य/प्राचार्या,
दिनांक 04 MAR 2024
सर्व कनिष्ठ महाविद्यालय/ उच्च माध्यमिक/ वरिष्ठ महाविद्यालय सलग्न कनिष्ठ महाविद्यालय, पुणे विभाग पुणे
विषय :- सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता अनुदानित व अंशतः अनुदानित (२० टक्के व ४० टक्के) उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत
संदर्भ : दि.१६.०२.२०२४ रोजी मा. सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई यांनी राज्य मंडळ पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये दिलेल्या सुचना
Also Read
दिनांक : ०२ ऑगस्ट, २०२४ स्टुडन्ट पोर्टलवरील मुख्याध्यापक लॉगीन मध्ये तुकड्यांचे व्यवस्थापन अपडेट करून घेणेबाबत.....
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणांस कळविण्यात येते की, सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करण्याबाबत दि.१६.०२.२०२४ च्या बैठकीमध्ये सुचित करण्यात आलेले आहे.
त्यानुषंगाने संच मान्यतेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. आपल्या जिल्हयातील तालुक्यांच्या दिनांका दिवशी आपण सकाळी १०.३० ते ६.०० यावेळेत उपस्थित राहुन आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता करुन घ्यावी.
टप्पा क्रमांक :-१
१. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांची पटपडताळणी सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक (माध्यमिक) जिल्हा परिषद पुणे/अहमदनगर/सोलापूर यांनी दिनांक ०७.०३.२०२४ पर्यंत आधार व्हॅलोड संख्येनुसार करण्यात यावी.
टप्पा क्रमांक :-२
१. संच मान्यतेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे संबधित जिल्हयाच्या सहा. शिक्षण उपनिरिक्षक
यांच्याकडून शासन निर्णयामध्ये दिलेल्या विहित नमुन्यातील अद्ययावत केलेले जनरल रजिस्टर प्रमाणे तपासुन घ्यावीत. व त्याचे प्रमाणपत्र संबधित सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक यांच्या स्वाक्षरीने प्रस्तावा सोबत सादर करावेत.
२. सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक यांनी शाखानिहाय / तुकडीनिहाय तपासलेली विद्यार्थी संख्या आणि सरल प्रणालीमध्ये नमुद केलेली विद्यार्थी संख्या एकसारखी असणे आवश्यक आहे.
३. संच मान्यतेसोबत शैक्षणिक वर्ष २०१३-१४,२०२१-२२ व २०२२-२३ ची संच मान्यतेची प्रत सादर करावी.
४. कनिष्ठ महाविद्यालयाचे शाखानिहाय वेळापत्रक सादर करावे.
५. विद्यार्थी निहाय/विषय निहाय शिक्षकांना दिलेला कार्यभाराचा तक्ता शिक्षकांच्या नावानिशी व प्रकारानिशी सादर करावा. (परिशिष्ट-अ). (सोबत विहित नमुना जोडलेला आहे).
६. माध्यमिक विभागाकडील कार्यभार देऊन उच्च माध्यमिककडील पदे पूर्णवेळ करु नयेत, त्याचप्रमाणे उच्च माध्यमिक विभागाकडील कार्यभार माध्यमिक विभागाकडे देऊ नये.
७ . प्रस्तावा सोबत विद्यार्थी संख्या (सरल प्रणाली २०२३-२४ च्या हार्ड कॉपीसह सादर करावी,
त्याशिवाय संच मान्यता केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
८. सन २०२३-२४ च्या संच मान्यतेसाठी सरळ प्रणालीमधील आधार व्हॅलिड विद्यार्थी संख्या धरुनच संचमान्यता करण्यात येणार असल्याने ऑनलाईन आधार व्हॅलिड रिपोर्ट सादर करणे बंधनकारक आहे.
९. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ची संच मान्यता बाबत, कॉलेज निहाय डाटा व सांख्यिकी माहिती शासनास हवी असल्यामुळे प्रत्यक्ष शिबीराच्या ठिकाणी संगणकावर ऑनलाईन माहिती भरुन त्यानंतरच संच मान्यता प्रत प्रिन्ट काढावी. त्याकरिता आवश्यक ती सर्व माहिती घेऊनच उपस्थित रहावे.
१० . शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये संस्थेचे कार्यरत असलेले संचालक मंडळ त्यांचा कार्यकाल, व मा.धर्मादाय
आयुक्त, यांचे परिशिष्ट अ ची साक्षांकित प्रत / बदल अहयाल (चॅन रिपोर्ट) प्रत सादर करावी.
११. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पूर्णयेळ/अर्थवेळ/प्र.प.ता नियुक्तीबाबत कोणताही याद/न्यायालयीन प्रकरण सुरु नसल्यायायतचे प्रमाणपत्र प्राचार्य यांनी सादर करावे,
१२ . शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पुर्णवेळ अर्धवेळ/प्र.प.ता नियुक्तीबाचत कोणताही याद/न्यायालयीन
प्रकरण सुरु असल्यास प्रकरण नियुक्ती/नियुक्ती रद्द करणेचावत / संचालक मंडळातील थादाबावत आहे, याची थोडक्यात माहितीची प्रत सादर करायी
१३. संस्थेत चाद असल्यास सादर फेरलेल्या प्रस्तावातील सर्व माहिती ही बिनचूक / बरोबर असल्यावाचत
प्राचार्य यांनी हमीपत्र सादर करावे, त्याचप्रमाणे संस्थेतोल यादामुळे प्राचार्य यांनी त्यांच्या अधिकारात केलेल्या सर्व नियुक्त्यांबाबत प्राचार्य व्यक्तिशः जबाबदार असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे.
१४. प्राचार्य यांनी सादर केलेल्या माहितीचायत भविष्यात काही न्यायालयीन प्रकरण/तक्रारी उद्भवल्यास त्यास प्राचार्य व्यक्तिशः जबाबदार असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे,
१५. शिबीराच्या ठिकाणी ऑनलाईन पध्दतीने तयार केलेली संच मान्यता प्रत तपासल्यानंतरच अंतिम प्रती ०४
काढण्याबायत आदेशित केले जाईल. (पटपडताळणी व संच मान्यतेसाठी ३० सप्टेंबर २०१३ चौ विद्यार्थी संख्या ग्राहय धरावी)
१६. माहे फेब्रुवारी २०२४ पेड इन मार्च २०२४ चे बेतन देयकाची प्रत सोबत आणावी, तसेच खालील प्रपत्र अ मधील माहिती अचूक भरुन प्राचार्यानी त्यांची पडताळणी करुन स्वाक्षरी व शिक्यासह सादर करावी.
अ.क्र.
प्रपत्र अ
इंडेक्स युडायस कनिष्ठ नंबर क्रमांक
संस्थेचे शिक्षकांचे
महाविद्यालयाचे नाव नाव नाव
अध्यापनाचा विषय
शिक्षकाचा संवर्ग
१७. संच मान्यतेस येताना प्राचार्य, लिपीक / संगणकीय ज्ञान असलेला कर्मचारी यांनी उपस्थित रहावे. अनावश्यक व्यक्ति किंवा कर्मचारी शिबीर ठिकाणी आणू नये. १८. ज्या वरिष्ठ महाविद्यालय/ माध्यमिक सलग्न कनिष्ठ महाविद्यालयात शिबीराचे आयोजन केलेले आहे, सदर
महाविद्यालय/कनिष्ठ महाविद्यालय आपणांस विविध सोई उपलब्ध करुन देतात, त्याचा योग्य आणि जबाबदारीने वापर करण्याची जबाबदारी (स्टेशनरी, संगणक, प्रिन्टर, इ.) प्राचार्य/लिपीक यांची राहील. १९. सोबत जोडलेल्या तपासणी सूची प्रमाणे संच मान्यता प्रस्ताव सादर करावा.
२०. संबधित कनिष्ठ महाविद्यालयाने संच मान्यतेच्या प्रतींची हार्ड कॉपी काढण्यासाठी ए-४ कागदाची व्यवस्था स्वतः करावी, ज्या कनिष्ठ महाविद्यालयात संच मान्यता शिबीर आहे, त्यांचेकडे ए-४ कागदांची मागणी करु नये.
पुणे- हिरवा, अहमदनगर-लाल, सोलापुर-पिवळा
संच मान्यता शिबीर २०२३-२४
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon