DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

SSC HSC EXAM 2025 DATE DECLARED दहावी बारावीच्या परीक्षा २०२५ तारखा केल्या जाहीर

SSC HSC EXAM 2025 DATE DECLARED

Maharashtra state Board EXAM 2025 SSC HSC Time Table 2025 Tentative EXAM DATES ANNOUNCED EXAM DATES RELEASED

Maharashtra state Board EXAM 2025 SSC HSC Time Table 2025 Tentative EXAM DATES ANNOUNCED EXAM DATES RELEASED

SSC HSC EXAM 2025 UPDATE

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra State board secondary and higher secondary education examination updates


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे

विषय - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) फेब्रु-मार्च २०२५ लेखी परीक्षा आयोजनाबाबत...

। । प्र क ट न । ।

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात आयोजित केल्या जातात. सदर परीक्षांचा ऑनलाईन निकाल अनुक्रमे मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येतो.

त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवडयापासून घेतली जाते.

विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचा सारासार विचार करता सन २०२५ ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी इ.१२वी व इ.१०वीची परीक्षा नेहमीपेक्षा ०८ ते १० दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखांना घेण्याचे नियोजित आहे.

१) तपशील
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासकम लेखी परीक्षा कालावधी मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी, २०२५ ते मंगळवार, दि. १८ मार्च २०२५

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२५ ते सोमवार, १० फेब्रुवारी २०२५

२)  तपशील
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा लेखी परीक्षा कालावधी शुक्रवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२५ ते सोमवार दि. १७ मार्च, २०२५

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी सोमवार, ०३ फेब्रुवारी २०२५ ते गुरूवार, २० फेब्रुवारी २०२५


शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या वरीलप्रमाणे नियोजित तारखा जाहीर करण्यात येत आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.

सदर तारखांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या शुक्रवार, दि.२३.०८.२०२४ पर्यंत 


या संकेत स्थळावर पाठवाव्यात. या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही.

उपरोक्त बाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

दिनांक : १२.०८.२०२४

(अनुराधा ओक) 
सचिव, राज्यमंडळ, पुणे ४.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) केली मोठी घोषणा दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मधील परीक्षांच्या संभाव्य तारखा केल्या जाहीर

(SSC HSC EXAM 2025 Tentative DATE DECLARED) 

    शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मधील परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात होणार तर बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात होणार आहे.  अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे प्रसिद्धीपत्रक जारी करुन माहिती देण्यात आली आहे.
    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई,कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात आयोजित केली जाते. 
    विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचा विचार करुन सन २०२५ ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावी आणि बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा १० ते १५ दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षा पुढील तारखांना घेण्याचे नियोजन असल्याचं मंडळाकडून सांगण्यात आले आहे. 

दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थातच इयत्ता १२ वी परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : 

मंगळवार, दिनांक ११ फेब्रुवारी, २०२५ ते मंगळवार, दिनांक १८ मार्च २०२५

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : 
शुक्रवार, दिनांक २४ जानेवारी २०२५ ते सोमवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२५

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र अर्थातच इयत्ता १० वी परीक्षा शुक्रवार, दिनांक २१ फेब्रुवारी, २०२५ ते सोमवार दि १७ मार्च, २०२५

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : सोमवार, दिनांक ०३ फेब्रुवारी २०२५ ते गुरूवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२५


सविस्तर वेळापत्रक नंतर होणार जाहीर

    शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसह विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या नियोजित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. 
    मंडळाने दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या २३ ऑगस्ट पर्यंत कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

MAHARSHTRA STATE BOARD SSC HSC EXAMINATION 2025 FINAL TIMETABLE DATE SHEDULE DECLARED 
महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षा २०२५ अंतिम वेळापत्रक जाहीर
SSC HSC EXAM ANTIM VELAPATRAK TIME TABLE

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon