DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Palak Shikshak Sangha Sthapna GR

Palak Shikshak Sangha Sthapna GR

प्राथमिक/माध्यमिक शाळेत पालक शिक्षक संघाची स्थापना मार्गदर्शक तत्वे

प्रस्तावना

प्राथमिक व माध्यमिकः शाळांच्या भौतिक, शैक्षणिक व विद्यार्थी विकासाच्या संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी व शालेय कामकाजामध्ये पालकांचा सक्रीय सहभाग व सहयोग वाढविण्यासाठी शासनाने शासन निर्णय क्र. एसएसएन-२६९६/प्र.क्र.६२२/माशि-२, दिनांक १६ मे, १९९६ अन्वये प्रत्येक मान्यताप्राप्त शाळेत पालक शिक्षक संघाची स्थापना करणे अनिवार्य केले आहे. माध्यमिक शाळा संहितेतील नियम क्र.३.२ मध्ये तद्नुषंगिक तरतूद करण्यात आली असून हे आदेश १९९६-९७ च्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात आले आहेत.

२. पालक शिक्षक संघाची रचना, स्वरुप, कर्तव्ये व शालेय कामकाजामध्ये स्थान ठरविण्यासाठी शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती. त्यात विविध व्यक्तींचा समावेश होता. त्या समितीने केलेल्या सूचना व शिफारशी विचारात घेऊन पालक शिक्षक संघाची रचना व कर्तव्ये याबाबत शासनाने शासन निर्णय क्र. एसएसएन-२६९६/प्र.क्र.६२२/माशि-२, दिनांक १८ ऑक्टोबर, १९९७ अन्वये सूचना दिल्या आहेत.

३. पालक शिक्षक संघाच्या संदर्भात "फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन" यांनी वाखल केलेल्या याचिका क्र. २२९७/९८ वर मा. मुंबई उच्च न्यायालय यांनी मार्गदर्शक तत्वे लागू करण्याबाबत आणि १ फेब्रुवारी, १९९९ रोजी निदेश दिलेले होते. त्या निदेशानुसार क्र. एसएसएन १०९९/(२७/९९)/माशि-२, दिनांक ९ एप्रिल, १९९९ अन्वये शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते.

शासन निर्णय

१. वरील शासन आदेशाची अंमलबजावणी काही शाळांमध्ये काटेकोरपणे केली जात नसल्याच्या तक्रारी शासनाकडे आलेल्या आहेत. याकरिता याबाबत शासनाने आतापर्यंत दिलेल्या वरील सर्व आदेशाकडे सर्व संबंधिताचे पुन्हा लक्ष वेधण्यात येत आहे व शासन निर्णय क्र. एसएसएन २६९६/प्र.क्र.६२२/माशि-२, दिनांक १८ ऑक्टोबर, १९९७ व शासन परिपत्रक क्र.एसएसएन १०९९/(२७/९९)/माशि-२, दिनांक ९ एप्रिल, १९९९ अधिक्रमित करुन यासंबंधी पुढीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत :-

(१) शाळेतील प्रत्येक विद्याथ्यांचे पालक संघटनेचे सभासद, अमतील

(२) शहरी भागात रुपये पाच व ग्रामीण भागात रुपये एक या बसने संघटनेच्या प्रत्येक सभासदाकडून दरवर्षी शिक्षण शुल्क घेण्यात यावे.

(३) राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक/माध्यमिक शाळेचे शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यापासून ३० दिवसांच्या आत पालक शिक्षक संघाची स्थापना करावी.

(४) पालक शिक्षक संघाची स्थापना झाल्यानंतर पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची निवड लोकशाही पध्दतीने दोन आठवडयात करावी. त्यासाठी घ्यावयाच्या बैठकीची सूचना सर्व संबंधितांना परिपत्रकाद्वारे एक आठवडा अगोदर देण्यात यावी..

(५) शिक्षणाधिकारी/ शिक्षण निरीक्षक हे प्रत्येक पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची निवड लोकशाही पध्दतीने होईल याची खात्री करतील.

(६) पालक शिक्षक संघांच्या कार्यकारी समितीची रचना पुढीलप्रमाणे राहील :-

अध्यक्ष - प्राचार्य/मुख्याध्यापक 

उपाध्यक्ष - पालकांमधून एक 

सचिव - शिक्षकांमधून एक

सह सचिव (२) - पालकांमधून एक व विद्यार्थ्यांमधून एक 

सदस्य पालकांमधून प्रत्येक तुकडीसाठी एक शिक्षक प्रत्येक तुकडीसाठी एक पालक (जेवढ्या तुकड्या तेवढे पालक सदस्य)

(७) पालक सदस्यांमध्ये किमान एक मागासवर्गीय पालक असावा. तसेच ५० टक्के महिला सदस्य असाव्यात.

(८) पालक शिक्षक संघाच्या प्रतिनिधीच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांच्या नावाची यादी शाळेच्या सूचना फलकावर प्रदर्शित करावी.

(९) सर्व प्राथमिक / माध्यमिक शाळांनी पालक शिक्षक संघाची स्थापना केल्यानंतर १५ दिवसांच्या आत सभासदांच्या नावाची यादी व कार्यकारी समितीच्या सदस्यांची यादी संबंधित शिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक यांच्याकडे सादर करावी.

(१०) पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची मुदत एक वर्ष राहील. कोणत्याही पालकास अथवा शिक्षकास एकदा सदस्य झाल्यानंतर त्यानंतरच्या पाच वर्षात पदाधिकारी होता येणारं नाही.

(११) कार्यकारी समितीची बैठक महिन्यातून एकदा घेण्यात यावी.

(१२) सर्व बैठकांची सूचना परिपत्रकाद्वारे विषयपत्रिकेसह सर्व सवस्थांना आगाऊ पाठवावी.

(१३) बैठकीचे स्वाक्षरीत इतिवृत्त नोंदवहीत ठेवून ती नोंदवही जतन करुन ठेवावी.

(१४) शाळांनी या उपक्रमासंबंधीच्या सूचनांसाठी एक स्वतंत्र सूचना पेटी उपलब्ध करुन द्यावी व ती शाळेत पालकांच्या दृष्टोत्पत्तीस येईल अशा भांगात लावावी.

(१५) पालक शिक्षक संघाबाबतची सर्व परिपत्रके, शासन निर्णय, उच्च न्यायालयाचे निर्णय, सूचना इत्यादि सर्व कागदपत्रे फलकावर प्रदर्शित करावीत.

(१६) पालक शिक्षक संघाची कर्तव्ये खालीलप्रमाणे असतील :-

१. नियोजनाप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण होईल हे पाहणे.

२. अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य त्या उपाययोजना सुचविणे. 

३. अभ्यासाशी पूरक असलेल्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यास शाळांना सहाय्य करणे.

४. सह शालेय उपक्रमांना मान्यता देणे.

५. विनाअनुदानित शाळातील शिक्षण शुल्क, सत्र फी व सह शालेय उपक्रमांसाठी आकारण्यांत येणाऱ्या शुल्कासंबंधी माहिती घेऊन नोंद घेणे.

(१८) पालक शिक्षक संघाचा मूळ उद्देश विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या सोडविणे हा आहे. पालक शिक्षक संघाने दैनंदिन कामकाज व प्रशासनात लक्ष घालणे अपेक्षित नाही.

२. हे आदेश निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी शिक्षक पालक संघाबाबत केलेली कारवाई ही शासन निर्णय क्र.एसएसएन-२६९६/प्र.क्र.६२२/माशि-२, दिनांक १८ ऑक्टोबर, १९९७ व शासन निर्णय क्र.एसएसएन-१०९९/(२७/९९) / माशि-२, दिनांक ९ एप्रिल, १९९९ नुसार करण्यात आल्याचे समजण्यात येईल.

३. पालक शिक्षक संघाची स्थापना करण्याबाबत मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निवेशानुसार शासनाने आवश्यक ते सर्व आदेश दिलेले आहेत. शासन आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे न केल्यास संबंधित शाळेच्या व्यवस्थापनास जबाबदार धरण्यात येईल आणि त्यांच्याविरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात येईल याची सर्व संबंधितांना जाणीव करून देण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

👉 उपरोक्त शासन निर्णय पीडीएफ मध्ये आपल्याला हवा असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करून डाऊनलोड करू शकता 👈 

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

Prathmik Madhyamik Shaha Palak Shikshak Sangha Sthapna Margdarshak Tatve

Guidelines for Establishment of Parent Teacher Association in Primary/Secondary School

महाराष्ट्र शासन शासन निर्णय क्रमांक : एसएसएम १०९९/ (२७/९९)/माशि-२ शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई 

दिनांक :- २२ मे, २०००.

संदर्भ : 

(१) शासन निर्णय क्र. एसएसएन-२६९६/प्र.क्र.६२२/माशि-२, विनांक १६ मे, १९९६.

(२) शासन निर्णय क्र. एसएसएम-२६९६/प्र.क्र.६२२/माशि-२, दिनांक ४ सप्टेंबर, १९९६.

(३) शासन निर्णय क्र. एसएसएन-२६९६/प्र.क्र.६२२/माशि-२, विनांक १८ ऑक्टोबर, १९९७.

(४) शासन परिपत्रक क्र. एसएसएन-१०९९/ (२७/९९)/माशि-२, दिनांक १ ए

प्रिल, १९९९


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon