DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

UDISE PLUS Import Students From Dropbox


UDISE PLUS Import Students From Dropbox


समग्र शिक्षा
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
जा.क्र.मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक /२०२४-२५/2551
दिनांक: 29 AUG 2024

प्रति,
१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.
२) शिक्षणाधिकारी / प्रशासनाधिकारी, महानगरपालिका, मुंबई.

विषयः सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करणेबाबत.

सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती अद्ययावत्त करण्याचे काम शाळा स्तरावर सुरू आहे. यु-डायस प्लस पोर्टलवरील दि. २२/०८/२०२४ च्या अहवालानुसार राज्यातील २६.२३९ एवढ्या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याचे काम बाकी आहे आणि यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शिक्षक य शाळांची माहिती भरणे बाकी आहे.
शाळेच्या मुख्याध्यापकांना यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरत असताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयामध्ये दि. ०६/०९/२०२४ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० या वेळात जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर व मनपाचे MIS-Coordinator यांची कार्यशाळा आयोजित केली आहे.
कार्यशाळेमध्ये पुढील मुद्यांवर आढावा घेण्यात येणार आहे-
• सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे Promotion चे काम पूर्ण करून घेणे.
• सन २०२३-२४ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये Dropbox मध्ये असलेले विद्यार्थी शून्य करणे,
• राज्य अभ्यासक्रम, CBSE Board, IB Board या शाळांचे शाळानिहाय वर्गीकरण, शाळा सुरू शैक्षणिक वर्ष दिनांक, शाळा शैक्षणिक वर्ष बंद दिनांक, शाळेचे माध्यम याची जिल्ह्यांचे सर्व यादी सादर करणे.
• शून्य विद्यार्थी, एक विद्यार्थी, दोन विद्यार्थी असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची खात्री करणे.
• शून्य शिक्षक, एक शिक्षक, दोन शिक्षक असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांचे आधार Validation पूर्ण करून घेणे,Performance Grading Index (PGI) संबंधित यु-डायस प्लरामधील खालील माहिती शाळांकडून अचूक नोंदवून घेणे.
सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आधार Validation.
द्विव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती.
आयसीटी, डिजिटल लायब्ररी, शाळांमधील संगणकीय साहित्य याबाबतची माहिती.
विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी व द्विव्यांग विद्यार्थ्यांकरिता असलेल्या स्वच्छतागृहांची माहिती.
इयत्ता १० वी व १२वी मधील विद्यार्थ्यांच्या निकालाची माहिती.
मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश उपलब्धतेची माहिली.
- व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती.
Library/Book Bank/Reding Comer, Sanitary Pad, Kitchen Garden, Rainwater Harvesting Facility, Drinking Water, Solar Panel इ. बाबतची माहिती.
शिक्षकांची व्यावसायिक व वैयक्तिक सर्व माहिती.
शाळा व्यवस्थापन समिती माहिती.
मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घेतलेल्या ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षणांची माहिती.
तरी उपरोक्त कार्यशाळेसाठी संगणक प्रोग्रामर य MIS-Coordinator यांनी कार्यशाळेसाठी पूर्ण वेळ लॅपटॉपसह उपस्थित राहण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशित करावे.


 (आर. विमला, ग..से.)
राज्य प्रकल्प संचालक,
म.प्र.शि.प., मुंबई.



UDISE PLUS/ Student Portal Today's New Update 2024

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग

निपुण भारत
समग्र शिक्षा

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

जा.क्र.मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/२०२४-२५/४११ 

दिनांक: 29 JUN 2324

प्रति,

१) आयुक्त, महानगरपालिका सर्व.

२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.

३) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.

विषयः यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये Dropbox मधील विद्यार्थी शाळांमध्ये Import करून घेणेबाबत. 
UDISE PLUS Import Students From Dropbox 


https://udiseplus.gov.in


संदर्भ : केंद्र शासनाकडून प्राप्त झालेला Dropbox अहवाल.

सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती अद्ययावत करण्याच्या अनुषंगाने भारत सरकारकडून यु-डायस प्लस प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

दि. २८ जून, २०२४ रोजीच्या यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार राज्यामध्ये २३,४७,३८६ एवढे विद्यार्थी Dropbox मधुन शाळांमध्ये Import करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. यावर्षी यु-डायस प्लसमध्ये कोणत्याही शाळेस इयत्ता २री ते इयत्ता १२वी पर्यंतच्या वर्गामध्ये New Entry करता येणार नाही. विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पध्दतीने माहिती Transfer करून दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश नोंदविता येईल.

शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळामध्ये विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश दिले असल्यास त्या विद्यार्थ्यांना नव्याने Entry न करता Dropbox मधुन विद्यार्थ्यांची माहिती त्वरीत Import करणे आवश्यक आहे. तरी प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या Dropbox मधील Active for Import Status असलेले विद्यार्थी तात्काळ Import करण्याच्या सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात, जेणेकरून Dropbox मधील विद्यार्थ्यांची संख्या शुन्य करता येईल.

⏬⏬⏬⏬⏬


⏫⏫⏫⏫⏫
सोबत : Dropbox Report.

(प्रदीपकुमार डांगे, भा.प्र.से.) 
राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon