DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

GPF Online Mode All Schools GR


Proceedings of GPF in all Schools through online mode

शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

महाराष्ट्र राज्य, पुणे

क्र. शिसंमा/२०२४/टी-७ / शालार्थ/भनिनि लेखे / 3602

दिनांक :- ०५/०७/२०२४.

अत्यंत महत्वाचे/तात्काळ

प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व

08 JUL 2024

२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, सर्व.

३) शिक्षण निरीक्षक, (उत्तर/दक्षिण/पश्चिम), मुंबई.

४) अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) सर्व,

विषयः- मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करणेबाबत

Regarding Online Provident Fund Proceedings applicable to teaching and non-teaching staff of recognized private aided primary, secondary, higher secondary and teaching schools

संदर्भ- शासन पत्र क्र. शालार्थ-११२१/प्र.क्र.४७/टिएनटी-३ दि. २४/०६/२०२४.

उपरोक्त विषयी व संदर्भीय शासनपत्राच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, भविष्य निर्वाह निधीचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेले आहे. परंतू अद्यापपर्यंत शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना पावत्या न मिळणे, ऑनलाईन लेखा अद्ययावत नसणे, बदली झालेल्या शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी लेखे वर्ग न होणे इत्यादी तक्रारींच्या अनुषंगाने भविष्य निर्वाह निधीचे लेखे अद्ययावत करून, पावत्या देणे, अग्रीम/परताव्याची देयके अदा करणे, बदली कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधी वर्ग करणे इत्यादी बाबी करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष कार्यशाळा आयोजित करून एक महिन्याच्या कालावधीत सर्व बाबींची पुर्तता करण्यात यावी.
🙋
👆👆👆👆👆

👆👆👆👆👆

विहित मुदतीनंतर शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे हे स्वतः (व्ही.सी. द्वारे) आढावा घेणार आहेत. विहित मुदतीत भविष्य निर्वाह निधीचे सर्व लेखे अद्ययावत न झाल्याचे दिसून आल्यास संबंधित जिल्हयातील संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, शिक्षण निरीक्षक मुंबई सर्व व अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) यांच्यावर जबाबदारी निश्चित करून म.ना.से. वर्तणूक नियम १९७९ नियम ३ प्रमाणे कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.


(डॉ. महेश पालकर) 
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
दालन क्र.४३९ (वि), चौथा मजला मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई


क्रमांक : शालार्थ ११२१/प्र.क्र.४७/टिएनटी ३

दिनांक : २४ जून, २०२४.

प्रति,

१. आयुक्त (शिक्षण), पुणे,

२. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

३. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषयः- मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाहीं ऑनलाइन पद्धतीने करणेबाबत

संदर्भ :- या कार्यासनाचा समक्रमांक दि. १७/०९/२०२१ चा शासन निर्णय.

उपरोक्त विषयाच्या संदर्भाधीन शासन निर्णयास अनुलक्षून कळविण्यात येते की, भविष्य निर्वाह निधींचे संपूर्ण कामकाज ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. परंतू याबाबत लोकप्रतिनिधी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून पावत्या न मिळणे, ऑनलाईन लेखा अद्ययावत नसणे, बदली झालेल्या शिक्षकांचे भनिनि लेखे वर्ग न होणे, तसेच ऑनलाईन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी असणे, ते अद्ययावत नसणे इ. तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. तरी सदर तक्रारींच्या अनुषंगाने भविष्य निर्वाह निधी प्रणालीचा आढावा घेऊन, त्यासंबंधीच्या अडचणी दूर करुन, भविष्य निर्वाह निधीचे लेख अद्यावत करणे, पावत्या देणे, अग्रीम् / परताव्याची देयके अदा करणे, बदली कर्मचाऱ्यांचे भनिनि वर्ग करणे, इ. बाबी करण्यासाठी क्षेत्रिय स्तरावर विशेष कार्यशाळा घेण्यात याव्यात.

(तुषार महाजन)
उप सचिवमहाराष्ट्र शासन,
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon