Mukhymantri Mazi Shala Sundar Shala Tappa Don Abhiyan
Mukhymantri Mazi Shala Sundar Shala Tappa Don Paritoshik
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२ या अभियानासाठी पारितोषिकाचा निधी वितरीत करण्यास मान्यता.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण २०२४/प्र.क्र.५२/एसडी-६ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक:- ०९ जानेवारी, २०२५
प्रस्तावना:-
संदर्भ क्र.०१ येथील दि.२६.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२ हे अभियान राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या अभियानांतर्गत सदर शासन निर्णयान्वये शासकीय शाळा व अन्य व्यवस्थापनांच्या शाळा या दोन्ही वर्गवारींकरिता स्वतंत्रपणे विविध स्तरांवरील विजेत्या शाळांसाठी रु.७३.८२ कोटी इतक्या रकमेची पारितोषिके प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हे अभियान पुर्ण झाले असून अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ दि.१४.१०.२०२४ रोजी संपन्न झाला आहे. सदर अभियानांतर्गत शासकीय शाळा व अन्य शाळा या दोन वर्गवारीतून स्वतंत्रपणे विविध स्तरावरील विजेता शाळांना पारितोषिकाची रक्कम प्रदान करण्यासाठी रु. ४९.८५ कोटी इतका निधी सं.क्र.४ येथील शासन निर्णयान्वये वितरीत केला असून उर्वरीत रु.२३.९७ (अक्षरी रु. तेवीस कोटी सत्यान्नव लक्ष) इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान टप्पा-२ अंतर्गत शासकीय शाळा व अन्य शाळा या दोन वर्गवारीतून स्वतंत्रपणे विविध स्तरावरील विजेता शाळांना पारितोषिकाची रक्कम प्रदान करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
२. या संदर्भात होणारा खर्च "मागणी क्र. ई-०२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०१ - प्राथमिक शिक्षण, १०१, शासकीय प्राथमिक शिक्षण, (००) (०१) राज्यात आदर्श शाळा विकसित करणे (कार्यक्रम) (२२०२ जे ०७२)
५०, इतर खर्च" या लेखाशिर्षाखालील सन २०२४-२५ च्या मंजूर तरतूदीमधून भागविण्यात यावा. यासाठी आयुक्त (शिक्षण) यांना नियंत्रक अधिकारी व लेखाधिकारी, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
५. सदरच अनुदान ज्या प्रयाजनासाठा मजूर व वितरात करण्यात आल आह त्याच प्रयाजनासाठा त खच करण्यात यावेत.
६. सदर अनुदान सशर्त असून त्याच्या अटी व शर्ती शासन निर्णयात नमूद करण्यात आल्या आहेत.
७. सदर शासन निर्णय नियोजन विभागाचा अनौपचारीक संदर्भ क्र. ४६९/२४, दि.२९.११.२०२४ तर वित्त विभागाचा अनौपचारीक संदर्भ क्र.१३८५/व्यय-५, दि.१९.१२.२०२४ व संदर्भ क्र.१४६७/व्यय-५, दि.२७.१२.२०२४ अन्वये प्राप्त झालेल्या त्या विभागांच्या सहमतीने तथा सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.
८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०१०९१६४१३००७२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
( तुषार महाजन) उप सचिव, महाराष्ट्र शासन
Also Read -
"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान टप्पा-२ सन २०२४-२५
प्रसिध्दीसाठी
विविध स्पर्धात्मक उपक्रमांवर आधारीत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अनोखे अभियान राज्यात मागील वर्षापासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. सन २०२३-२४ मध्ये या अभियानाचा पहिला टप्पा अत्यंत यशस्वी ठरला. सुमारे ९५ टक्के शाळांमधील विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते. यातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.
शासन निर्णय, दिनांक २६ जुलै, २०२४ अन्वये सन २०२४-२५ मध्ये देखील मागील वर्षीप्रमाणेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा-टप्पा २" हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २" हे अभियान दि.५ ऑगस्ट २०२४ ते दि.०६ सप्टेंबर २०२४ या कालावधी दरम्यान शाळांमध्ये राबविण्यात आले आहे. या उपक्रमास देखील शाळांनी व विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या वर्षीच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे ९८ हजार शाळांमधून सुमारे १ कोटी ९१ लाख विद्यार्थी तर सुमारे ६ लाख ६० हजार शिक्षक या अभियानाच्या विविध उपक्रमात सहभागी झाले होते. दुसऱ्या टप्यासाठी पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादणूक या प्रमूख घटकांवर आधारीत एकूण १५० गुणांचे विविध स्पर्धात्मक उपक्रम निश्चित करण्यात आले होते.
त्यानुसार शाळांचे प्रत्येक स्तरावर काटेकोरपणे समित्यांकडून मूल्यमापन होऊन या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय आणि खाजगी अशा दोन्ही वर्गवारीतून राज्य, विभाग आणि जिल्हा पातळीवरील विजेत्या शाळांची यादी आज जाहीर करण्यात आली असून या सर्व विजेत्या शाळांचे मंत्री श्री. दिपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे.
राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला ३१ लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला २१ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला २१ लाख, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला १५ लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला ११ लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेला ११ लाख, द्वितीय क्रमांकास पाच लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल. त्याचप्रमाणे तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख, द्वितीय क्रमांकासाठी दोन लाख आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटातून पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे या शाळेने तर खाजगी शाळा गटातून अकोला येथील प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा या शाळेने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. शालेय शिक्षण मंत्री मा. श्री. दिपक केसरकर यांनी याबाबतची घोषणा केली आहे. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक विजेत्या शाळांना प्रत्येकी ५१ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
राज्य पातळीवरील निवड झालेल्या प्रथम, व्दितीय व तृतीय तसेच ८ विभाग पातळीवर निवड झालेल्या प्रथम, व्दितीय व तृतीय व बृहन्मुंबई आणि मनपा गट-अ व व यांचे गटातून निवड झालेल्या प्रथम, व्दितीय व तृतीय अशा एकूण ६६ शाळांना पुरस्कार प्रदान कार्यक्रम राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री व मा. मंत्री (शालेय शिक्षण) महाराष्ट्र राज्य, यांचे हस्ते सोमवार, दिनांक १४ ऑक्टोबर, २०२४ रोजी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस (एनसीपीए), एनसीपीए मार्ग, नरिमन पॉईट. मुंबई ४०००२ येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
शाळांना विविध स्तरावर विविध गटातून दिल्या जाणा-या पुरस्कार रक्कमेचा तपशील सोबत जोडला आहे. तसेच शासकीय आणि खाजगी शाळा वर्गवारीतील राज्य आणि विभाग स्तरावरील विजेत्या ६६ शाळांची यादी सोबत जोडली आहे.
तरी सदर पत्रकास आपल्या स्तरावरुन जास्तीत जास्त प्रमाणात प्रसिध्दी देण्यात यावी.
55
Also Read -
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत, डॉअॅनी बेझंट रोड., पुणे
क्र.आशिका/मुमंअ/सुंदरशाळा/२०२४/ईगव्ह-१४३/
दि. /०८/२०२४
विषय : "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान टप्पा-२ राबविणेबाबत ..
संदर्भ : १. शासन निर्णय, क्रमांकः मुमंअ २०२४/प्र.क्र.५२/एसडी-६, दिनांक २६ जुलै, २०२४ २. या कार्यालयाचे सम क्रमांक जा.क्र. ४६४०, दिनांक २९/०७/२०२४
विषयांकित प्रकरणी, संदर्भ क्र.१ वरील शासन निर्णयान्वये सन २०२४-२५ मध्ये "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा- टप्पा २" हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. या कार्यालयाच्या संदर्भ क्र.२ वरील पत्रान्वये या बाबतच्या सविस्तर सूचना व शाळांनी माहिती भरणे व विविध स्तरावरील मूल्यांकन यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे.
२/- सदर अभियानांतर्गत राज्यातील शाळांमध्ये मोठया प्रमाणात उत्साह दिसून येत असून शाळांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत शाळांकडून विविध उत्तोमोत्तम उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे शिक्षक व विदयार्थी यांच्यामध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळत आहे. या सर्व बाबींचा होणारा सकारात्मक परिणाम विचारात घेऊन या अभियानामध्ये जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा यासाठी शाळांनी माहिती भरणे व विविध स्तरावरुन त्याचे मूल्यांकन करणेसाठी पुढीलप्रमाणे नव्याने वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे.
सुधारित शाळा मूल्यांकन वेळापत्रक :
अ) शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करण्याचा दिनांक ०२/०९/२०२४
ब) केंद्रस्तर : दि.१०/०८/२०२४ शनिवार (माहिती अंतिम झाली त्यांच्याकरीता) ते दि.०६/०९/२०२४ शुक्रवार सायं. ०५.०० वा. पर्यंत
क) तालुका : दि.१५/०८/२०२४ गुरुवार (केंद्र पातळीवरुन अंतिम झालेली) ते दि.०८/०९/२०२४ रविवार सायं.०५.०० वा. पर्यंत
ड) जिल्हा : दि. २०/०८/२०२४ मंगळवार (तालुका पातळीवरुन अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन) ते दि.११/०९/२०२४ बुधवार सायं. ०५.०० वा.पर्यत
इ) मनपा : दि. २०/०८/२०२४ मंगळवार (युआरसी पातळीवरुन अंतिम झालेल्यांचे मूल्यांकन) ते दि.११/०९/२०२४ बुधवार सायं. ०५.०० वा. पर्यत
ई) विभाग : दि. २५/०८/२०२४ रविवार ते दि.१५/०९/२०२४ रविवार सायं.०५.०० वा.पर्यंत
उ) राज्य : दि. ३०/०८/२०२४ शुक्रवार ते दि. १९/०९/२०२४ गुरुवार सायं. ०५.०० वा. पर्यंत
२. मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे वेळापत्रक :
३/- तरी, वरील सुधारित वेळापत्रकाप्रमाणे अभियान पूर्ण करण्यासाठी आपल्याकडून सर्व शाळांना सूचना वेळेत आपल्या क्षेत्रातील सर्व शाळांकडून वेळेत माहिती भरली जाऊन शासन निर्णयात नमूद समितीमार्फत त्याचे योग्य पध्दतीने मूल्यांकन केले जाईल यादृष्टीने कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी व अभियान यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.
(सूरज मांढरे, भा.प्र.से.)
आयुक्त (शिक्षण)
महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रति,
१) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
२) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, पुणे
३) शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, पुणे
४) शिक्षण संचालक (योजना), शिक्षण संचालनालय, पुणे
५) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
६) आयुक्त, मनपा (सर्व)
७) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
८) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
९) शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी, महानगरपालिका (सर्व)
१०) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना) जिल्हा परिषद (सर्व)
११) शिक्षण निरीक्षक (दक्षिण/पश्चिम/उत्तर) बृहन्मुंबई
१२) मुख्याधिकारी, नगरपालिका (सर्व)
१३) गटविकास अधिकारी, पंचायत समिती (सर्व)
हेही वाचाल
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत, डॉअॅनी बेझंट रोड., पुणे
क्र.आशिका/मुमंअ/सुंदरशाळा/२०२४/ईगव्ह-१४३/४६४०
दि१९/०७/२०२४
प्रति,
१) संचालक. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
२) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, पुणे
३) शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, पुणे
४) शिक्षण संचालक (योजना), शिक्षण संचालनालय, पुणे.
५) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
६) आयुक्त, मनपा (सर्व)
७) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
८) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
९) शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी, महानगरपालिका (सर्व)
१०) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना) जिल्हा परिषद (सर्व)
११) शिक्षण निरीक्षक (दक्षिण/पश्चिम/उत्तर) बृहन्मुंबई
१२) मुख्याधिकारी, नगरपालिका (सर्व) १३) गटविकास अधिकारी, पंचायत समिती (सर्व)
विषय : “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान टप्पा-२ राबविणेबाबत ..
संदर्भ : १. शासन निर्णय, क्रमांकः मुमंअ २०२३/प्र.क्र.११४/एसडी-६, दिनांक ३० नोव्हेंबर, २०२३ २. शासन निर्णय, क्रमांकः मुमंअ २०२४/प्र.क्र.५२/एसडी-६, दिनांक २६ जुलै, २०२४
विषयांकित प्रकरणी, संदर्भ क्र.१ वरील शासन निर्णयान्वये सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.०१.०१.२०२४ ते दि.१५.०२.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ कोटी पेक्षा अधिक विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झाली आहे. त्याबददल आपल्या सवांचे अभिनंदन !
२/- या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच शिक्षकांमध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले ही बाब अधिक महत्वाची आहे. विविध प्रकरचे चाकोरीबाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू होता व तो मोठ्या प्रमाणावर साध्य करता आला.३/- उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सन २०२४-२५ देखील "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २" हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबतचा संदर्भ क्र. २ वरील शासन निर्णयान्वये निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयान्वये अभियानाची व्याप्ती, अभियानाची उदिदष्टे नमूद करण्यात आलेली आहेत.
१. "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २" या अभियानाचा कालावधी दि.५ ऑगस्ट २०२४ से दि.०४ सप्टेंबर २०२४ या दरम्यान एक महिना कालावधीसाठी राहील,
२. शाळा मूल्यांकनासाठी अ) पायाभूत सुविधा ३३ गुण ब) शासन ध्येय धोरण अंमलबजावणी ७४ गुण क) शैक्षणिक संपादणूक ४३ गुण यानुसार एकूण १५० गुणांसाठी मूल्यांकन करण्यात येईल.
३. सोबत जोडलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल.
४. वरील संपूर्ण अभियान कार्यकाळात समिती बैठका आयोजन, शासन निर्णयाची अंमलबजावणी, शासनाच्या वेळोवेळी येणा-या सूचनांची अंमलबजावणी समिती अध्यक्षांच्या नेतृत्वात पूर्ण करणे निर्णयाची सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याची जबाबदारी सदस्य सचिव यांची राहील. नजिकच्या नियंत्रण अधिका-यांनी अभियानाच्या यशस्वीतेकरीता सर्वतोपरी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
५. अभियानाकरीता मंजूर करण्यात आलेला निधी कोषागारातून आहरित करणे, सर्व क्षेत्रिय कार्यालयांना आवश्यकतेनुसार आयुक्त यांचे मान्यतेने वितरित करणे, निधीचा विनियोग योग्य पध्दतीने होत आहे याची शहानिशा करणे शासनाकडून आवश्यक त्या निधीकरिता पाठपुरावा करणे या सर्व बाबींसाठी लेखाधिकारी, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी संचालक (प्राथमिक) यांच्या संनियंत्रणाखाली सदर कामकाज विहित मुदतीत पूर्ण करावे.
६. अभियानाची राज्य स्तरावरील व्यापक प्रचार-प्रसिध्दी सर्व घटकांपर्यंत करण्याबाबतची जबाबदारी संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांच्याकडे देण्यात येत आहे.
७. तालुका/जिल्हा/मनपा/विभाग स्तर व राज्य स्तरावरील कार्यालयांमध्ये अभियान कक्षाची निर्मिती करण्यात यावी. अनुक्रमे सदर जबाबदारी गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), प्रशासन अधिकारी (मनपा), विभागीय शिक्षाण उपसंचालक व राज्य स्तरावर सहसंचालक (अंदाज व नियोजन) यांची राहील.
८. अभियानाकरिता आवश्यक असणारे मनुष्यबळ घेण्याची मुभा सर्व स्तरावरील कार्यालय प्रमुख यांना असेल. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शालेय पोषण आहार, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक व अन्य विभागस्तरावर विविध शासकीय कार्यालय, उदा. राज्य विज्ञान संस्था, मिपा इ. यामधील मनुष्यबळ आवश्यकतेनुसार अधिनस्त कार्यालयास तथा विभागातील उपसंचालक यांच्या कार्यालयात घेण्याची परवानगी देण्यात येत आहे. या बाबत समन्वय अधिकारी म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक यांना नेमण्यात येत आहे. विभागीय उपसंचालक यांनी प्रकरणी दक्षतापूर्वक आवश्यक ते आदेश वेळोवेळी निर्गमित करावेत.
९. मूल्यांकन समितीने आवश्यकतेनुसार शाळा मूल्यांकनाची पध्दती प्रत्येक स्तरावर निश्चित करावी.
१०. 'सरल प्रणाली मधील शाळा (संकेतस्थळ) पोर्टलवर मूल्यांकनाकरीता व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक शाळा स्तरावर शाळा लॉगिनमध्ये या अभियानाच्या मूल्यांकनाची प्रश्नावली समोर पीडीएफ छायाचित्र व त्यासमोर शब्दांत विवरण नमूद करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यूजर मॅन्युअल (User Manual) तयार करुन ते संकेतस्थाळाबर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
११. वरीलप्रमाणे संपूर्ण उपक्रमाचे संनियंत्रण व उक्त घटकातील आपसातील समन्वय या बाबत दैनंदिन देखरेख ठेऊन कार्यक्रम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविला जाईल याची दक्षता घेणे तसेच या बाबत सर्व टिप्पण्या/लेखे/सांख्यिकी माहितों संकलित करणे/जतन करणे व यासंदर्भात मा. मंत्री कार्यालय/मा. प्रधान सचिव व कार्यालय व आयुक्त यांना दैनंदिन अहवालाव्दारे अवगत करणेसाठी शिक्षण उपसंचालक (मुख्यालय) यांना कार्यक्रम समन्वय अधिकारी म्हणून पदनिर्देशित करणेत येत आहे.
४/- या अभियानामध्ये शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणे, केंद्र स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, मनपा स्तर, विभाग रयानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करुन ते सोबत जोडले आहे. शासन निर्णय, दिनांक २६.०७.२०२४ स्तर, राज्य स्तर यानु अन्वये निश्चित केलेल्या मूल्यांकन समितीकडून शाळांचे मूल्यांकन दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करुन माहिती अंतिम करावयाची आहे.५/- सदर अभियान हे अत्यंत कालमर्यादित स्वरुपाचे असून त्याचा मा. मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येतो. त्यामुळे सोबत जोडलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थिती बदल केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच शाळांकडून वा इतर कोणत्याही स्तरावर एकदा भरलेली माहिती ही अंतिम असेल त्यामध्ये पुन्हा बदल करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही, याची देखील नोंद घ्यावी. या बाबत आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांना सूचित करावे.
वरीलप्रमाणे सोपविण्यात आलेल्या जबाबदारीनुसार व कार्यपध्दतीनुसार विहित वेळापत्रकाप्रामणे कामकाजाचे अचूक नियोजन करुन सदर टप्पा-२ अभियान हे यशस्वीरित्या पार पाडले जाईल याची सर्वांनी वैयक्तिकरित्या दक्षता घ्यावी.
(सूरज मा.मा.प्र.से.)
आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत, डॉअॅनी बेडांट रोड., पुणे ४११००१
दु.क्र.०२०-२६१२०१४१
ईमेल-educommoffice@gmail.com
"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२" अभियान
१. शाळा मूल्यांकन वेळापत्रक :
अ) शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करण्याचा शनिवार दिनांक १०/०८/२०२४ ते शुक्रवार दिनांक ३०/०८/२०२४
ब) केंद्र स्तर : दि.१०/०८/२०२४ शनिवार (माहिती अंतिम झाली त्यांच्याकरीता) ते दि.०२/०९/२०२४ सोमवार सायं. ०५.०० वाजेपर्यंत
क) तालुका : दि.१५/०८/२०२४ गुरुवार (केंद्र पातळीवरुन अंतिम झालेली) ते दि.०४/०९/२०२४ बुधवार सायं.०५.०० वाजेपर्यंत
ड) जिल्हा : दि.२०/०८/२०२४ मंगळवार (तालुका पातळीवरुन अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन) ते दि.०७/०९/२०२४ शनिवार सायं. ०५.०० वा.पर्यत
इ) मनपा : दि. २०/०८/२०२४ मंगळवार (युआरसी पातळीवरुन अंतिम झालेल्यांचे मूल्यांकन) ते दि.०७/०९/२०२४ शनिवार सायं.०५.०० वाजेपर्यत
ई) विभाग : दि.२५/०८/२०२४ रविवार ते दि.१०/०९/२०२४ मंगळवार सायं.०५.०० वाजेपर्यत
उ) राज्य : दि. ३०/०८/२०२४ शुक्रवार ते दि.१३/०९/२०२४ शुक्रवार सायं.०५.०० वाजेपर्यत
२. मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे वेळापत्रक -
अ.क्र.१.
२.
३.
४.
विवरण
मूल्यांकनाचा अंतिम दिनांक
स्तर समिती करीता लॉग इन सुविधा गो लाइव्ह
अ.क्र.१.केंद्र
०२/०९/२०२४
अ.क्र.१. केंद्रस्तर समिती
०८/०८/२०२४
अ.क्र.१.तालुका
०४/०९/२०२४
अ.क्र.१.तालुकास्तर समिती
१३/०८/२०२४
अ.क्र.१.मनपा/जिल्हा
०७/०९/२०२४
अ.क्र.१.मनपा/जिल्हास्तर समिती
१८/०८/२०२४
विभाग
राज्य
१०/०९/२०२४
विभागस्तर समिती
२३/०८/२०२४
५.
१३/०९/२०२४
राज्यस्तर समिती
२५/०८/२०२४
केंद्र सर्व : प्रत्येक सहभागी शाळांचे मूल्यांकन करणे अभिप्रेत आहे.
तालुका : प्रत्येक केंद्रातून प्रत्येक गटातून पहिली १ शाळा तालुक्याने मूल्यांकनासाठी घ्यावी, त्या मधून निवड होईल.
जिल्हा : तालुक्यातील पहिली १ शाळा प्रत्येक गटातून १ शाळा जिल्हा समितीने मूल्यांकन करावे, त्या मधून निवड होईल.
मनपा : युआरसीमधील पहिली १ शाहा प्रत्येक गटातून १ शाळा समितीने मूल्यांकन करावे, त्या मधून निवड होईल. विभाग: जिल्हयातील पहिली १ शाळा प्रत्येक गटा करीता मूल्यांकनासाठी घ्यावी, त्या मधून निवड होईल.
राज्यस्तर : प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांका मधील शाळांमधून प्रत्येक गटातील १ शाळा मुल्यांकनासाठी घ्यावी, त्या मधून निवड होईल.
Mukhymantri Mazi Shala Sundar Shala Tappa Don Abhiyan 2024-25 GR
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२' हे अभियान राबविणेबाबत.
दिनांक:- २६ जुलै, २०२४
प्रस्तावना :-
संदर्भाधीन शासन निर्णयान्वये सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.०१.०१.२०२४ ते दि.१५.०२.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.
या अभियानात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरुपात पारितोषिके देण्यात आली व या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्थापनास देण्यात आली. त्यामुळे या शाळांना तातडीच्या गरजा भागविण्याकरीता निधी उपलब्ध झाला. अर्थात या भौतिक फायद्यापेक्षा विद्यार्थ्यामध्ये तसेच शिक्षकांमध्ये एक प्रकारचे नवचैत्यन निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले ही बाब अधिक महत्वाची आहे. विविध प्रकरचे चाकोरीबाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू होता व तो मोठ्या प्रमाणावर साध्य करता आला.
उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सन २०२४-२५ देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २ हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनच्या विचाराधीन होता.
शासन निर्णयः-
🙋
⏬⏬⏬⏬⏬
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा संदर्भातले सर्व शासन निर्णय व परिपत्रके वाचण्यासाठी किंवा पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
१. अभियानाची व्याप्ती-:
i) राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे.
ii) या अभियानासाठी शाळांची विभागणी
अ) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व ब) उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे. याचा अर्थ प्राथमिक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांशी स्पर्धा करणार नाहीत. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल.
सदर अभियान अ) बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र ब) वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच क) उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर खालीलप्रमाणे राबविण्यात येईल.
२. अभियानाची उद्दिष्टे :-i) शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे.
ii) शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे.
iii) शालेय शिक्षणाच्या दृष्टीकोनातून सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे.
३. अभियानाचा कालावधीः-
i) दि. २९ जुलै ते दि.०४ ऑगस्ट, २०२४ हा कालावधी अभियानाच्या पूर्व तयारीसाठी असेल या कालावधीत अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचेल याची दक्षता आयुक्त (शिक्षण) यांच्या मार्गदर्शनानुसार विभागाच्या अधिकाधिक क्षेत्रीय कार्यालयांनी घ्यावी. सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी याबाबत सर्वतोपरी प्रयत्न या कालावधीत करण्यात यावेत.
ii) दि.५ ऑगस्ट २०२४ रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल व हे अभियान एक महिना कालावधीसाठी असेल दि.०४ सप्टेंबर २०२४ रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल.
दि.०५ सप्टेंबर २०२४ ते दि.१५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात यावी.
iv) त्यानंतरच्या सुयोग्य दिनांकास या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल.
४. अभियानाचे स्वरूपः-
४.१ अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येईल.
अ) पायाभूत सुविधा - ३३ गुण
ब) शासन ध्येय धोरण अंमलबजावणी - ७४ गुण
क) शैक्षणिक संपादणूक - ४३ गुण
अ) पायाभूत सुविधा - ३३ गुण
🌐 👉उर्वरित पुढील शासन निर्णय वाचण्यासाठी किंवा पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 👈
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः मुमंअ २०२४/प्र.क्र.५२/एसडी-६ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई
दिनांक:- २६ जुलै, २०२४
वाचाः- शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. मुमंअ-२०२३/प्र.क्र.११४/एसडी-६,
दि.३०.११.२०२३
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon