DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Students Aadhaar Link to Bank Account for NMMS Scholarship


https://www.dnyanyatritantrasnehi.com/2024/06/students-aadhaar-link-to-bank-account.html

Students Aadhaar Link to Bank Account for NMMS Scholarship on NSP Portal

जा.क्र. शिसंयो/संकीर्ण/शिष्यवृत्ती/२०२४/यो-४०३/1311

दिनांक : ६ जून, २०२४

NSP पोर्टलवरील NMMS शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे आधार बँक खात्याशी लिंक करणेबाबत.

उपरोक्त विषयाबाबत केंद्र शासनाच्या स्तरावर राबविण्यात येणाऱ्या NMMS शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व शिष्यवृत्तीचे अर्ज आधार क्रमांक बैंक खातेशी लिंक करणेबाबत केंद्र शासन व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करण्याबाबत विविध माध्यमाद्वारे आपणांस यापूर्वीही कळविण्यात आलेले आहे. त्यास अनुसरून उक्त विषयी जनजागृती करणे आवश्यक असल्याने NSP पोर्टलवरील NMMS शिष्यवृत्तीसाठी सन २०२३-२४ मध्ये ऑनलाईन अर्ज ज्या विदयार्थानी भरला आहे तसेच अर्जाची, शाळा व जिल्हा स्तरावरून पडताळणी पूर्ण झालेली आहे तरीही शिष्यवृत्तीची रक्कम जमा झालेली नसल्यास

१. सन २०२३-२४ पासून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम आधार नुसार दिली जाणार आहे, या साठी अर्जा मध्ये नोंद असलेल्या आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.

२. पालकांनी बँक मध्ये जावून आधार क्रमांक बँक खाते क्रमांकाशी लिंक करावे.

तसेच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये शिष्यवृत्ती जमा न होण्याची कारणे.

शिष्यवृत्ती अर्ज मधील आधार क्रमांक बैंक खात्याशी लिंक नसणे.

१. २. आधार क्रमांक बँके खात्याशी लिंक केले मात्र पुन्हा बँक खात्याशी लिंक काढून घेणे.

ज्या विदयार्थाचे आधार बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासणेसाठी NSP पोर्टलवर विद्यार्थ्यांचे लॉगीन करावे. तसेच महत्वाच्या मेनू मध्ये Aadhar seeding status या बटणांवर click करावे. status active असेल तर खाते लिंक आहे असे समजावे. तसेच शिष्यवृत्ती जमा झालेली आहे की नाही हे तपासण्यासाठी


या वेबसाईटवर payment मध्ये Track NSP payment मध्ये विद्यार्थ्यांच्या आय.डी. द्वारे तपासणी करावी.

उपरोक्त वस्तुस्थिती आपण आपल्या स्तरावरून आपल्या क्षेत्रिय कार्यालयांना कळवावे याबाबतची जनजागृती करण्याबाबत निर्देशित करण्यात यावे. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा.


(राजेश क्षीरसागर)

शिक्षण उपसंचालक (योजना) महाराष्ट्र राज्य,. पुणे-१

महाराष्ट्र शासन

https://www.dnyanyatritantrasnehi.com/2024/06/students-aadhaar-link-to-bank-account.html

शिक्षण संचालनालय (योजना), 
महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व
२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक योजना) जिल्हा परिषद सर्व
३. शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई
४. प्रशासन अधिकारी मनपा/नपा/नप सर्व
५. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon