RTE Admission Update
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दिनांक ०७/०६/२०२४ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीची निवड यादी व प्रतिक्षा यादी दिनांक २०/०७/२०२४ रोजी
या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवार दिनांक २२/०७/२०२४ पासून SMS जाण्यास सुरुवात होईल.
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई - RTE) 25 टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी लॉटरी (Lottery for RTE admission)काढण्यात आली.मात्र, काही शाळांनी आरटीईच्या जागांवर (RTE seats)विद्यार्थ्यांना प्रवेश दिले.त्यावर १२ व १३ जून रोजी न्यायालयात सुनावणी (Court hearing)होणार होती.परंतु, दोन्ही दिवशी सुनावणी होऊ शकली नाही.आता पुढील सुनावणी १८ जून रोजी आहे.त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी पालकांना आणखी काही दिवस वाट (Parents waiting for RTE admission)पहावी लागणार आहे.न्यायालयाच्या सुनावणीनंतरच प्रवेशाचा निर्णय घेतला जाणार आहे,असे सूत्रांनी सांगितले.
आरटीई प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. राज्यातील ९ हजार २१७ शाळांमधील १ लाख ५ हजार ३९९ जागांवरील प्रवेशासाठी २ लाख ४२ हजार ९७२ अर्ज आले आहेत.शिक्षण विभागातर्फे प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी काढली असली तरी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बालकांच्या पालकांना प्रवेशासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.कारण काही शाळा न्यायालयात गेल्या आहेत.या शाळांनी आरटीई २५ टक्के राखीव जागांवर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत.त्यामुळे शाळांच्या प्रवेशाचे काय करावे? असा प्रश्न निर्माण झाला.त्यावर १२ जून रोजी सुनावणी घेतली जाणार होती.परंतु,काही कारणास्तव ही सुनावणी होऊ शकली नाही.दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ जून रोजी सुनावणी होईल,अशी अपेक्षा होती.परंतु,आजही सुनावणी झाली नाही.आता ही सुनावणी येत्या १८ जून रोजी होणार आहे,असे एका याचिकाकर्त्याने सांगितले.
शासनाने पूर्वी केवळ शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राधान्यायाने आरटीईचा प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता.मात्र,न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली.परिणामी शासनाला मागील वर्षाप्रमाणे केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया नव्याने राबवावी लागली.दरम्यान, या प्रकरणी आणखी काही याचिका न्यायालयात दाखल झाल्या.परंतु,त्यावर सुनावणी झाली नाही.आता १८ जून रोजी होणाऱ्या सुनावणी होईल. या सुनावणीनंतर ऑनलाईन लॉटरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील.त्यामुळे पालकांना १८ जूनपर्यंत प्रवेशासाठी वाट पहावी लागणार आहे.
Also Read 👇
RTE 25 Percent Admission Process Online Lottery Year 2024-25
महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय,
पुणे
महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय,
पुणे
जा.क्र./प्राशिसं/आरटीई-८०१/२०२४/३९६३
दिनांक: ०६/०६/२०२४
प्रति.
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई. मनपा.
३) शिक्षण निरिक्षक बृहन्मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)
४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई. मनपा.
३) शिक्षण निरिक्षक बृहन्मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)
४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.
विषय : आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सोडत सन २०२४-२५
RTE 25 Percent Admission Process Online Lottery Year 2024-25
RTE 25 Percent Admission Process Online Lottery Year 2024-25
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रीया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) शुक्रवार दिनांक ०७/०६/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात येणार आहे. सदर सोडतीचे थेट प्रक्षेपण व्ही.सी द्वारे करण्यात येणार आहे. आपणास ऑनलाईन या कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता
लिक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर कार्यक्रमास आपल्या स्तरावरुन व्यापक स्वरुपात मोफत प्रसिध्दी देण्यात यावी.
(देविदास कुलाळ)
शिक्षण सहसंचालक (प्राथमिक),
शिक्षण सहसंचालक (प्राथमिक),
शिक्षण संचालनालय,पुणे-१
प्रत माहीतीस्तव सविनय सादर :
१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२) मा. आयुक्त (शिक्षण) म.रा. पुणे.
प्रत :- तांत्रिक संचालक, एन आय सी पुणे यांना माहिती व योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.
१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२) मा. आयुक्त (शिक्षण) म.रा. पुणे.
प्रत :- तांत्रिक संचालक, एन आय सी पुणे यांना माहिती व योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon