DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Class 2 Transferable Officers List Released


अधिकारी गट ब (राजपत्रित) संवर्ग नियतकालिक बदल्या

महाराष्ट्र शासन वित्त विभाग
संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई कस्तुरी इमारत, तळ मजला, पेट्रोलियम हाऊस समोर, चर्चगेट, मुंबई

क्र.संलेको २०२४/प्रशा-राप-सलेअ/प्रशासकीय बदली २०२४/६३०

दिनांक :-३१-०८-२०२४

विषय :- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहाय्यक लेखा अधिकारी गट ब (राजपत्रित) संवर्ग नियतकालिक बदल्या.

संदर्भ

:- १. सामान्य प्रशासन विभाग शासन अधिसूचना क्र. एसआरव्ही. २००४/प्र.क्र. १५/०४/१२ दि.२५.०५.२००६

२. वित्त विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१४/प्र.क्र.१३१/कोषा प्रशा-३, दि. ३०.०५.२०१५

३. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. एसआरव्ही-२०१७/प्र.क्र.४१७/कार्यासन १२, दिनांक.०९.०४.२०१८

४. शासन वित्त विभाग, परिपत्रक क्र. संलेको २०१८/प्र.क.३५/कोषा प्रशा-२, दि.२०.०४.२०१८

५. सामान्य प्रशासन विभाग शासन अधिसुचना क्र. एसआरव्ही-२०२०/प्र.क्र.४९/कार्या-१२, दि.१४.०७.२०२१.

६. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय २०१७/प्र.क्र.४१५/कार्या १२ दि.२१.११.२०२२

७. संचालनालयाचे परिपत्रक क्र. संलेको-०८-२०२४/प्रशा-राप-सलेअ/टिस-२/प्रशा बदली/६२७दि.२८.०८.२०२४

८. सामान्य प्रशासन विभाग यांची दि.२९.०८.२०२४ ची अधिसूचना

-: आदेश :-

शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील तरतूदींनुसार व संदर्भ क्र.२ मधील शासन निर्णयान्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहाय्यक लेखा अधिकारी गट-ब (राजपत्रित) संवर्गातील कार्यरत असलेल्या खालील विवरणपत्रातील स्तंभ क्र.२ मध्ये नमूद अधिकाऱ्यांच्या स्तंभ क्र.३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नियतकालीक बदल्या करण्यात येत आहेत.

अ.क्र.
सहाय्यक लेखा अधिकाऱ्याचे नाव व कार्यालय
बदली करण्यात येत असलेले पद, कार्यालय व ठिकाण
रकाना क्र.३ मधील पद उपलब्ध होण्याचे कारण


🌐 👉अधिक माहितीसाठी यादी पहा किंवा पीडीएफ मध्ये डाऊनलोड करा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा 👈

Also Read 👇 

MH Edu Service Class 2 List of Transferable Officers and List of Vacancies Released

Maharashtra Education Service Group-B List of Transferable Officers and List of Vacancies Released

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब मधील बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी व रिक्त पदांची यादी प्रसिद्ध

महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा), (शिक्षण सक्षमीकरण शाखा) व सामान्य राज्य सेवा (प्रशासन शाखा) गट-ब मधील बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी व रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करणे.

महाराष्ट्र शासन 
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 
शासन निर्णय क्रमांकः बदली ३१२४/प्र.क्र.०२/प्रशा-२ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०००३२ 
दिनांक : ०४ जून, २०२४.

वाचा :- 

१) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५

२) सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय क्र.: एसआरव्ही-२०१७/प्र.क्र.४१५/कार्या.१२. दिनांक ०९ एप्रिल, २०१८

प्रस्तावना -

सामान्य प्रशासन विभागाने दिनांक ०९.०४.२०१८ च्या शासन निर्णयाद्वारे गट-ब चे अधिकारी तसेच गट-क व ड मधील कर्मचारी यांना समुपदेशनाद्वारे बदलीबाबतचे धोरण लागू केले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ०९.०४.२०१८ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे बदलीबाबतची प्रक्रिया पार पाडावयाची आहे. त्यानुसार रिक्त पदांची यादी व बदली पात्र अधिकाऱ्यांची यादी प्रसिध्द करण्यासाठी व बदलीपात्र अधिकाऱ्यांकडून पसंती मागविण्यासाठी पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय-

शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र शिक्षण सेवा व सामान्य राज्य सेवा (प्रशासन शाखा)/शिक्षण सक्षमीकरण शाखा, गट ब मधील खालील संवर्गातील बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी व रिक्त पदांची यादी या शासन निर्णयासोबत जोडण्यात येत आहे.


२. तरी बदलीपात्र अधिकाऱ्यांनी विवरणपत्र-१ नुसार विहित केलेल्या नमुन्यामध्ये पसंतीक्रमाची माहिती आयुक्त शिक्षण यांच्याकडे दिनांक ०७ जून, २०२४ पर्यंत न चुकता सादर करावी. आयुक्त शिक्षण कार्यालयाने पसंतीक्रमासह एकत्रित माहिती दिनांक १२ जून, २०२४ रोजी शालेय शिक्षण विभागाकडे सादर करावी.

३. या विभागाच्या अधिपत्याखालील गट-ब मधील ज्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी विनंती अर्ज सादर केले आहेत, ते विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच दिनांक ०७ जून, २०२४ पर्यंत जे अधिकारी आयुक्त (शिक्षण) यांच्याकडे पसंतीक्रम देणार नाहीत अशा अधिकाऱ्यांना प्रशासनाच्या रिक्त पद मरण्याच्या निकडीनुसार पदस्थापना दिली जाईल. तसेच असे अधिकारी पदस्थापनेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत मुदतपूर्व बदलीसाठी अर्ज करू शकणार नाहीत. तसेच अशा अधिकाऱ्यांनी विनंती अर्ज सादर केल्यास ते विचारात घेतले जाणार नाहीत.

जे अधिकारी प्राधान्यक्रम नमूद करतील त्यांनी त्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र व कागदपत्रांचे पुरावे जोडणे आवश्यक आहे. सदर पुरावे जोडले नसल्यास अशा अधिकाऱ्यांचे प्राधान्यक्रम विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच पसंतीचे प्राधान्यक्रम नमूद करतांना संबंधित अधिकाऱ्यास महसूल विभाग वाटप नियम लागू असल्यास अशा अधिकाऱ्यांनी त्यांना वाटप केलेल्या महसूल विभागातील रिक्त पदे विचारात घेवून पसंतीक्रम सादर करावे. ज्या बदलीपात्र अधिकाऱ्यांना महसूली विभाग वाटप नियम लागू आहे अशा अधिकाऱ्यांना त्यांना वाटप केलेल्या महसुली विभागाबाहेरची पसंती दिल्यास ती विचारात घेतली जाणार नाही.

४. सदर बदलीपात्र अधिकाऱ्यांच्या यादीत अधिकाऱ्यांची नावे अथवा रिक्त पदे यामध्ये काही बदल / तफावत आढळल्यास शिक्षण आयुक्तालय, पुणे या कार्यालयाकडे कळविण्यात यावे.

⬇️⬇️⬇️⬇️⬇️


५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०६०४१५००००३२२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

VUAY NIVRUTTI BHOSALE

सोबत - प्रपत्र आणि विवरणपत्र

(विजय भोसले) अवर सचिव, महाराष्ट्र शासन
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon