Dearness Allowances Increase 4 Percent
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जुलै, २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत.
दिनांक : २५ फेब्रुवारी, २०२५
वाचा -
भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभाग कार्यालयीन ज्ञापन
क्रमांक: १/५/२०२४-इ.।। (बी), दिनांक २१ ऑक्टोंबर, २०२४
शासन निर्णय
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.
२. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जुलै, २०२४ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ५०% वरुन ५३% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२४ ते दिनांक ३१ जानेवारी, २०२५ या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी, २०२५ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.
४. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०२२५१५५३३५८४०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
उप सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
शासन निर्णय क्रमांकः मभवा-१३२४/प्र. क्र.३४/सेवा-९, मंत्रालय, मुंबई
पगारात किती वाढ होणार तपासा ?
निर्मिती - शरद देशमुख राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक
GO⏬
ही महागाई भत्ता वाढ जुलै २०२४ पासून लागू होणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना ५० टक्के दराने महागाई भत्ता मिळतो. मात्र आता यामध्ये तीन टक्क्यांची वाढला आहे.
आज आपण कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढल्यानंतर त्यांच्या पगारात किती वाढ होणार?
पगारात किती वाढ होणार?
Also Read -
DA Increase in Four Percent
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, मध्यवर्तीइमारत,पुणे
क्र. शिसंमा/२०२४/टि-७/महागाई भत्ता / 3796 महत्वाचे
प्रति,
१) विभागीयशिक्षण उपसंचालक, (सर्व)
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. (सर्व)
३) शिक्षणनिरीक्षक, (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई
४) अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (माध्यमिक) (सर्व)
दिनांक :- १५/०७/२०२४. १६ 16 JUL 2024
विषय :- सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणा-या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन संरचनेत (६ व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणा-या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा- यांना मंजूर करण्यात येणा-या महागाई भत्त्याच्या दरात दि. ०१ जानेवारी २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत. व अनुज्ञेय महागाई भत्त्याची थकबाकी देण्यातबाबत.
संदर्भ :-
१) शासन पत्र क्र. संकीर्ण २४१९/(४२/१९)/ अर्थसंकल्प दि. १२ जूलै, २०२४.
२) मा. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. अंदाज-१८४/म. भत्ता/२४/४३४७ दि. १५/०७/२०२४.
उपरोक्त विषयी संदर्भ क्र. १ व २ चे पत्र सोबत जोडून पाठविण्यात येत आहे. (प्रत संलग्न)
उपरोक्त विषयी संदर्भीय शासन पत्रान्वये व मा. आयुक्त (शिक्षण) कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार तात्काळ आवश्यक
ती कार्यवाही करावी. व केलेल्या कार्यवाहीबाबत या कार्यालयास अवगत करावे.
मा. शिक्षण संचालक यांचे मान्यतेने.
(दिपक चवणे)
शिक्षण उपसंचालक
(अंदाज व नियोजन)
हेही वाचाल 👇
जा.क्र. अंदाज - १८४/म.भत्ता/२४/४३४७
दिनांक १२.०७.२०२४-
प्रति,
१. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. २. मा. शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षण संचालनालय, म.
३. मा.शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, म.रा. पुणे.
४. मा. संचालक, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, म.रा.पुणे
महाराष्ट्र राज्य पुणे-१
15 JUL 2024
विषय - सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणा-या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारीत वेतन संरचनेत (६ व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मच्या-यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्ताच्या दरात दिनांक ०१.०१.२०२४ पासून सुधारणा करण्याबाबत व अनुज्ञेय महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत.
संदर्भ
१. वित्त विभाग शासन निर्णय दिनांक १०.०७.२०२४
२. शासन पत्र संकीर्ण २४१९/ (४२/१९)/अर्थसंकल्प दिनांक १२.०७.२०२४
महोदय,
उपरोक्त विषयी शासनपत्र संदर्भ क्र.२ मध्ये दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करणेबाबत आपल्या अधिनस्त कार्यालयास कळविण्याबाबत आपणास विनंती करण्यात येत आहे.
आपला विश्वासू,
(हारून आतार)
शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन शिक्षण आयुक्तालय, पुणे.
हेही वाचाल 👇
विषय :- सुधारित वेतनसंरचनेत वेतन घेणारा राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन संरचनेत (६ व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दि. ०१ जानेवारी, २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत.
संदर्भ : वित्त विभाग, क्र. मभवा-१३२४/प्र.क्र.०३/सेवा-९, दिनांक १० जुलै, २०२४ चे दोन शासन निर्णय.
उपरोक्त विषयाबाबत वित्त विभागाच्या संदर्भाधिन दिनांक १० जुलै, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित महागाई भत्त्यामध्ये सुधारणा व अनुज्ञेय महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
२. त्यानुषंगाने, अनुदान प्राप्त संस्थांमधील कर्मचाऱ्यांनाही वाढीव महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा करणे अनुज्ञेय असल्याने, सदर महागाई भत्त्याची थकबाकी मंजूर उपलब्ध तरतुदीतून देण्यात यावी. अनुदानित संस्थामधील पात्र शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा वेतनाचा खर्च ज्या उपलेखाशिर्षाखालून भागविण्यात येतो, त्याच उप लेखाशीर्षाखालील मंजूर अनुदानातून सदर खर्च भागविण्यात यावा.
३. याबाबतचे निर्देश सर्व संबंधितांना आपले स्तरावरुन देण्यात यावे.
(गोविंद कांबळे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.
हेही वाचाल 👇
Dearness Allowances Increase in Four Percent
D A Hike for Maharashtra State Government Employees pdf
महागाई भत्ता मध्ये चार टक्के वाढ
महागाई भत्तामध्ये ४ टक्के वाढ
महागाई भत्ता वाढीचा निर्णय
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जानेवारी, २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांकः मभवा-१३२४/प्र. क्र.०३/सेवा-९ मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : १० जुलै, २०२४
वाचा
भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभाग कार्यालयीन ज्ञापन क्रमांक: १/१/२०२४-इ.।। (बी), दिनांक १२ मार्च, २०२४
शासन निर्णय
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.
२. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जानेवारी, २०२४ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित
वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४६% वरुन ५०% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२४ ते दिनांक ३० जून, २०२४ या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै, २०२४ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.
४. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(वि.अ. धोत्रे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
प्रत,
१. राज्यपालांचे सचिव
२. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी निमसरकारी खाजगी अनुदानित शाळा महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना तसेच निवृत्ती वेतन धारकांना लवकरच महागाई भत्ता मध्ये वाढ मिळणार आहे सध्या महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांना ५०% नुसार मिळणार आहे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता ५०% पर्यंत वाढ केलेला आहे
New Salary Calculator DA Hike
Arrears
राज्य शासकीय व इतर पात्र
कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा
Breaking News
महागाई भत्ता ४६% वरून ५०% वाढ जानेवारी २०२४ पासून महागाई भत्ता ४% वाढ झाली आहे चला तर मग तुमचा पगार किती होतो बघाच
खालील लिंकवर
माहे जुलै पेड ईन ऑगस्ट वेतन / पेन्शन देयकासोबत मिळणार वाढीव डी.ए माहे जुलै देय ऑगस्टच्या वेतन / पेन्शन देयकासोबत कर्मचाऱ्यांना वाढीव चार टक्के डी.ए चा प्रत्यक्ष लाभ दिला जाईल, तर माहे जानेवारी ते जून महिन्याच्या कालावधीमधील डी.ए फरकाची रक्कम जुलैच्या वेतनासोबत अदा केली जाईल
अशी तपासा वेतनवाढ जुलै 2024 Salary Increment
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon