DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Marathi Bhasha Foundation Anudan Yojana


मराठी भाषा फाउंडेशन योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची व अनुदान मागणीची कार्यपद्धती

Procedure for submission of proposal and request for grant under Marathi Bhasha Foundation Yojana GR

Procedure for submission of proposal and request for grant under Marathi Language Foundation Scheme pdf


शिक्षण संचालनालय (योजना), 
महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र शासन

१७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे-४११ ००१.

E-mail Id:- directoradult1@gmail.com

दुरध्वनीक्रमांक ०२०/२६१२६७२६/२६१२३५१५

जा.क्र./शिसंयो/यो-२-४०२/मराठी भाषा फांऊडेशन / 01144

प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व

दिनांक : ०७,०५,२०२४

२) शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद, सर्व

३) शिक्षणाधिकारी (योजना), मुंबई

विषयः- मराठी भाषा फांऊडेशन योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची व अनुदान मागणीची कार्यपद्धती.

मराठी भाषेवर पुरेशे प्रभुत्व नसलेले राज्यातील अल्पसंख्याक लोकसमूहातील उमेदवार इतर सर्वसाधारण उमेदवारांच्या तुलनेत विविध स्पर्धापरिक्षांमध्ये मागे पडतात त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग/महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धापरिक्षांमध्ये यशाच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देण्यासाठी. शासन निर्णय दिनांक ०२/११/२००४ पासून राबविण्यात येत आहे. इंग्रजी माध्यम वगळता इतर अमराठी शाळांमध्ये शिकत असलेले इयत्ता ८ वी ९ वी व १० वी चे अल्पसंख्यांक विद्यार्थी हे अप्रत्यक्ष लाभाथी असून या योजनेतंर्गत मराठी भाषा विषयक ज्ञान देणेसाठी मानधन तत्वावर शिक्षकांची नियुक्ती केली जाते. हे प्रत्यक्ष लाभार्थी असून त्यांना मानसेवी शिक्षक असे म्हटले जाते. 
१. शाळांना सुरुवात झाल्यानंतर में महिन्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद यांनी सर्व उर्दू माध्यमिक/मराठी माध्यमेतर शाळांच्या मुख्याध्यापकांची एक बैठक आयोजित करुन संबंधित मुख्याध्यापकांना सदर योजनेबाबत मार्गदर्शन करणे, 
😀
आपल्याला हे ही वाचायला आवडेल 


👆👆👆👆👆

२. या योजनेंतर्गत संबंधित शाळानी इ.८वी, ९वी व १० वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्याक समुदयातील अमराठी विद्यार्थी संख्या, तुकडयांची संख्या, सद्यस्थितीत शाळेमध्ये असलेल्या मराठी शिक्षकांची संख्या इ. बाबी नमूद करुन आवश्यक मानसेवी शिक्षकांच्या करावयाची निवड व नियुक्ती यासाठी १ जून ते १ जूले याकालावधीत प्रक्रीया पूर्ण करुन सदरहू योजना राबविणेबाबत व मानसेवी शिक्षक यांची मान्यता घेण्यासाठी शिक्षणाधिकारी (योजना), यांचेकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.

३. शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) यांचेकडे त्यांचा जिल्हयातील संबंधित शाळांकडून शिक्षणाधिकारी (योजना), यांच्या मान्यतेने आलेले प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळेतील विद्यार्थी

संख्या, मानसेवी शिक्षकांची शैक्षणिक अर्हता (बी.एड/एम.एड) विचारात घेऊन प्रस्तावास मंजूरी दिली जाते

४. शिक्षणाधिकारी (योजना), यांच्या मदतीने शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) यांनी शिक्षकांची नोंद घेऊन, त्यांचा कालावधी व त्या कालावधीचे त्यांचे मानधन याचे अंदाजपत्रक/माहिती
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास व शासनास सादर केले जाते. 

५. या योजनेचा कालावधी १ जुलै ते ३१ मार्च असा ९ महिन्यांचा राहील.

६. मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग योजनेंतर्गत मराठी भाषा हा विषय शिकविण्यासाठी इ.८वी, ९वी व १० वो या तिन्ही वर्गामध्ये मिळून एकूण १८० ते २०० विद्याथ्यांसाठी एक मानसेवी शिक्षक नेमण्यात येतात. २०० पेक्षा जास्त मात्र ३०० पेक्षा कमी असल्यास दोन मानसेवी शिक्षक नेमण्यात येतात आणि त्यापुढील प्रत्येक ११५० विद्यार्थी संख्येसाठी एका मानसेवी शिक्षकांची नेमणूक करण्यात येते.

७. या योजनेंतर्गत नेमणूक झालेल्या शिक्षकांना रु.५०००/- दरमहा देण्यात याते. सदर मानधन संबंधित शिक्षकांच्या बैंक खात्यामध्ये जमा करण्यात येते. नऊ महिन्यांसाठी एकूण रुपये ४५०००/- उपरोक्त प्रमाणे योजनेची कार्यवाही वेळेत करुन योजनेची अंमलबजावणी करावी.


(डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक

शिक्षण संचालनालय (योजना)

महाराष्ट्र राज्य, पुणे-०१

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon