DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Balbharati Mofat Pathya Pustake Yojana Circular




Vidyarthyana Balbharati Mofat Pathya Pustake Yojana 

Vidyarthyana Mofat Pathya Pustake Yojana 

Samagra Shiksha Abhiyan antargat Vidyarthyana Balbharati Mofat Pathya Pustake Yojana Circular

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व किडा विभाग
निपुण भारत
अमृत महोत्सव

समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

अतितात्काळ/प्राधान्याने/महत्वाचे

जा.क्र. मप्राशिप/सशि/मोपापु/काअ/२०२४-२५/१३९७

दिनांक : 2 MAY 2024

वाचा :

१) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम - २००९

२) महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियम- २०११

३) भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळ (PAB) च्या बैठकीचे इतिवृत्त दि.०५/०४/२०२४ व दि.१०/०४/२०२४.

प्रति,

१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व

२) शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, सर्व.

३) समग्र शिक्षा विभाग विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, मुंबई.

विषय : समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०२४-२५ मध्ये इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याबाबत.

प्रस्तावना:- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ वी

अंमलबजावणी सन २०१८-१९ पासून समग्र शिक्षा कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व शालेय शिक्षणातील विदयार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी

करण्यासाठी इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य सस्थाच्या शाळा व

शासन अनुदानित शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याकरीता केंद्रशासनाकडून मंजूरी मिळालेली आहे.
पाठ्यपुस्तकांच्या छपाईचे काम महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मडळ, बालभारती, पुणे ही संस्था करते. सदर पाठ्यपुस्तक मंडळाकडून इ. १ ली ते ८ वी करीता मराती, हिंदी, उर्दु, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलगु सिंधी अरेबी, तामिळ व बंगाली माध्यमातील पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात येणार आहे. या कार्यालयाकडून निश्चित केलेल्या मे. शिरिष कार्यों सर्व्हिसेस प्रा.लि. मुंबई या वाहतूकदारांकडून बालभारती गोडाऊन ते तालुका स्तरापर्यंत पाठ्यपुस्तकांची वाहतूक करण्यात येणार आहे.

समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक करिता नियमित पाठ्यपुस्तकांची ऑन लाईन मागणी नोंदविणे बाबत वाचण्यासाठी फक्त एवढीला स्पर्श करा 


२. पाठयपुस्तक योजनेचे आर्थिक निकष :

२.१) सन २०२४-२५ मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांकरीता प्राथमिक स्तर (इ. १ ली ते ५ वी) प्रति विद्यार्थी सरासरी रु. २५०/- व उच्च प्राथमिक स्तर (इ. ६ वी ते इ. ८ वी) प्रति विद्यार्थी सरासरी रु. ४००/- या दराने एकूण १,०१,५१.२६५ विद्यार्थ्यांसाठी रु. ३१५३३.४४५५०/- लाख तरतूद च पी एम श्री अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांकरीता १,३९,१५५ विद्यार्थ्यांसाठी एकूण रु. ४२१.८५२५०/- लाख तरतूद अशी एकूण १,०२,९०,४२० विद्यार्थ्यांसाठी रु. ३१९५५.२९८०२/- लाख तरतूद केंद्रशासनाकडून मंजूरी देण्यात आलेली आली आहे.

२.२) या कार्यालयाकडून निश्चित केलेल्या व शासनाने मान्यता दिलेल्या शिरीष कार्गो सर्व्हिसेस प्रा. लि., मुंबई या वाहतूकदाराकडून, विभागीय बालभारती पाठ्यपुस्तके भांडार ते तालुकास्तरापर्यंत पाठ्यपुस्तकांची वाहतूक करण्यात येणार आहे.

२.३) तालुका ते शाळास्तरापर्यंत पाठ्यपुस्तकांच्या वाहतूकीचा खर्च व तदअनुषंगीक खर्च (पुस्तकांची चढाई, उतराई हमाली खर्च इ.) देय तरतूद राज्य स्तरावरून अदायगी करण्यात येईल.

२.४) तालुका ते शाळास्तरापर्यंत पाठ्यपुस्तकांच्या वाहतूकीचा खर्च व तद्नुषंगिक खर्च (पुस्तके चढाई व उतराई, हमाली खर्च इ.) संबंधित जिल्हा / चालुकास्तरावरून सर्व वित्तीय नियमांचे पालन करून निविदा प्रक्रियेद्वारे करावी व त्या वाहतूकीचा दर हा शालेय पोषण आहार योजनेच्या तांदूळ वाहतूकीच्या दराप्रमाणे म्हणजेच प्रती किग्रॅ रु.१.५०/- चे मर्यादेतच करण्याची दक्षता घेण्यात यावी. प्रती किग्रॅ रु.१.५० /- पेक्षा जास्त वाहतूक दर मान्य केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

२.५) सन २०२४-२५ ची तालुका ते शाळास्तरापर्यंतची पाठ्यपुस्तकांची वाहतूक व तद्नुषंगिक खर्चाची देयके सन २०२४-२५ याच आर्थिक वर्षात समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके या लेखाशिर्षाखाली निकाली काढण्यात यावी. सदर देयकांच्या अदायगी, पुढील आर्थिक वर्षात अनुज्ञेय राहणार नाही. याबाबतच्या खर्चाची माहिती या कार्यालयाकडून यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या प्रमाणपत्राच्या नमुन्यामध्ये या कार्यालयारा गाहे जुलै २०२४ अखेरपर्यंत पाठविण्यात यावीत. सदर प्रमाणपत्रे सादर करण्यास कोणताही विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी.
शासन परिपत्रक

👇🏽
📚  शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये पाठ्यपुस्तकांमध्ये कोणते झालेत बदल
          परिपत्रक

वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा


🙋 हे आपण वाचलत का ? मग हे हि वाचा

* काय आहे पाठ्यपुस्तकांचा इतिहास जाणून घ्या


📚  शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये पाठ्यपुस्तकांमध्ये कोणते झालेत बदल
          परिपत्रक

वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा


🙋 हे आपण वाचलत का ? मग हे हि वाचा

* काय आहे पाठ्यपुस्तकांचा इतिहास जाणून घ्या

👇🏽 FOLLOW FOR NEXT UPDATE

फक्त या ओळीला स्पर्श करा


३. पाठ्यपुस्तकांची मागणी व वाहतूक :

३.१) सन २०२४-२५ साठी पाठ्यपुस्तकांची मागणी पाठ्यपुस्तक मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने यापूर्वीच करण्यात आलेली आहे. विद्यार्थी संख्येपेक्षा जादा पाठ्यपुस्तकांच्या देयकांची अदायगी केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

३.२) सन २०२४-२५ मध्ये विभागीय बालभारती पाठ्यपुस्तके भांडार (गोदाम) चे तालुकास्तरापर्यंतची वाहतूक राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई याचे कार्यालयामार्फत निश्चित केलेल्या वाहतूकदाराकडून करण्यात येणार आहे.

३.३) पाठ्यपुस्तके शाळांना पोहोच केल्यानंतर याबाबतच्या सर्व पोहोच पावत्या व खर्चाची देयके संबंधित गट शिक्षणाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद यांचेकडे एका महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक राहील.

३.४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व तसेच शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, महानगरपालिका सर्व यांनी पोहोच पावत्या व झालेल्या खर्चाचे देयके प्रति

स्वाक्षरीत करून वाहतूकदारांची देयके त्याच आर्थिक वर्षात म्हणजेच सन २०२४-२५ 
मध्ये तात्काळ अदा करण्याची कार्यवाही करावी. कोणत्याही परिस्थितीत सदर देयकांची प्रदाने दि.३१/०३/२०२५ नंतर अनुज्ञेय रहाणार नाहीत. सदर वाहतूकीसाठी, वाहतूकीपूर्वी कोणत्याही स्वरूपाचे अग्रीम अनुज्ञेय नाही, याची नोंद घ्यावी.

(४) पाठ्यपुस्तके वितरणाची कार्यवाही :

४.१) शाळा सुरु होण्यापूर्वी, विद्यार्थ्याचे पालक, विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके खरेदी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सर्व पालक व विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात येणार आहेत, याबाबतची पूर्वसूचना ठळक अक्षरात शाळेच्या दर्शनी भागावर व सर्वांना दिसेल अशा ठिकाणी फलकावर (Board) वर लिहिण्यात यावी. मराठी शिवाय इतर माध्यमांच्या शाळांमध्ये माध्यमानुसार अन्य भाषेत देखील सदर सूचना लिहिण्यात यावी. आपल्या शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या सभासद, माता - पालक संघ यांची एकत्रितपणे सभा घेऊन मोफत पाठ्यपुस्तक योजना व वितरणाबाबतची माहिती देण्यात यावी. पालकांना आपल्या वास्तव्याच्या परिसरात च त्यांचे कार्यक्षेत्रात सदर माहितीचा प्रसार करणेबाबत सूचना देण्यात याव्यात.

४.२) याकरीता शक्य झाल्यास मोफत पाठ्यपुस्तके योजनेबाबत, आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रसार माध्यमांचे सहकार्य घेऊन सदर उपक्रमाच्या अनुषंगाने विनामूल्य प्रसिद्धी द्यावी.

४.३) कोणत्याही विनाअनुदानित शाळेस सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय असणार नाही, याची नोंद घ्यावी.

(५) पाठ्यपुस्तकांचा पुरवठा :

५.१) तालुका स्तरावर पुस्तके प्राप्त झाल्यानंतर त्ते तात्काळ माध्यमनिहाय, इयत्तानिहाय च विषयनिहाय संच वर्गीकरण करून घ्यावेत व संबंधित शाळांकडे विनाविलंब वितरण करण्यात यावेत. पुस्तके तालुकास्तरावर आल्यानंतर त्याचे उपरोक्तनुसार वर्गीकरण झाल्याशिवाय गटसमन्वयकांचा प्रभार असलेले शिक्षण विस्तार अधिकारी यांनी कार्यालय सोडू नये.

५.२) शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला पाठ्यपुस्तक वितरणापूर्वी शाळानिहाय, वर्गनिहाय, माध्यमनिहाय, पंचायत समिती निहाय पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवावी आणि शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी समारंभपूर्वक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात यावे. सदरचा पाठ्यपुस्तके वितरणाचा दिवस पुस्तक दिन (Book Day) म्हणून साजरा करणेबाबत संबंधितांना सूचित करण्यात यावे. संपूर्ण जिल्हयात एकाच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण होईल, याबाबत नियोजन करण्यात यावे. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व निकष पात्र शाळांना अशा प्रकारच्या सूचना तात्काळ निर्गमित करण्यात याव्यात.

५.३) शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा होईल यांचे नियोजन करून वेळापत्रकाची एक प्रत्त या कार्यालयास पाठविण्यात यावी.

५.४) विभागीय शिक्षण उपसंचालकांनी आपल्या स्तरावर, त्यांच्या विभागातील जिल्हयांची व महानगरपालिकांची पाठ्यपुस्तकांची मागणी, पुरवठा आणि वितरण याबाबतचे पंचायत समिती तसेच, शाळा निहाय नियोजन करण्यासाठी शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद (प्राथमिक), महानगरपालिकांचे, शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांची बैठक आयोजित करावी. नियोजन करताना सभेच्या वेळी पाठ्यपुस्तकांच्या संबंधित भांडार प्रमुखांनाही आमंत्रित करावे जेणेकरून पाठ्यपुस्तकांच्या पुरवठ्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत.

५.५) पाठ्यपुस्तके वितरणासंदर्भातील नोंदी, शाळा / पंचायत समिती स्तरावर ठेवण्यात याव्यात.

५.६) पाठ्यपुस्तके वितरणासंदर्भातील नोंदी लिहीतांना त्यामध्ये कोणत्याही प्रकारे खाडाखोड होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. (६) पाठ्यपुस्तकाची साठवणूक :

६.१) ज्या जागेवर पुस्तके उत्तरावयाची आहेत, ती जागा निश्चित करताना सदरची जागा प्रशस्त असणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. पुस्तकांचे वाटप पंचायत समिती / वार्डातून करावयाचे असल्याने पुस्तकांच्या वर्गीकरण करुन त्यांच्या थप्प्या रचता येतील याची खातरजमा करण्यात यावी. सदरची जागा सुस्थितीत/सुरक्षित असावी. पुस्तके पुरवठा करण्यापूर्वीचा काळ पावसाळयाची सुरुवात होण्याचा काळ असल्याने पाऊस आल्यास पुस्तके भिजणार नाहीत याची दक्षता घेऊन पुस्तके उत्तरविण्यात यावीत. त्याबाबतची आवश्यक व्यवस्था आधीच करावी.

६.२) पंचायत समिती स्तरावरून शाळांना पुस्तकांचे वाटप करावयाचे आहे. याकरीता, पुस्तके ट्रकमध्ये चढवणे आणि उतरवून देणे यासाठी ट्रक येऊ शकेल एवढा मोठा रस्ता निश्चित केलेल्या जागेपर्यंत उपलब्ध असावा. गरज पडल्यास सदरचे काम रात्रीच्या वेळी करावे लागेल म्हणून विजेची व्यवस्था असणे आवश्यक राहील.

(७) पाठ्यपुस्तके वाटपाचे वेळापत्रक

७.१) सर्व पुस्तके माध्यमनिहाय, इयत्ता निहाय आणि पंचायत समितीनिहाय वेगळी करण्यात यावीत आणि ती ठराविक दिवशी संबंधित पंचायत समितीला / वार्डाला वेळेत पोहचविण्यात यावीत.

७.२) पुस्तकाचे वाटप करण्यासाठी पुढील स्वरूपात वेळापत्रक निश्चित करण्यात यावे. जेणेकरून त्या स्तरावर पुस्तके उत्तरवण्यास अधिकारी / कर्मचारी उपस्थित राहतील व वेळेचा अपव्यय होणार नाही. पाठ्यपुस्तके जून महिन्यात शाळा सुरु होण्यापूर्वी सात दिवस अगोदर शाळास्तरावर उपलब्ध होणे आवश्यक आहे.

क्र.

वाटपाचे ठिकाण

१ पाठ्यपुस्तक भांडार स्तरावरून पंचायत समिती वार्डाना

पाठ्यपुस्तके वाटपाचा दिनांक

दि.३१/०५/२०२४ पर्यंत (अमरावती व नागपूर विभाग वगळता इतर विभागातील जिल्हयांसाठी)

दि. १५/०६/२०२४ पर्यंत (अमरावती व नागपूर विभागातील जिल्हयांसाठी)
२ पंचायत समिती / वार्ड स्तरावरून शाळांना

दि. ०७/०६/२०२४ पर्यंत (अमरावती व नागपूर विभाग वगळता इतर विभागातील जिल्हयांसाठी) दि. २२/०६/२०२४ (अमरावती व नागपूर विभागातील जिल्हयासाठी)

३ शाळा विद्यार्थ्यांना

स्तरावरून दि. १५/०६/२०२४ (अमरावती व नागपूर विभाग वगळता इतर विभागातील जिल्हयांसाठी) दि.०१/०७/२०२४ (अमरावती व नागपूर विभागातील जिल्हयासाठी)

(८) पंचायत समिती / वार्ड स्तरावर पाठ्यपुस्तकांचे वाटप :

८.१) पुस्तके प्राप्त होण्यापूर्वीच कोणत्या जागी पुस्तके उतरावयाची आहेत. हे त्या स्तरावर प्रत्यक्षपणे जागेस भेट देऊन निश्चित करावे. ही जागा निवडताना सुद्धा वर नमूद केलेल्या सूचनाचे पालन करावे त्याचप्रमाणे प्रत्येक पंचायत समिती / वार्ड स्तरावर कोणत्या शाळेत कोणत्या माध्यमाची आणि कोणत्या इयत्तेची किती पुस्तकांची आवश्यकता आहे याबाबतचा तपशिल तयार करावा जेणेकरुन वाटप सोयीचे होईल.

८.२) पंचायत समिती स्तरावर त्यांना प्राप्त झालेल्या पुस्तकांची मोजणी करून आवश्यक तेवढी पुस्तके प्राप्त झाली किंवा नाही याची खातरजमा करावी.

८.३) पुस्तके कमी-अधिक असल्यास तात्काळ संबंधित वरिष्ठ अधिका यारा कळवावे.

८.४) प्राप्त पुस्तकांचे इयत्तानिहाय, माध्यमनिहाय आणि शाळानिहाय वर्गीकरण करण्यात यावे.

८.५) ज्या शाळांसाठी जी जागा निश्चित केली असेल त्याच ठिकाणी ती पुस्तके ठेवण्यात यावी.

८.६) पुस्तकांचे वाटपाचे नोंद रजिस्टर, पंचायत समिती / वार्ड स्तरावर ठेवावे व पुस्तके प्राप्त झाल्यावर त्यावर मुख्याध्यापकांची व त्यानी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधीची स्वाक्षरी घ्यावी. सदर नोंद रजिस्टरची पडताळणी नजिकच्या वरिष्ठ पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांनी करावी.

८.७) पाठ्यपुस्तके वाटपाचे नोंद रजिस्टरमध्ये कोणत्याही स्वरुपात खाडाखोड होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
क्र

मोफत पाठ्यपुस्तके पुरवठा रजिस्टर प्रपत्राचा नमूना

इयत्ता निहाय पुस्तक संच संख्या

शाळेचे नाव

यु-डायस क्रमांक

दिनांक

१ ली

ररी

३ री

४थी

५वी

६वी

७वी

८वी

एकूण

स्वाक्षरी

शेरा

(९) पुस्तकांचे विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक वितरण :

९.१) प्रथम सत्राच्या ज्या दिवशी शाळा सुरु होईल त्या दिवशी, उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण मुख्याध्यापक करतील.

९.२) पुस्तके वितरणाच्या वेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक शिक्षक संघ, गाता पालक संघ, संस्थेचे पदाधिकारी आणि इतर शिक्षण प्रेमी नागरीक यांना उपस्थित राहण्याबाबत मुख्याध्यापकानी निमंत्रित करावे आणि त्यांचे उपस्थित सभारंभपूर्वक पाठ्यपुस्तकांचे वितरण करावे.

९.३) पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थी शाळेत न आल्यास ज्या दिवशी विद्यार्थी प्रथमतः शाळेत येईल त्या दिवशी पात्र विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात यावीत. तसेच नंतर जस- जसे विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतील तस तसे प्रवेशाच्याच दिवशी पात्र विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात यावीत.

९.४) समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांकरीता असलेल्या निकषपात्र शाळांमध्ये शाळाबाहय विद्यार्थ्यानी प्रवेश घेतला असल्यास, सदर विद्यार्थ्यास शिल्लक असलेल्या पाठ्यपुस्तकांमधून, पाठ्यपुस्तके देण्यात यावीत. पुस्तके उपलब्ध नसल्यास वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून, शाळाबाहय विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.

(१०) पाठ्यपुस्तके वितरणाचा अहवाल सादर करणे :

१०.१) पुस्तकांचे वितरण झाल्यानंतर पुस्तके वितरणाचा अहवाल शाळांनी पंचायत रागिती, पंचायत समित्यांनी जिल्हा परिषदांना व जिल्हा परिषदांनी / महानगरपालिकांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयास शाळा सुरु झाल्यानंतर सात दिवसात पाठवावा. सदर माहिती शासनास सादर करावयाची असल्याने उपरोक्त अहवाल सादर करण्यास विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

१०.२) शाळेत पहिल्या दिवसापासून पुढील आठ दिवसातील पाठ्यपुस्तकांच्या वाटपाचा

आढावा घेण्यात यावा. विद्यार्थी संख्या आणि वाटप यात तफावत दिसून आल्यास,

त्याचप्रमाणे काही शाळात काही इयत्तांची पाठ्यपुस्तके अधिक तर काही ठिकाणी कमी

पडण्याची शक्यता दिसून आल्यास, जिल्हा परिषद, क्षेत्रात केंद्रप्रमुख / शिक्षण विस्तार

अधिकारी यांनी, तर नगरपालिका / महानगरपालिका क्षेत्रात त्यांचे वरिष्ठ पर्यवेक्षीय

अधिकारी यांनी आढावा घेतल्यानंतर जास्त पुस्तके असलेल्या शाळांतून कमी पुस्तके

असलेल्या शाळांमध्ये समायोजन करावे आणि याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल

पंचायत समिती / महानगरपालिकेला कळविण्यात यावा.

१०.३) पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक गुणवत्ता यांचा घनिष्ठ संबंध आहे. सदर बाब लक्षात घेऊन प्रत्येक टप्प्यावरील कार्यवाही अत्यंत दक्षतेने पार पाडणे आवश्यक आहे. आपल्या जिल्हा परिषद / महानगरपालिका क्षेत्रात पात्र लाभार्थ्यापैकी कोणताही लाभार्थी विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

१०.४) पाठ्यपुस्तकाच्या वितरणाची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी व कोणत्याही परिस्थितीत शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना पुस्तके वितरीत करण्यात यावीत. याबाबत आपल्या अधीनस्त सर्व अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात यावे. ज्या अधिकाऱ्यांकडून उपरोक्तनुसार कार्यवाही न झाल्यास त्यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी.

१०.५) सदर योजना योग्यरितीने राबविता यावी, यासाठी ठळक मुद्दयाची पडताळणी परिशिष्ठ - १ मध्ये गार्गदर्शनासाठी देण्यात आलेली आहे. त्याचा उपयोग करण्यात यावा. (११) पत्रकार परिषद :

११.१) शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, शिक्षण प्रमुख, शिक्षण निरीक्षक यांनी आपल्या स्तरावर समग्र शिक्षा अतर्गत मोफत पाठ्यपुस्तके पुरविली जाणार आहेत, ही माहिती देण्यासाठी शाळा सुरु होण्याच्या सर्वसाधारणपणे ०५ दिवस अगोदर त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करावी.

११.२) सर्वांपर्यंत सूचना पोहोचण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे त्या त्या विभागात प्रकाशित होणारी दैनिक वृत्तपत्रे. या माध्यमातून जर सदर माहिती सर्वापर्यंत पोहोचवली तर निश्चितच त्याचा फायदा होईल आणि शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येक पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळेल.

११.३) पत्रकार परिषदेच्या वेळी पाठ्यपुस्तके वितरणाचे नियोजन, विद्यार्थ्यांची संख्या, विद्यार्थ्यांपर्यत पाठ्यपुस्तके पुरविण्यासाठी करण्यात येणारी कार्यवाही इ. ची सविस्तर माहिती देण्यात यावी. सोबत प्रेस नोटचा नमूना परिशिष्ट २ मध्ये मार्गदर्शनासाठी दिला आहे. त्यात जिल्हा परिषद अथवा महानगरपालिका संदर्भात योग्य ती माहिती भरून त्याची स्वच्छ प्रत तयार करावी व त्याच्या आवश्यक तेवढ्या प्रती पत्रकार परिषदेच्या वेळी वाटण्यात याव्यात.

११.४) प्रेसनोटमध्ये आपल्या जिल्हयातील परिस्थितीनुसार काही बदल आवश्यक वाटल्यास आवश्यक तो बदल करण्यास हरकत नाही.

(१२) पाठ्यपुस्तके वाटपाबाबतचा अहवालः

१२.१) पाठ्यपुस्तक मंडळाकडून जसजशी पाठ्यपुस्तके प्राप्त होतील त्या त्या वेळी या कार्यालयास त्वरित कळविणे आवश्यक आहे.

१२.२) पत्रकार परिषदेत वितरण केलेल्या, प्रेस नोटची प्रत्त, पत्रकार परिषद घेतल्याबाबत्तचा अहवाल विभिन्न वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीची मूळ कात्रणे, पाठ्यपुस्तके वितरणाची छायाचित्रे इ. व्यवस्थित बाईडिंग करून घ्यावी. त्यास योग्य ते शिर्षक द्यावे व त्याची पुस्तिका तयार करावी. सदर पुस्तिका या कार्यालयास सादर करण्यात यावी.१२.३) पाठ्यपुस्तकांचे वितरण झाल्यानंतर आपल्या जिल्हयात समग्र शिक्षा अभियानाची पाठ्यपुस्तके वाटण्याच्या कार्यक्रम कशा पद्धतीने करण्यात आला याबद्दलचे काही अनुभव आणि पाठ्यपुस्तक वितरणाची निश्चित आकडेवारी या बाबतीतला वृत्तांत्त माहितीसाठी वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात यावा. या प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची मूळ कात्रणेसुद्धा या कार्यालयास बाईडिंग करून पाठविण्यात यावीत. शक्यतो पाठ्यपुस्तक वितरणाचे चांगल्या प्रतीचे चित्रफीत (Video Recording) तयार करण्यात यावे व त्ते या कार्यालयास उपलब्ध करून दिल्यास सर्वोत्कृष्ट व्हिडीओ शगुन पोर्टलवर अद्ययावत करण्यात येतील.

(१३) मोफत पाठ्यपुस्तके पुरवठा योजनेतील जबाबदार अधिकारी :

१३.१) समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याच्या, वरीलप्रमाणे तपशीलवार सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी बाराकाईने अभ्यासाव्यात.

१३.२) शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी इयत्ता १ ली ते ८ वी मध्ये शिकणाऱ्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप होईल, याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी.

स्तर

शाळा

केंद्र

नगरपालिका

तालुका

जबाबदार अधिकारी

मुख्याध्यापक

/ केंद्र प्रमुख / प्रशासन अधिकारी

गट समन्वयक पदाचा प्रभार असलेले शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी (बृहन्मुंबईसाठी शिक्षण निरिक्षकांच्या कार्यक्षेत्रातील संबंधित उपनिरीक्षक / शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी हे त्याच्या वार्डासाठी जबाबदार राहतील.)

जिल्हा

शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

महानगरपालिका

शैक्षणिक विभाग

महानगरपालिका, शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी / शिक्षण प्रमुख

विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व

उपरोक्त उद्दिष्ट साध्य करणे ही संबंधित अधिकाऱ्यांची वैयक्तिक जबाबदारी असेल. यात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांचे कर्तव्य पालनात गंभीर कसूर केल्याचे मानण्यात येईल आणि त्या अधिकाऱ्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

क्षेत्रीय भेटी दरम्यान मोफत पाठ्यपुस्तके योजनेची अंमलबजावणी, समग्र शिक्षा अभियान अंमलबजावणी आराखडयातील मार्गदर्शक सूचनानुसार तसेच राज्य कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे शाळा स्तरावरून होत आहे याची खात्री करण्यात येईल. मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा स्तरावरून सर्व निकष पात्र लाभार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा लाभ देणे आवश्यक आहे. पाठ्यपुस्तक योजनेपासून कुणीही चंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. सदर योजनेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारच्या तक्रारी, लोकसभा / राज्यसभा / विधानसभा / विधान परिषद तारांकित / अतारांकित प्रश्न तसेच लेखा आक्षेप उपस्थित होणार नाहीत. याबाबतची दक्षता घेऊन अंमलबजावणी करावी.

(प्रदीपकुमार डांगे भा.प्र.से) राज्य प्रकल्प संचालक, मप्राशिप, मुंबई.

प्रत :-

मा. मंत्रीमहोदय, शालेय शिक्षण विभाग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीस्तव :-

१) आयुक्त (शिक्षण), आयुक्त शिक्षण यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

२) आयुक्त, महानगरपालिका, सर्व.

३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व

४) शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

५) संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, पुणे.

६) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.

परिशिष्ट क्र १

समग्र शिक्षा व पी एम श्री

मोफत पाठ्यपुस्तक पुरवठा पडताळा सूची

१) शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व अनुदानित शाळामधील इ. १ ली ते इ.

८ वी मधील सर्व माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार आहे. याबाबतच्या सूचना लावण्याचे परिपत्रक निर्गमित करणे.

२) पाठ्यपुस्तकांसाठी शाळानिहाय, माध्यमनिहाय, आणि इयत्तानिहाय माहिती गोळा करणे,

३) प्रपत्रांमध्ये माहिती योग्यरीतीने भरणे, त्याची जिल्हा परिषद / महानगरपालिकेच्या जवळ असलेल्या माहितीशी पडताळणी करणे.

४) पाठ्यपुस्तक वितरणास पंचायत समिती / वार्ड स्तरावर शाळा निहाय, इयत्तानिहाय आणि माध्यमनिहाय माहिती तयार ठेवणे.

५) विद्यार्थ्यांच्या यादया शाळानिहाय त्या त्या शाळेत तयार ठेवणे. एक प्रत पंचायत समिती / वार्ड स्तरावर मागवून घेणे.

६) पाठ्यपुस्तक वाटपाचे वेळापत्रक निश्चित करणे व त्यासाठी बैठकीचे आयोजन करणे.

७) पंचायत समितीचा / वार्डाचा पाठ्यपुस्तके वाटण्याचा कार्यक्रम निश्चित करणे.

८) पाठ्यपुस्तके वाटण्याच्या वेळापत्रकाप्रमाणे पंचायत समिती / वार्डास पाठ्यपुस्तकाचे वाटप करणे.

९) पाठ्यपुस्तके उत्तरविण्यासाठी जागा निश्चित करणे.

१०) पाठ्यपुस्तकांची संख्या विचारात घेत्ता पाठ्यपुस्तके थेट पंचायत समिती स्तरावर निश्चित केलेल्या जागी उतरवून घेणे.

११) पाठ्यपुस्तकांची, पंचायत समितीनिहाय / वार्डनिहाय विभागणी करणे,

१२) पंचायत समित्यांनी शाळानिहाय, इयत्तानिहाय, माध्यमनिहाय, पाठ्यपुस्तकांचे वर्गीकरण करणे आणि त्यांच्या थप्या तयार करणे.

१३) पाठ्यपुस्तके वाटपासाठी गरजेप्रमाणे आवश्यक तेवढे वाटप कक्ष तयार करणे.

१४) पाठ्यपुस्तक वाटपाचे रजिस्टर तयार करणे.

१५) पत्रकार परिषद आयोजित करणे, त्यासाठी प्रेस नोट तयार करणे, पत्रकारांना पत्रे पाठविणे. मुख्याध्यापक किवा त्यांच्या प्रतिनिधीस पाठ्यपुस्तकाचे वाटप करणे, पाठ्यपुस्तके मिळाल्याबाबत स्वाक्षरी घेणे.

१६) मुख्याध्यापकांनी समारंभपूर्वक पाठ्यपुस्तकांचे वाटप करणे.

१७) शाळा सुरु झाल्यावर सात दिवसांनी केंद्र प्रमुख / शिक्षण विस्तार अधिकारी यांनी पाठ्यपुस्तक वाटपाचा आढावा घेणे.

१८) कमी अधिक पाठ्यपुस्तके असल्यास त्याचे समायोजन करून पुर्नवाटप करणे.

१९) शाळा उघडल्यापासून पंधरा दिवसात पाठ्यपुस्तक वाटपाचा अहवाल घेणे व संकलित करणे.

२०) संकलित अहवाल या कार्यालयास पाठविणे.

२१) पाठ्यपुस्तक मंडळाकडून प्राप्त देयकांची पडताळणी करून त्यावर प्रतिस्वाक्षरी करणे, त्याची एक प्रत जिल्हास्तरावर ठेवणे व मूळ प्रत मंडळाकडे परत करणे.


परिशिष्ट क्र. २

प्रेस नोट मसुदा

इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी मध्ये शिकणारे कोणतेही बालक पुस्तकापासून वंचित राहू नये आणि त्याला पाठ्यपुस्तकाअभावी शिक्षणात अडचण येऊ नये, शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची १००% उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके ही योजना सुरु केली आहे. इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी च्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येणार आहेत.

मोफत पाठ्यपुस्तके योजना सन २०२४-२५ करिता विभागीय पाठ्यपुस्तके भांडार ते तालुकास्तर या टप्यातील पाठ्यपुस्तकांची वाहतूक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयाकडून निश्चित केलेल्या वाहतूकदाराकडून करण्यात येणार आहे. तसेच तालुका ते शाळास्तरापर्यंतची पाठ्यपुस्तके वाहतूक संबंधित जिल्हा / तालुका स्तरावरून करण्यात येणार आहे.

पाठ्यपुस्तके वितरणाची तारीख संबंधित क्षेत्रातील / पंचायत समितीतील सर्व संबंधित शाळांतील मुख्याध्यापकांना कळविण्यात येईल. शाळा उघडण्यापूर्वी सर्व साधारणपणे सात दिवस आधी ही पाठ्यपुस्तके संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात देण्यात येतील. गावातील पदाधिकारी / अधिकारी / पालक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके समारंभपूर्वक वितरण, ज्या दिवशी शाळा उघडेल त्याच दिवशी करण्यात येईल.
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon