DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Post shifting of all Aided schools


Grant distribution Management Post shifting of all Aided schools

Grant distribution Management and post shifting of all schools

महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय 
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

020-26121394/96

doesecondary1@gmail.com/doehigherses @omail.com

क. शिसंमा/२०२३-२४/टि-८/संचमान्यता/०१३७)

प्रति.

दिनांक: १३ मार्च, २०२४

१) विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व,

२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) सर्व

विषयः शासन निर्णय दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ नुसार अनुदानास पात्र ठरलेल्या व ज्या शाळांना अनुदान वितरण आदेश दिलेले आहेत अश्या सर्व शाळांचे व्यवस्थापन व पद शिफ्ट करून घेणेबाबत......

उपरोक्त विषयान्वये सन २०२२-२३ ची संच मान्यता आधार वैध संख्येवर करण्यात आलेली आहे. सन २०२३-२४ ची संच मान्यता दि. ३० सप्टेंबर २०२३ च्या आधार वैध संख्येवर लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे सन २०२३-२४ ची संच मान्यता जनरेट होण्यापूर्वी आपल्या जिल्ह्यातील ज्या शाळा शासन निर्णय ६ फेब्रुवारी २०२३ नुसार अनुदानास पात्र ठरलेल्या आहेत व ज्या शाळांना १ जानेवारी पासूनचा वेतन अनुदान प्राप्त झालेला आहे अश्या शाळेचे सन २०२३-२४ मध्ये व्यवस्थापन बदल करून पद शिफ्ट होणे गरजेचे आहे. परंतु अद्याप आपल्या जिल्ह्यातील अनुदान प्राप्त शाळेचे ज्या त्या व्यवस्थापन मध्ये पदांचे शिफ्टिंग झालेले दिसून येत नाही. जर सन २०२३-२४ ची संच मान्यता जनरेट झाली तर सदर शाळेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करणे व पद शिफ्ट करता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
👇👇👁️👇👇
संचमान्यता अपडेट
शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या संच मान्यता बाबत


👆👆👆👆👆

२/- सदर शाळेचे पद शिफ्ट करण्यासाठी त्या शाळेची रिप्रोसेस संवालक कार्यालयाकडून उपसंचालक कार्यालयामार्फत आपणास करून घ्यावी लागेल. त्यामुळे सर्व शिक्षणाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील अनुदान प्राप्त शाळेचे आदेश पडताळणी करुन सन २०२३-२४ ची संच मान्यता जनरेट होण्यापूर्वी व्यवस्थापन बदल व पद शिफ्टची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

शिक्षणाधिकारी यांनी अनुदान पात्र शाळेचे व्यवस्थापन बदल व पद शिफ्टसाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी -

१. शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील ज्या शाळांना दि.६ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार अनुदान प्राप्त झालेले आहेअशा शाळेचे शिक्षणाधिकारी यांच्या सुपर लॉगीन मधून सन २०२३ २४- साठी व्यवस्थापन बदल करून त्या त्या व्यवस्थापनामध्ये पद शिफ्ट करून घ्यावे.

२. शिक्षणाधिकारी यांनी संबंधित केलेल्या बदलाचे Approval उपसंचालक यांच्या सुपर लॉगीन मधून करून घ्यावे.

३. उपसंचालक यांनी उपसंचालक लॉगीन मधून approval देत असताना ज्या शाळांचे व्यवस्थापन बदल केलेला आहे परंतु पद शिफ्ट केलेले नाही अशा शाळा उपसंचालक लॉगीन वरून reject कराव्यात व शिक्षणाधिकारी लॉगीन मधून परत त्या शाळेचे व्यवस्थापन बदल करून पद शिफ्ट करून घ्यावेत. उपसंचालक लॉगीन मधून ज्या शाळेचे व्यवस्थापन बदल व पद शिफ्ट झालेले आहे अशाच शाळांना approval देण्यात यावे.

३/- सन २०२३-२४ ची संच मान्यता एकदा जनरेट झाली तर सन २०२३-२४ मध्ये व्यवस्थापन बदल व पद शिफ्ट करता येणार नाही व त्यासाठी संचालक कार्यालयाकडून संबंधित शाळेची रिप्रोसेस करून घ्यावी लागेल त्यानुसार संच मान्यता शाळांना उपलब्ध करुन देणेसाठी होणारा विलंब टाळणेसाठी चरिलुप्रसाणे आवश्यक कार्यवाही तात्काळ करणेत यावी.


(संपत सूर्यवंशी) 
शिक्षण संचालक.

प्रत माहितीस्तव सविनय सादर मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे

माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे

According to the government decision dated February 6, 2023, regarding shifting the management and post of all the schools which are eligible for grant and to which the grant distribution order has been given
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon