DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Adhyapak Vidyalaya D Ed Summer Vacation

Adhyapak Vidyalaya D Ed Summer Vacation

Adhyapak Vidyalaya D Ed Summer Vacation Holiday Declared Unhali Sutti Circular

D El Ed College in Maharashtra Stae Declaration of summer holidays vacation and the Reopening rescheduling of the for D El Ed students

महाराष्ट्र शासन 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, 

महाराष्ट्र ४०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, 

पुणे ४११०३०,

Email- preserviceedudept@maa.ac.in

जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) / २०२४-२५/०२१४०

दिनांक: २२/०४/२०२४

प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

२) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)


विषय :- राज्यातील सर्व डी. एड अध्यापक विद्यालये यांच्या सन २०२४ ची उन्हाळी सुट्टी प शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ सुरु करणेबाबत...


संदर्भ :- १) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.५८/एस.डी-४, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२. दि.११/०४/२०२२

२) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.५०५/एस. डी-४, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२, दि.२०/०४/२०२३

हे हि वाचाल 

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024 चो उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरु करणेबाबत.

    उपरोक्त संदर्भीय परिपत्रकान्वये शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२४ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष २०२४-२५ सुरु करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत, त्याचधर्तीवर अध्यापक विद्यालयांची सन २०२४ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष २०२४-२५ सुरु करणेबाबत खालील सूचनांचे पालन करण्यात यावे.

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

१) गुरुवार दि.०२/०५/२०२४ पासून उन्हाळी सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी शुक्रवार दि.१४/०६/२०२४ पर्यंत ग्राह्य धरण्यात यावा. पुढील शैक्षणिक वर्षात सन २०२४-२५ मध्ये शनिवार दि.१५/०६/२०२४ रोजी अध्यापक विद्यालये सुरु करण्यात यावीत. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील अध्यापक विद्यालये ३० जून २०२४ रोजी रविवार येत असल्याने सोमवार दि. ०१ जुलै २०२४ पासून सुरु करण्यात यावीत. २) अध्यापक विद्यालयांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या परवानगीने घेण्याबाबत आवश्यक ते निर्देश आपल्या स्तरावरून द्यावेत, 

३) माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षांतील सर्व प्रकारच्या एकूण सुद्धा ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.

आपल्या अधिनस्त सर्व अध्यापक विद्यालयांना वरीलप्रमाणे निर्देश देण्यात यावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात यावा.


(डॉ. माधुरी सावरकर)

उपसंचालक (सेवापूर्व शिक्षण)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Circular pdf Link

⏫⏫⏫⏫⏫

प्रत माहितीस्तव सविनय सादर-

१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई-३२ २) मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पुणे-१

३) आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, १७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे १

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon