संच मान्यता pdf
दिनांक ०७ जून २०२३ महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण
संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती
इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे
४११००१ |
|
प्रति, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषदा (सर्व ) शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई
(सर्व ) (पश्चिम / उत्तर / दक्षिण ) |
|
विषय :- शाळेतील दिनांक ३०/११/२०२२
रोजी पटावर असलेल्या परंतु आधार अवैध ठरलेल्या विद्याथ्र्यांची पडताळणी करुन संच
मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत. |
|
संदर्भ :- १. शासन निर्णय दिनांक ०६/०२/२०२३
व शासन पत्र दिनांक २३/११/२०२२ २. मा. मंत्री, शालेय
शिक्षण यांच्या समवेत दिनांक २६/०५/२०२३ रोजी झालेली बैठक |
|
सरल प्रणालीतर्गत राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑनलाईन पध्दतीने एनआयसी, पुणे यांच्या मार्फत करण्यात येतात. त्यानुसार संदर्भाधिन शासन निर्णय
दिनांक ०६/०२/२०२३ शासन पत्र दिनांक २३/११/२०२२ मधील तरतुदीनुसार दिनांक ३० / ११
/ २०२२ रोजी स्टुडंट पोर्टलवर असलेल्या विद्यार्थ्यापैकी दिनांक १५/०६/ २०२३
अखेर आधार वैध असलेली विद्यार्थी संख्या विचारात घेवून सन २०२२-२३ ची संच
मान्यता अंतिम करण्यात येणार आहे. |
|
सध्यस्थितीत किमान ८० टकके
विद्यार्थी वैध विचारात घेवून अंतरिम संच मान्यता करण्यात आलेल्या आहेत, शाळांकडून
विद्यार्थी वैध करण्याची कार्यवाही योग्य प्रकारे सुरु आहे. पंरतु
विद्यार्थ्यांच्या नावातील तफावतीमुळे अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव विद्यार्थी
अवैध ठरत असतील अथवा कांही विद्यार्थ्याकडे आधार कार्ड उपलब्ध नसतील व या
विद्यार्थ्यामुळे शाळेतील सन २०२२-२३ च्या मंजुर पदावर विपरित परिणाम होत असेल
तर अशा शाळा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे या प्रकारच्या
विद्यार्थ्याच्या नावाच्या यादीसह अर्ज करतील व शाळांच्या बाबतीत संबंधित
गटशिक्षणाधिकारी हे अशा विद्यार्थ्यापैकी जे विद्यार्थी वर्गात नियमित उपस्थित
असतील तर अशा विद्यार्थ्यांची शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख
यांच्याकडून याबाबतची योग्य ती खात्री करतील व त्यांच्या पडताळणीमध्ये नियमित
असलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी विचारात घेतले जातील. विद्यार्थ्याची पडताळणी
करताना खालील बाबीची खात्री करावी. (प्रमाणपत्र पडताळणी प्रपत्र १ ते ३ सोबत
जोडले आहे.) |
|
१. नाव, लिंग
किंवा जन्मतारीख जुळत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा विद्यार्थ्याची
शाळेत असलेली नोंद व विद्यार्थ्याची प्रत्यक्ष शाळेत उपस्थित असल्याची खात्री
करुन व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची
शाहनिशा करुन असे विद्यार्थी संबंधित शाळेच्या संच मान्यतेकरीता ग्राहय धरण्यात
यावेत. २. ज्या विद्यार्थ्याची आधार
क्रमांकासाठी नोंद केली आहे अथवा आधार कार्ड उपलब्ध नाहीत असे विद्याथी संबंधित
शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखल
केले नाहीत याची तसेच त्यांचे आधार कार्ड का तयार होवू शकले नाहीत याची शहानिशा
करुन असे विद्यार्थी संच मान्यतेत ग्राहय धरण्यात यावेत. ३. शाळेतील विद्यार्थी डुप्लिकेट (Duplicate) असल्याचे स्टुंडट पोर्टलवर दर्शवित असेल तर असा विद्यार्थी नेमका
कोणत्या शाळेत शिकत आहे याची क्षेत्रीय यंत्रणेकरुन खात्री करुन योग्य त्या
शाळेत सदर विद्यार्थ्याची नोंद करावा. ४. शाळेकडून अर्ज प्राप्त झालेल्या
प्रत्येक शाळेत संबंधित शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांनी समक्ष भेट
देवून अर्ज केलेल्या विद्यार्थ्याची माहिती तपासण्यात यावी व मुख्याध्यापकांनी
अर्ज केलेला प्रत्येक विद्यार्थी संच मान्यतेत धरण्यासाठी पात्र आहे किंवा नाही
याची खात्री करावी.. ५. ज्या शाळांची किमान ९० टक्के
विद्यार्थी शाळांनी वैध केलेले आहेत त्याच शाळांतील उर्वरित विद्यार्थ्यांबाबतची
त्यांच्या अडचणी लक्षात घेवून पडताळणी करण्यात यावी. ६. आधार इनव्हॅलीड / अनप्रोसेसड /
आधार क्रमांक नसलेले विद्यार्थी शाळेत नियमित येत असल्याचे विविध बाबी लक्षात
घेवून खात्री पटल्यानंतरच त्यास संच मान्यतेसाठी ग्राहय धरण्यात यावे. |
|
आवश्यक ती पडताळणी केल्यानंतर
संबंधित शाळेच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनवर सदर विद्यार्थ्याना संच
मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत योग्य तो सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल अथवा सदर
अहवालाच्या आधारे सदर विद्यार्थ्यांना विचारात घेवून संच मान्यता सन २०२२-२३
करण्यात येतील.. वर नमुद केल्यानुसार शालेय
विद्यार्थ्यापैकी ज्यांचे आधार अवैध ठरलेल्या व आधार कार्ड नसलेल्या
विद्यार्थ्याच्या बाबतीत योग्य ती खात्री करुन पढील आवश्यक ती कार्यवाही करावी. |
|
शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय, म. रा. पुणे-१ |
संपत सूर्यवंशी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च
माध्यमिक म. रा. पुणे- १ |
प्रमाणपत्र पडताळणी प्रपत्र १ ते ३
सोबत जोडले आहे. PDF
DOWNLOAD करा DOWNLOAD करण्यासाठी👇 वर टिचकी मारा |
प्रति, |
विषय
: संच मान्यता 2022-23
चे कामकाज गटशिक्षणाधिकारी यांचेकडून 7 जूलै
23 पर्यंत करून घेणेबाबत |
ज्या शाळांचे आधार Validation हे ९०% पेक्षा
जास्त झालेले आहे परंतु शाळेतील उर्वरित 10%%
विद्यार्थी Invalid /Unprocessed मध्ये आहेत
काही तांत्रिक कारणास्तव त्या 10% विद्यार्थ्यांची आधार
माहिती वैध होत नाहीत असे विद्यार्थी सन २०२२-२३ या वर्षाच्या संच मान्यतेकरीता
विचारात घेण्याची सुविधा गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगीन मध्ये दिलेली आहे हि
सुविधा फक्त 7 जूलै २०२३ पर्यंत उपलब्ध असणार आहे 7
जूलै २०२३ नंतर संच मान्यता ह्या अंतिम केल्या जाणार आहेत
त्यामुळे आपल्या विभागातील शाळांचे त्यांच्या १०% आधार *वैध्य न झालेल्या संख्येमुळे
त्यांच्या गतवर्षीच्या मंजूर पदामध्ये फरक पडत असेल तरच* अशा १०% अवैध आधार असलेले
विद्यार्थी शाळेत नियमित उपस्थित आहेत व ते इतरत्र कुठे हि प्रवेशित नाहीत याचे
पुरावे आपल्या केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांच्या मार्फत आपल्या
गटशिक्षणाधिकारी कार्यालयास देऊन असे विद्यार्थी संच मान्यतेस गृहीत धरण्याची
प्रक्रिया त्यांच्या लॉगिन मधील संच मान्यता approval 2022-23 टॅब मधून 7 जुलै 2023 पर्यंत
पूर्ण करण्यास आपल्या तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यास सूचित करावे संबंधित
सुविधेचा लाभ 7 जुलै 2023 पर्यंतच
असणार आहे त्यामूळे आपल्या विभागातील गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून संबंधित
कामकाज करून घ्यावे |
डॉ. वंदना वाहूळ शिक्षण उपसंचालक, |
सन 2022-23 ची अंतिम
फायनलाईज संच मान्यता स्टेटस मुख्याध्यापक लॉगीनवर उपलब्ध झालेली आहे.
वेबसाईट :
१५ मे २०२३ ला संचमान्यता होणार अंतीम
सुमोटो जनहित याचिका
मार्गदर्शक सूचना वाचा किंवा DOWNLOAD करा
शिक्षण संचालक
(शरद गोसावी) प्राथमिक शिक्षण
संचालनालय, म. रा. पुणे-१
Figure Approval / Evaluation / Shalarath
प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा तील शिक्षक संवर्गातील पदासाठी संच मान्यतेची निकष सुधारित करण्याबाबत महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे 13 जुलै 2020 चे परिपत्रक
हे ही वाचा
अनुदान पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ प्रणालीत समावेश करणे बाबत
कायम शब्द वगळलेल्या घोषित बिनाअनुदानित शाळा तुकड्यांचे मूल्यांकन प्रस्तावाची छाननी तपासणी बाबत
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon