DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Std 1st To 8th Ananddai Shaniwar Upkram

Std 1st To 8th Ananddai Shaniwar Upkram

Class 1st To 8th Ananddai Shaniwar Upkram circular 

Implement the initiative Happy Saturday

राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये "आनंददायी शनिवार" हा उपक्रम राबविणेबाबत

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकिर्ण-२०२४/प्र.क्र.१२६/एस.डी.-४ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२ दिनांक :-१४ मार्च, २०२४.

प्रस्तावना:-

तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताण तणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे.

ALSO Read 👇 

🤣 आनंददायी शनिवार कृतिपुस्तिका

इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी साठी SCERT कडून खालील लिंक वर उपलब्ध
लिंकला स्पर्श करून पीडीएफ मध्ये डाऊनलोड करा 

LINK 

या सर्व पार्श्वभूमीवर शालेय जीवनात आनंददायी कृती असण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. यानुषंगाने "आनंददायी शनिवार" हा उपक्रम राज्य मंडळाच्या सर्व शाळामध्ये इयत्ता १ ली ते ८ वी या इयत्तांसाठी राबविल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल, त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होईल, विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचें उत्तम अध्ययन व्हावे या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी "आनंददायी शनिवार" हा उपक्रम राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

विद्यार्थ्यांसाठी गोष्टींचा शनिवार

शासन परिपत्रक:-

    विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारी बाबत जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
२. सदर उपक्रमाचा उद्देश खालीलप्रमाणे आहे.
१. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे.
२. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे
३. शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे
४. विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे.
५. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैराश्येवरमात करण्याची क्षमता निर्माण करणे.
६. विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे
३. आनंददायी शनिवार या उपक्रमामध्ये खालील कृतींचा समावेश असेल.
१. प्राणायाम / योग/ ध्यान-धारणा / श्वसनाची तंत्रे
२. आपत्ती व्यवस्थापनातची मुलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षण
३. दैनंदीन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन
४. स्वतःच्या आरोग्याची रक्षण करण्यासाठी उपाययोजना
५. रस्ते सुरक्षा
६. समस्या निराकरणाची तंत्रे
७. कृती, खेळ यावर आधारित उपक्रम
८. Mindfulness वर आधारित कृती व उपक्रम
९. नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य

विद्यार्थ्यांसाठी महावाचन उत्सव उपक्रम
वरील कृतींसोबत इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपुर्ण कृतींचा समावेश करण्याची मुभा शाळांना राहील.

४. आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवत असतांना प्रत्येक शनिवारी प्रचलित वर्गाऐवजी विद्यार्थ्यांचा शनिवार हा वरील कार्यपध्दतीनदवारे आंनददायी स्वरुपाचा होण्याच्या दृष्टिने आयुक्त (शिक्षण), पुणे व संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांनी एकत्रितपणे रुपरेषा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कार्यवाही करावी.
५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या
👇👇👇👇👇
स्पर्श करा
  या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२४०३१४२०५००३९६२१ असा आहे. हे परिपत्रक
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. 
TUSHAR VASANT MAHAJAN
ANT MAHAJAN
AND SPORTS DEPARTMENT,
(तुषार महाजन) उप सचिव, महाराष्ट्र शासन
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon