SSC HSC EXAM Moderator Valuer Circular
SSC HSC EXAM Valuation Moderation
SSC HSC EXAMINATION 2024 Valuation and Moderation Guidelines Circular
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती विभागीय मंडळ अमरावती. MAHARASHTRA STATE BOARD OF SECONDARY AND HIGHER SECONDARY EDUCATION AMRAVATI DIVISIONAL BOARD, AMRAVATI 444 602.
पत्र क.अविनं/मागो / 3264 अमरावती,
दिनांक 04/03/2024
परीक्षा प्राधान्य
प्रति,
प्राचार्य/मुख्याध्यापक,
सर्व मान्यता प्राप्त माध्य, व उच्च माध्य, विदयालय, अमरावती विभाग, अमरावती.
विषय : माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2024 उत्तरपत्रिकांचे परीक्षण व नियमन करणेबाबत.
संदर्भ:- या कार्यालयाचे पत्र क. अविनं/मागो/2889 दि.29.01.2024.
उपरोक्त विषयाचे संदर्भिय पत्रास अनुसरुन सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या प्राचार्य / मुख्याध्यापक यांना कळविण्यात येते की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2024 ते 19 मार्च 2024 आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 01 मार्च 2024 से 26 मार्च 2024 या कालावधीत लेखी परीक्षा होणार आहेत. काही शिक्षक संघटनांनी शासनाकडून विविध मागन्या मान्य होईपर्यंत सदर परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलेला आहे, असे पत्र या कार्यालयास प्राप्त झालेले आहेत.
तरी आपल्या माध्यमिक/ कनिष्ठ महाविदयालयास परीक्षण / नियमनासाठी आपल्या नांवे पाठविण्यात आलेले उत्तरपत्रिकांचे बंडल / पार्सल पोस्टामार्फत प्राप्त झाल्यास ते सोडवून घ्यावेत व परीक्षक/नियामक यांचेकडून परीक्षण व नियमन करुन घ्यावेत. कोणत्याही परिस्थितीत उत्तरपत्रिकेचे बंडल / पार्सल परत पाठवू नयेत.
परीक्षा मंडळाच्या शिक्षासूची मधील परिशिष्ट भाग-1 (अ-6) (21) अन्वये मुल्यमापनासाठी परिरक्षक कार्यालयाकडून पाठविण्यात आलेले उत्तरपत्रिकांचे पार्सल न स्विकारता मंडळाच्या पुर्वपरवानगीशिवाय परत केल्यास आपल्या माध्यमिक विदयालय / कनिष्ठ महाविदयालयाची मंडळ मान्यता रदद करण्याची तरतूद आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विनियम 1977 अन्वये नियम क.67 (18) नुसार विभागीय मंडळाकडून घेण्यात येणा-या परीक्षांसाठी माध्यमिक विदयालय/कनिष्ठ महाविदयालय आवश्यक त्या सर्व सोईसुविधा व कर्मचारी वर्गाच्या सेवा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आपणावर आहे., याची स्पष्ट नोंद घ्यावी.
तसेच संबंधित प्राचार्य/मुख्याध्यापक यांनी सदरचे इपीपी पार्सल ताब्यात न घेता मंडळाकडे उत्तरपत्रिकांचे पार्सल परत आल्यास त्यावर झालेला खर्च आपणाकडून वसूल करुन संबंधित विदयालय / कनिष्ठ महाविदयालय (अनुदानित/ विनाअनुदानित / अंशतः अनुदानित / स्वयं अर्थसहायीत तत्वावरील) यांची मंडळ मान्यता रदद करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल याची स्पष्ट नोंद घ्यावी,
(निलिमा टाके)
विभागीय अध्यक्ष,
अमरावती विभागीय मंडळ, अमरावती.
प्रत माहितीस्तव-
1. मा. सचिव, महाराष्ट्र राज्य माध्य, व उच्च माध्य. शिक्षण मंडळ, पुणे, 2. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, अकोला /अमरावती/बुलडाणा / यवतमाळ / वाशिम.
3. अध्यक्ष/सचिव, संबंधित संस्था,
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon