DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Shikshaketar Karmachari Shalarth ID Circular


शासन निर्णय, दि.०६.०२.२०२३ च्या परिणामकारक अंमलबजावणी...... शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी देण्यासंदर्भात अनुसरावयाची कार्यपध्दती



महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन परिपत्रक क्र. माशाम-२०२२/प्र.क्र.२७५/भाग-१/एसएम-४,

४ था मजला, मंत्रालय विस्तार, हुतात्मा राजगुरु बीक, मादाम कामा रोड,

मुंबई-४०००३२, दिनांक ०६ मार्च, २०२४

वाचा:- १) शासन निर्णय क्र. माशाअ-२०२२/प्र.क्र.२७५/एसएम-४, दिनांक ०६.०२.२०२३ २) शासन परिपत्रक, क, माशाऊ-२०२२/प्र.क्र. २०५/एसएम-४, दिनांक २४.०४.२०२३

माध्य/३९८६, दिनांक ३०,०६,२०२३ भी समक्रमांकाचे शासन पत्र, दिनांक ०३.०१.२०२४

परिपत्रक:-

३) आयुक्त (विक्षा, म.रा., पुणे यांचे अ.शा. पत्र.क्र. शिलाका-२०२३/ शालार्थ/ आस्था, क.

शासन निर्णय, दि.०६,०२,२०२३ अन्वये त्रुटीपूर्तता झालेल्या शाळा/तुकडयांना २० टक्के/४० टक्के अनुदान, यापूर्वी २० टक्के व ५० टक्के वेतन अनुदान घेत असलेल्या शाळा/तुकडयांना २० टक्के अनुदानाचा बाढीच टप्पा मंजूर करणे, तसेच, अघोषित असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/ तुकडया, वर्ग / अतिरिक्त शाखा यांना अनुदानासाठी पात्र घोषित करुन २० टक्के अनुदान मंजूर करण्याबाबत निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

सदर शासन निर्णयातील अटी व शर्ती मा. मंत्रीमंडळाच्या मान्यतेने विहित करण्यात आल्या आहेत.

सदर शासन निर्णयाची संबंधितांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने संदर्भ क्र. २ येथील शासन परिपत्रक दि. २४.४.२०२३ अन्वये, शालार्थ आयडी देण्यासाठी अनुसरावयाची कार्यवाही विहीत करण्यात आलेली आहे. मात्र सदर शासन परिपत्रकातील नमूद १ ते १२ पुराने हे शिक्षक कर्मचा-यांसाठी लागू आहेत, तथापि, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सदर परिपत्रकातील टप्पा क (३) मधील अ. क्र. (२) इ.१० वी १२ वी च्या परीक्षा मंडळाशी संलग्नित कामकाजाचे आदेश इ. (नियुक्ती दिनांकापासून), १५० विविध शासकीय प्रशिक्षणासाठी किमान ३ वेळा पाठविले असल्यात सदर प्रशिक्षणाचे प्रशिक्षण आदेश, प्रशिक्षणातील हजेरी पत्रक, उपस्थिती प्रमाणपत्र, कार्यमुक्ती जादेश इ. दस्तऐवज में (८) नियुक्तीच्या वर्षापासून वार्षिक निकालपत्रावर शिक्षक/वर्गशिक्षक माणून असलेल्या नोंदी या तीन बाबी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामकाजाशी फारसा संबंध येत नसल्याने, या तीन बाबी शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी पुरावा कागदपत्रे म्हणून ग्राहय चरणे अडचणीचे होणार आहे. तसेच, मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या

अध्यक्षतेखाली दिनांक ०.१२.२०२३ रोजी विधान भवन, नागपूर येथे बैठकीमध्ये अनुदानासाठी पात्र असलेल्या शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी यांना शालार्थ आयडी देण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. याबाबतचे इतिवृत्त संदर्भ क. (४) येथील पत्रान्वये निर्गमित करण्यात आले आहे. वरील बाबी विचारात घेता, अनुदानासाठी पात्र शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान गाउहीने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने, संबंधित

कागदपत्राची पडताळणी होण्याच्या दृष्टीने खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

(अ) शिक्षकेतर कर्मचा-यांची वैयक्तिक मान्यता तपासताना, संदर्भ क्र. (२) बेबील शासन परिपत्रक,

दिनांक २४.०४.२०२३ मध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार प्रथम टप्पा क्र. (१) व टप्पा क्र. (२) येथील कार्यपध्दती अवलंबिण्यात यावी, तवूनंतर,

(4) टप्पा क्र. (३) नुसार, खालील नमूद केलेल्या ८ कागदपत्रांपैकी किमान ४ कागदपत्रे उपलब्ध होत असल्यास, त्याची खात्री करुन शालार्थ आयबी देण्यात यावा:-

(१) शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैयक्तिक मान्यतेची पडताळणी करताना वैयक्तिक मान्यता देण्याच्या वर्षाच्या जावक नोंदवह्या उपलब्ध होत नसल्यास शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांच्या नियुक्तीच्या वर्षाची युद्धायस प्रपत्रातील माहिती, तद्‌नंतरच्या वर्षामधील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी नांव नोंद,

(२) नियुक्तीच्या दिनांकापासून चार वर्ष पूर्ण होण्यापूर्वी करण्यात आलेली बिंदूनामावली मधील कार्यरत कर्मचारी नोंद

(३) नियुक्तीच्या दिनांकापासूनचे हजेरीपत्रक, सदरचे हजेरीपत्रक केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्या मेटी दरम्यान प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे (किमान ३ वर्षाचे प्रमाणित)

(४) नियुक्ती दिनांकालगतच्या वर्षामध्ये शासकीय कामकाजासाठी नियुक्ती केलेली असल्यास उदा. जनगणना, पशुगणना, निवडणूक कार्यक्रम या शासकीय नियुक्ती केलेली असल्यास उदा. जनगणना, पशुगणना निवडणूक कार्यक्रम या शासकीय कामाकजासाठी सेना अधिगहित केल्याबाबतचे कागदपत्रे इ. अभिलेखे

(५) शिक्षक पोर्टलवर करण्यात आलेली नोंद

(६) नियुक्ती वर्ष किया लगतच्या वर्षाची तसेच, तदनंतरच्या वांची सेवाजेष्ठता यादी, सदर यादी शासकीय अधिकारी यांनी प्रमाणित केलेली असणे,

(७) नियुक्ती शैक्षणिक वर्ष व नंतरच्या शैक्षणिक वर्ष संच मान्यता प्रपत्रातील कार्यरत कर्मचारी

प्रमाणित यादी प्रपत्र

(८) वैयक्तीक मान्यतेच्या प्रस्तावाची आवक शाखेतील नोंद

४ पैकी २

वरील नमूद अ.क्र. (१) ते (८) मधील किमान ४ कागदपत्रांची पुरावा म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक विभागीय अध्यक्ष यांनी संबंधित कार्यालयाकडून खात्री करण्यात यावी, तसेच, कार्यालय प्रमुख यांनी प्रमाणित केलेल्या नक्कलाचा उपयोग शालार्थ आयडी देताना करण्यात पाना, या व्यतिरिक्त शिक्षक कर्मचारी मान्यता आदेशात, जर शिक्षकेतर कर्मचारी याची नावे समाविष्ट असल्यास, असा आदेश व्या संबंधित शिक्षकेतर कर्मचा-यांच्या शालार्थ आमडी करीता एक पुरावा म्हणून ग्राहय धरण्यात यावा.

तथापि, वरीलप्रमाणे कार्यवाही करताना पुढील बाब काटेकोरपणे तपासण्यात यावी. शासन निर्णय, क्र.एसएसएन-२०१५/प्र.क्र.१२/टीएनटी-२, दिनांक २८ जानेवारी, २०१९ नुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी सुधारीत आकृतीबंध लागू करण्यात आला असून, वरील परिपत्रकाच्या अनुषंगाने वैयक्तिक मान्यता देण्यात वेणान्या शिक्षकेतर कर्मचारी यांची संख्या या आकृतीबंधानुसार विहित केलेल्या अनुज्ञेय पदांच्या मर्यादेपेक्षा अधिक होणार नाही, याची दक्षता शिक्षणाधिकारी/उपसंचालक यांनी ध्यावी.

३. तसेच, जामक नोंद नसताना सादर केलेली कागदपत्रे योग्य असल्याची खातरजमा सक्षम प्राधिका-याने करावी, तदनंतरच शालार्थ आयडी करीता सदर पुरावक प्राड़ा धरण्याची कार्यवाही करावी, या प्रत्येक प्रकरणात निर्णय घेताना एफआयआरची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील, तसेच वैयक्तिक मान्यते संदर्भात अनियमितता निदर्शनास आल्यास शासन निर्णय, दिनांक २३.०७.२०१७ मधील तरतूदीनुसार वैयक्तिक मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी,

संदर्भीय शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे शासन निधीचा विनियोग योग्य असल्याची खातरजमा सक्षम प्राधिका-यानी करावी, शासन निधीचा विनियोग योग्य असल्याची खातरजमा होत नसल्यास, पथानियम सदर शाळांची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही सर्व संबंधित कार्यालयांनी करावी.

4 सदरचे परिपत्रक शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक २०२४०३०६१७२७५३३४२१ असा आहे.

 सदरहू परिपत्रक डिजीटल

स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

PRAMOD VITHOBA KADAM

(प्रमोद कदम) कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन
सदर शासनपत्र निर्णय पीडीएफमध्ये डाऊनलोड साठी उपलब्ध 

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng