उपरोक्त विषयांकित मागणीबाबतची निवेदने या विभागास प्राप्त होत आहेत.
०२. शासन निर्णय दि. २१.०६.२०२३ अनुसार जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वी
पासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छूक शिक्षकांना त्यांच्या
विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती
देण्यात यावी, अशी तरतूद आहे. नवीन शिक्षक भरती सुरु झाली असून जे शिक्षक
जिल्हांतर्गत बदलीसाठी इच्छूक आहेत त्यांच्यासाठी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी
अधिकारी यांना समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया राबविण्यास आदेशित करावे, अशी
मागणी उक्त निवेदनान्वये करण्यात आलेली आहे. याअनुषंगाने नमूद करण्यात येते की,
शासन
निर्णय दिनांक २१.०६.२०२३ मधील अ.क्र.२ अनुसार कार्यवाही होत नसल्याबाबत या
विभागास अनेक लेखी व मौखिक तक्रारी प्राप्त होत आहेत. जिल्हा परिषदेअंतर्गत
नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबतच्या सुधारित अटी ग्राम विकास विभागाच्या सहमतीने
दिनांक २१.०६.२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या आहेत. सदर शासन
निर्णयामधील नमूद अ.क्र. २ अनुसार आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत सर्व मुख्य
कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना आपल्या स्तरावरुन निर्देश देण्यात यावेत, ही
विनंती.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon