DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Rajyastariy Namo Maha Rojgar Melava Link

Rajyastariy Namo Maha Rojgar Melava Link SOP GR
राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावे आयोजित करण्याबाबत
महाराष्ट्र शासन
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्रमांक: कौविउ २०२४/प्र.क्र.१४/प्रशा. २ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक : ०६ फेब्रुवारी, २०२४
वाचा:- १)
२) शासन निर्णय क्रमांक: कौविउ २०२२/प्र.क्र. ११०/प्रशा. २ (रोजगार),
दि. ०७ नोव्हेंबर, २०२२ व दि. २६ जुलै, २०२३.
शासन निर्णय क्र. रोस्वरो-२००७/प्र. क्र. ४१/रोस्वरो-१, दि. २९ जून, २००७
३) शासन निर्णय क्र. कौविउ २०२३/प्र. क्र. २९५ (भाग-१)/प्रशा-२, दि. १६ नोव्हेंबर, २०२३.
४) शासन शुद्धीपत्रक क्र. कौविउ २०२३/प्र. क्र. २९५ (भाग-१)/प्रशा-२, दि. ४ डिसेंबर, २०२३.
प्रस्तावना-
शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार/स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी दि. २९ जून, २००७ च्या शासन निर्णयाद्वारे नियोक्ते, कारखानदार, व्यापारी व सुशिक्षित बेरोजगार यांचे एकत्रित रोजगार मेळावे आयोजित करण्यात येतात. दि. ०७ नोव्हेंबर, २०२२ च्या शासन निर्णयान्वये सदर मेळावे आयोजित करताना होणाऱ्या खर्चामध्ये सुधारणा करण्यात आली असून महसूली विभाग व जिल्हास्तरावर (ऑफलाईन) आयोजित करावयाच्या रोजगार मेळाव्यांकरिता खर्चाची मर्यादा प्रति मेळावा ₹ ५.०० लक्ष इतकी निश्चित करण्यात आली आहे. तसेच, रोजगार मेळाव्यांकरीता करावयाच्या बाबनिहाय कमाल खर्चाची मर्यादा दि. २६ जुलै, २०२३ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आली आहे.
दि. १६ नोव्हेंबर, २०२३ च्या शासन निर्णयान्वये व दि. ०४ डिसेंबर, २०२३ च्या शासन शुद्धीपत्रकान्वये दि. ०९ व १० डिसेंबर, २०२३ रोजी नागपूर येथे प्रथमच राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात बँकिंग, लॉजीस्टिक, सेल्स मार्केटिंग, इन्सुरन्स, मॅन्युफॅक्चरिंग, हॉस्पिटॅलिटी, कम्युनिकेशन, ITES, अपारंपरिक ऊर्जा, आरोग्यसेवा इत्यादी क्षेत्रातील एकूण ३४० प्रतिष्ठित कंपनी / नियोक्ते यांनी सहभाग नोंदविला होता. सदर मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद विचारात घेता तसेच, रोजगार मेळावे व स्वयंरोजगार, कौशल्य व नाविन्यता संबंधित योजनांचा व्यापक स्वरुपात प्रचार व प्रसिद्धी होऊन प्रत्येक नागरिकांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात कमाल ६ महारोजगार मेळावे आयोजित करणे व त्याकरीता प्रतिमेळावा ₹५.०० कोटी याप्रमाणे दरवर्षी १३०.०० कोटी इतका निधी मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तसेच, सन २०२३-२४ मध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे व कोंकण विभाग येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याची बाबही शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पुढीलप्रमाणे शासन निर्णय घेण्यात येत आहे.
शासन निर्णय :-
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे व कोंकण या महसूली विभागात नमो महारोजगार मेळाव्यांच्या आयोजनास व त्याकरिता प्रति मेळावा ₹ ५.०० कोटी याप्रमाणे एकूण ₹२०.०० कोटी इतका निधी उपलब्ध करुन देण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
२. यापुढे दरवर्षी राज्याच्या सर्व महसूली विभागात प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण ६ नमो महारोजगार मेळावे आयोजित करण्यास व त्याकरीता प्रति मेळावा ₹ ५.०० कोटी याप्रमाणे प्रत्येक आर्थिक वर्षात ₹ ३०.०० कोटी इतका निधी उपलब्ध करुन देण्यासही मान्यता देण्यात येत आहे.
३. प्रस्तुत नमो महारोजगार मेळाव्याचा तपशिल पुढीलप्रमाणे:-
३.१ उद्दिष्टः- नमो महारोजगार मेळाव्यांमार्फत राज्यातील किमान २ लाख उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे.
३.२ समन्वयकः- सदर मेळाव्याच्या आयोजनाकरिता शासनाच्या विविध विभागांसमवेत समन्वय साधण्यासाठी मा. मुख्यमंत्री सचिवालयातील "मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष" हे मुख्य समन्वयक म्हणून काम पाहतील. आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय सदर कक्षाशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करतील.
३.३ कार्यक्रम:- नमो महारोजगार मेळाव्याअंतर्गत खालील कार्यक्रम राबविण्यात येतील:-
१) मुलाखत पूर्व व करिअर मार्गदर्शन करणे याकरिता तज्ञ मार्गदर्शकांमार्फत मार्गदर्शन करणे.
२) रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सहाय्य करणे.
३) उमेदवारांना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता सबंधित विविध योजनांची माहिती देणे/ मार्गदर्शन करणे.
४) अल्प कालावधीच्या प्राथमिक प्रशिक्षण अभ्यासक्रमांबाबत मार्गदर्शन करणे.
३.४ अंमलबजावणी:- सदर मेळाव्याच्या आयोजनाची प्रमाणित कार्यपद्धती (Standard Operating Procedure-SOP) सोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये जोडली आहे.
३.५ मेळावा आयोजनाचा खर्च:-
१) सदर मेळावा आयोजनाकरिता येणारा खर्च मागणी क्र. झेडए-१, २२३०-कामगार व सेवायोजन, ०२ सेवायोजन, ००४ संशोधन, सर्वेक्षण व सांख्यिकी, (०१) (०१) सेवायोजन रोजगार उपलब्धताविषयक माहिती व युवक रोजगार विषयक सेवा (२२३० ११०७),३४ शिष्यवृत्त्या व विद्यावेतने या लेखाशीर्षाखाली त्या-त्या वित्तीय वर्षाकरिता मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून भागविण्यात यावा.
२) सदर मेळाव्यांकरीता आवश्यक साहित्य सामग्री/ निधी इत्यादी करीता कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीची (Corporate Social Responsibility-CSR Fund) मदत मिळण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी.
३) नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम स्थळी स्वच्छता व शौचालय व्यवस्था व त्यासाठी येणारा खर्च संबंधित महानगरपालिकेकडून करण्यात यावा.
४) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण घेणाऱ्या / घेतलेल्या उमेदवारांना मुलाखतीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी वाहतुक व्यवस्था व त्यासाठी येणारा खर्च हा संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून करण्यात यावा.
५) नमो महारोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित उमेदवारांना करिअर व स्वयंरोजगार मार्गदर्शन
होण्याकरीता उमेदवारांना वितरणासाठी योजना/करिअर मार्गदर्शिका पुस्तिका, माहिती पत्रक इत्यादी छपाईचा खर्च सबंधित विभागाच्या निधीतून करण्यात यावा.
६) मेळाव्यांकरीता प्रति मेळावा ₹५.०० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला असला तरी, शासनाच्या काटकसरीच्या धोरणानुसार खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी.
३.६ मेळाव्याचा प्रचार व प्रसिद्धीः- जास्तीत जास्त नियोक्ते/उद्योजक रोजगार प्रदाता संस्था (प्लेसमेंट एजन्सीज) द्वारे वेबपोर्टल/ अॅपवर नोंदणी करून त्यांच्याकडील रिक्तपदे अधिसूचित करण्याकरीता व सदर रिक्त पदांसाठी जास्तीतजास्त उमेदवार अर्ज/ नोंदणी करतील अशी कार्यवाही करण्यासाठी तसेच, वेबपोर्टल/अॅपवर नोंदणी व रिक्तपदांसाठी अर्ज करण्याची कार्यपद्धतीबाबत मेळाव्यापूर्वी मेळाव्याचा प्रचार व प्रसिद्धी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता मेळाव्याचा विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रचार व प्रसिद्धी करण्यात यावी. प्रचार व प्रसिद्धी करीता येणारा खर्च माहिती व जनसंपर्क संचालनालय यांच्या निधीतून करण्यात यावा.
३.७ मेळाव्याच्या आयोजनाकरीता संबंधित सहभागधारकांच्या जबाबदाऱ्या:- सदर मेळाव्याच्या आयोजनाकरीता संबंधित सहभागधारकाच्या जबाबदाऱ्या व त्यानुषंगाने करावयाची कार्यवाही सोबत जोडलेल्या "परिशिष्ट- ब" प्रमाणे राहील.
४. सदर शासन निर्णय मा. मंत्रिमंडळाने दि. ०५ फेब्रुवारी, २०२४ च्या बैठकीत घेतलेल्या निर्णयास अनुलक्षून निर्गमित करण्यात येत आहे.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या CLICK HERE  या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०२०६१४२२२३९००३ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
PRABHAKAR ATMARAM SANKHE
GOVERNMENT OF MAHARASHTRA SKILLS ENTREPRENEURSHIP AND INNOVATION DEPARTMENT   
(प्रभाकर संखे) 
शासनाचे अवर सचिव
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon