Rani Laxmibai Atma Raksha scheme
Circular
Rani Laxmibai Atma Raksha Prashikshan scheme for Girls
As per
provisions and sanctions made by Government of India for Self Defence Training
under the Rani Laxmibai Atma Raksha Prashikshan scheme to impart training on
self-defence for girls studying across Classes 6th to 12th in 22,201 government
schools of Maharashtra
महाराष्ट्र शासन शालेय
शिक्षण व क्रिडा विभाग
समग्र शिक्षा
महाराष्ट्र प्राथमिक
शिक्षण परिषद, मुंबई
जा.क्र.मप्राशिप/समग्र
शिक्षा/Self
Defence Training/२०२३-२४/९२ दिनांक : 08 JAN 2024
प्रति,
१) आयुक्त, महानगरपालिका, सर्व.
२) मुख्य कार्यकारी
अधिकारी,
जिल्हा परिषद, सर्व.
विषयः समग्र
शिक्षातंर्गत सन २०२३-२४ मध्ये राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण
कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २२,२०१ शाळांमधील (२०,४२१ उच्च प्राथमिक व १,७८० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा) मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण,
जीवन कौशल्य देण्यासाठी मार्गदर्शक सूचना.
संदर्भ : १) निविदा
क्र.GEM/२०२३/B/३६९३९३९, दि.
३०/०८/२०२३.
२) GeM
Sanction Order No.५११६८७७९४०९८०९५, दि.२८/१२/२०२३.
बालकांचा मोफत व
सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ ची
दिनांक ०१ एप्रिल, २०१० पासून राज्यात अंमलबजावणी करण्यात
येत आहे. राज्यातील प्रत्येक ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांस सुरक्षित वातावरणात
गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक
धोरण,
२०२० च्या तब्बल ८६ शिफारसी समग्र शिक्षा (परिशिष्ट-1) मध्ये समाविष्ट केल्या आहेत. यामध्ये मुलींच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणावर
भर देण्यात आला आहे. त्यानुसार मुलींच्या शारीरिक आणि मानसिक शक्तीला चालना
देण्यासाठी आणि शाळेत किंवा त्यानंतर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी
त्यांना सुसज्ज करण्यासाठी, शाळेत मुलींना स्वसंरक्षण
प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
स्व-संरक्षण
प्रशिक्षणाद्वारे, मुलींना मानसिक, बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या पुरेसे सक्षम बनवण्याची गरज आहे. जेणेकरून
त्या संकटाच्या आणि असुरक्षिततेच्या वेळी स्वतःचे संरक्षण करू शकतील. हिंसाचार
करणाऱ्यांना संदेश देण्यासाठी मुली सामना करण्यासाठी तयार आहेत आणि या संदर्भात
मुलींना सर्व पैलूंमध्ये सक्षम करणे, कोणत्याही प्रकारच्या
कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुलींना स्वयं-कौशल्यांत पारंगत करणे
त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व जागरूकता विकसित करणे ही काळाची गरज निर्माण झाली
आहे.
विद्यार्थिनींना
गुन्हेगारीविरुद्ध लढण्यासाठी सक्षम करणे हे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट
आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व तंत्र यांचे प्रशिक्षण
देणे गरजेचे आहे. अनुभवी मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांकडून मुलींनी सुरक्षित
वातावरणात व्यावहारिक संरक्षण तंत्र शिकणे आवश्यक आहे. विद्यार्थिनींसाठी हा
उपयुक्त संरक्षण तंत्र कार्यक्रम आत्मनिर्भर बनवून तणाव कमी करण्यासाठी त्यांनी
स्व-संरक्षण कौशल्ये शिकण्याचा उत्तम मार्ग असेल. इयत्ता सहावी ते बारावीत
शिकणाऱ्या मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सन २०२३-२४ मध्ये समग्र
शिक्षा अंतर्गत राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण (प्राथमिक आणि माध्यमिक)
अंतर्गत २०,४२१ उच्च प्राथमिक शाळा आणि १,७८० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण
देण्यासाठी तरतूद मंजूर आहे.
केंद्र शासनाने मंजूर
केलेल्या निधीच्या अधिन राहून या कार्यालयाकडून विहित प्रक्रियेद्वारे M/s.
Skill Tree Consulting Pvt. Ltd. या सेवादारकाची निवड करण्यात आली
असून दि. ०४/०१/२०२४ ते दि. ३१/०३/२०२४ या कालावधीसाठीचा त्यांचे सोबत आवश्यक तो
करार करण्यात आला असून उक्त सेवादारकास सेवा पुरवठा आदेश निर्गमित करण्यात आला
असून सदर सेवादारकामार्फत आपल्या जिल्ह्यातील सोबत जोडलेल्या यादीमध्ये नमूद
शाळांकरिता मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये
प्रशिक्षकांमार्फत मार्शल आर्टच्या किमान एक शैली/प्रकारात विशेष/कुशल (तायक्वांदो,
वुशू, कराटे, ज्युडो,
वेस्टर्न बॉक्सिंग, किकबॉक्सिंग, कुस्ती, कॉम्बॅट साम्बो, मुय
थाई, जिउ-जित्सू (किंवा जुजुत्सु), क्राव
मागा, MMA (मिश्र मार्शल आर्ट्स), आयकिडो,
जी कुने दो आणि भारतीय मार्शल आर्ट्सचा कोणताही प्रकार) वर नमूद
केल्याप्रमाणे स्व-संरक्षण विशिष्ट कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच
प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थिनींना सेवादाराकडून प्रमाणपत्र
प्रदान करण्यात येईल. याबाबतचा Scope of Work पुढीलप्रमाणे-
सदर परिपत्रक पीडीफ साठी फक्त या ओळीला स्पर्श करा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon