DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Registration of vacant posts of private educational institutions for teacher recruitment through Pavitra Portal

Registration of vacant posts of private educational institutions for teacher recruitment through Pavitra Portal

Pavitra Portal marfat shikshak Bharti khajgi shaiksahnik Sanstha rikt padanchi mahiti nondvine


अध्यक्ष / सचिव, शाळा व्यवस्थापन, मार्फत मुख्याध्यापक, अनुदानित / अंशतः अनुदानित/ विना अनुदानित
विषयः- पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीकरिता विहित कालावधी जाहिरान नोंद न केलेल्या व्यवस्थापनांकरिता आवश्यक कार्यवाही करणेबाबत.

👇👇👇👇👇👇👇


दिनांक : २३/०१/२०२४
व्यवस्थापनांसाठी सूचना
स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टल वरील जाहिरात विषयक सूचना

👇👇👇👇👇👇👇



महाराष्ट्र शासन 

शिक्षण आयुक्तालय, 

महाराष्ट्र राज्य, पुणे ४११ ००१

दूरध्वनी क्र.: ०२०-२६१२०१४१

ई-मेल : educom-mah@mah.gov.in

दि.१६.०१.२०२४

क्र. आस्था/प्राथ १०६/पवित्र-पोर्टल/रिक्तपद-नॉद-मू.वा/२०२४/५१२ प्रति,

16 JAN 2024

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग,

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)

३. शिक्षणाधिकारी, महानगरपालिका (संबंचित)

४. शिक्षण निरिक्षक, (पश्चिम/उत्तर/दक्षिण), बृहन्मुंबई

५. प्रशासन अधिकारी, मनपा/नप (संबंधित)


विषय :- पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती करीता खाजगी शैक्षणिक संस्थांच्या रिक्त पदांची माहिती नोंदविणेबाबत.


संदर्भ : १. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) संचालनालय, म.रा. पुणे यांचे पत्र क्र.शिसं/जाहिरात-पदभरती/पवित्र पोर्टल/टे-४/५४९१ दि.२७.१०.२०२३

२. या कार्यालयाचे पत्र क्र. आस्था/प्राच-१०६/पवित्र-पोर्टल/बिंदुनामावली/२०२३/७२९६, दि.२९.११.२०२३ ३. या कार्यालयाचे पत्र क्र. आस्था/प्राथ-१०६/पवित्र-पोर्टल/रिक्तपद-नोंद/२०२४/२९३, दि.०१.०१.२०२४

उपरोक्त विषयी कळविण्यात येते की, संदर्भीय पत्रान्वये खाजगी शैक्षणिक संस्थांना पदभरती करीता https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळावर जाहितरात देण्याविषयक कार्यवाही करण्यासाठी दि.१५.०१.२०२४ पर्यंत करणेबाबत सुविधा देण्यात आली होती.

सद्यस्थितीत संकेतस्थळावर जाहितरात देण्याची कार्यवाही अद्याप सुरु असून सर्वच खाजगी शैक्षणिक संस्था या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी संस्थांना पदभरती करीता जाहितरात देण्याविषयक कार्यवाही करण्यासाठी दि.१२.०१.२०२४ पर्यंत सुविधा देण्यात येत आहे.

सबब आपल्या अधिनस्त नोंदणीकृत शैक्षणिक संस्थांना पदभरती करीता जाहितरात देण्याविषयक मुदतवाढ देण्यात आली असल्याच्या सबिस्तर सूचना आपल्यास्तरावरुन देण्यात याव्यात. तसेच सर्वच खाजगी शैक्षणिक संस्था या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावेत. सदर बाबीस सर्व माध्यमांतून विस्तृत प्रसिद्धी देण्यात यावी. आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल इकडे सादर करणेत यावा.

(दिलीप ज्ञा. जगदाळे)

शिक्षण सहसंचालक

(प्रशासन, अंदाज व नियोजन) 

शिक्षण आयुक्तालय, म.रा.,पुणे

प्रत माहितीस्तवः

१. कक्ष अधिकारी (टिएनटि-१), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ २. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे स्वीय सहाय्यक

सदर परिपत्रक पीडीफ साठी फक्त या ओळीला स्पर्श करा

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon