DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Pariksha Pe Charcha compet prog students

Pariksha  Pe Charcha 2024 competitions programs for all students 

महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय, डॉ. अनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत, पुणे-४११००१

दूरध्वनी क्रमांक – (०२०) २६१२४५७२

ई-मेल :- depmah2@gmail.com

क्र.प्राशिसं/८०२/संकीर्ण/०५४५/२०२४

दिनांक- १८/०१/२०२४

प्रति,

१. शिक्षणाधिकारी सर्व जिल्हे (प्राथमिक/माध्यमिक)

२. शिक्षण निरीक्षक (पश्चिम मुंबई/दक्षिण/उत्तर)

३. प्रशासन अधिकारी सर्व मनपा

विषयः- दि. २९/०१/२०२४ रोजी आयोजित 'परीक्षा पे चर्चा २०२४' या कार्यक्रमास राज्यातील सर्व शाळांमधून प्रसिद्धी देणेबाबत

संदर्भ :- १) Government of India, Ministry of Education, Department of school education and Literacy, New Delhi यांचे पत्र क्र. D.O.No.6-10/2023-PMP-5,dt 12/01/2024

सोबतच्या संदर्भीय पत्राचे अवलोकन व्हावे.

उपरोक्त विषयी संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, केंद्र शासनामार्फत 'परीक्षा पे चर्चा २०२४' हा कार्यक्रम दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रमाअंतर्गत मा.पंतप्रधान महोदय, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचेशी 'परीक्षा पे चर्चा २०२४' च्या आणखी एका नवीन रोमांचक आवृत्तीमध्ये दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे सकाळी ११.०० वाजता संवाद साधणार आहेत.

तरी त्या अनुषंगाने आपल्या अधिनस्त कार्यक्षेत्रात सदर योजनेबद्दल पुरेशी प्रसिद्धी मिळणेकरीता (https://drive.google.com/drive/folders/liCoDDBbijPVJIVM2X3jH5OvAQkI6606?usp=sharing) या link वर उपलब्ध करून देण्यात आलेले बॅनर प्रत्येक शाळेतील दर्शनीय ठिकाणी लावावीत. तसेच सदर योजनेकरिता लागणारा खर्च समग्र शिक्षा अभियान योजनेमधील योग्य त्या लेखाशिर्षा अंतर्गत भागविण्यात यावा.

सोबतः- वरीलप्रमाणे

प्रत माहितीसाठी सविनय सादर -

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१

१) मा. श्रीमती प्राची पांडे, Joint secretary (Inst. And Trng.) Government of India, Ministry of Education, Department of school education and Literacy, Shastri Bhvan, New Delhi -110115 २) मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ३) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे 411001.

प्रत योग्य त्या कार्यवाहीस्तव विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग)



Also read -

महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे
क्र. प्राशिसं/८०२/ संकीर्ण / ००४७/२०२४
दिनांक ०१/०१/२०२४
प्रति.
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक ) सर्व जिल्हे
३. शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम मुंबई )
४. प्रशासन अधिकारी सर्व मनपा

विषय:- परीक्षा पे चर्चा २०२४' अंतर्गत राज्यातील सर्व शाळांमधून सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा/कार्यक्रमाचे आयोजन करणे बाबत

संदर्भ :- १) Government of India, Ministry of Education, Department of school education and Literacy, New Delhi यांचे पत्र क्र. D.O. No. 6-10/2023-PMP-5, dt 29/12/2023 २) अध्यक्ष, राज्य मंडळ, पुणे ०४ तथा समन्वयक अधिकारी, PPC यांचे पत्र जा.क्र. रा.मं./ परीक्षा-२/१५, दिनांक -०१/०१/२०२४
                उपरोक्त विषयी संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, केंद्र शासनामार्फत परीक्षा पे चर्चा २०२४' हा कार्यक्रम अंदाजे जानेवारी-फेब्रुवारी २०२४ मध्ये आयोजित केला जाणार आहे. यासाठी संदर्भीय पत्रामध्ये नमूद केल्यानुसार शाळा स्तरावर दिनांक- १२ जानेवारी, २०२४ ते २३ जानेवारी, २०२४ या कालावधीत विविध स्पर्धा/कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे आहे. यामध्ये दिनांक १२/०१/२०२४ हा दिवस 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा करावयचा आहे. तसेच दिनांक २३/०१/२०२४ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमीत्त पेंटीग च्या स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत नमूद केलेले आहे. सदर स्पर्धेचा विषय मा. प्रधानमंत्री महोदयांनी परीक्षेचा ताण कमी करण्याकरीता दिलेल्या कानमंत्रावर आधारित असेल याबाबत दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांनी या संपूर्ण कालावधीत स्पर्धा/कार्यक्रमात सहभागी होऊन त्याचे सेल्फी काढून पत्रात नमूद केलेल्या हॅशटॅगसह ते सोशल मिडीयावर पोस्ट करावयाचे आहेत.
आयोजन करावयाच्या स्पर्धांची यादी व हॅशटॅग खालीलप्रमाणे-
१. मॅरथॉन रन (hashtagjokhelewokhilePPC24)
२. संगीत स्पर्धा (hashtagchaloschoolchalePPC2024)
३. नक्कल स्पर्धा (hashtagmiletosuceedPPC2024)
४. पथनाट्य (hashtagexamwarriorPPC2024)
छोट्या व्हिडीओवर चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिलेली प्रतिक्रिया. +
५. छोट्या छोट्या (hashtagletstalkPPC2024)
६. विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांची मुलाखत घेणे. (hashtagbeyourownanchorPPC2024)
७. एखादी संकल्पना घेऊन त्याबाबत पोस्टर तयार करणे. ( hashtagkahokahaniPPC2024)
योगा ध्यानधारणा कार्यक्रमाचे आयोजन करणे. ( hashtagyogaisenergyPPC2024)
९. शाळा संमेलनामध्ये (assembly मध्ये) सुविचार, बोधप्रद गोष्टी, विशेष कार्यक्रम, बातम्यांचे वाचन इत्यादी बाबीचे आयोजन करणे. ( hashtagletstalkPPC2024)
१०. स्फुतीदायक गीतांचे / राष्ट्रीयगीतांचे (CusC, KVS, NVS येथील assembly मधील गीतांप्रमणे)
तसेच संदर्भ क्र. १ च्या पत्रामध्ये सदर बाबत करावयाच्या कार्यवाहीचे निर्देशानुसार केलेल्या कार्यवाहीचे छायाचित्रण उपरोक्त दिलेल्या हॅशटॅगसह ते सोशल मिडीयावर पोस्ट करावे. तसेच स्थानिक वर्तमानपत्र व प्रसारमाध्यमाद्वारे प्रसिद्ध करावे.
प्रत्येक शाळेतील पाच उत्कृष्ट विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व राष्ट्रीय स्वातंत्र्य सैनिकांचे पुस्तक देऊन सन्मानित करावे व सर्व सहभागी विद्याथ्यांना डिजिटल प्रमाणपत्र व परीक्षेला सामोरे जातांना करावयाच्या कार्यवाहीचे पुस्तक (Exam warrior book) द्यावे.
तरी संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने व त्यामध्ये दिलेल्या सूचनानुसार केंद्रीय विद्यालय संगठन यांच्या सहभागाने राज्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक १२ जानेवारी, २०२४ ते २३ जानेवारी, २०२४ या कालावधीत विविध स्पर्धा/कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत आपल्या अधिनस्त सर्व शाळांना सूचित करावे. अशा प्रकारे दिनांक १२ जानेवारी, २०२४ रोजी राष्ट्रीय युवा दिन यशस्वीरित्या साजरा करणेसाठी उपरोक्त स्पर्धाचे आयोजन करून व दिनांक २३/०१/२०२४ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमीत्त पेंटीग च्या स्पर्धेचे आयोजन करून साजरा करावा. तसेच केलेल्या सर्व कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा.
 (शरद गोसावी)
शिक्षण संचालक(प्राथमिक)महाराष्ट्र राज्य, पुणे ०१
(संपत सूर्यवंशी)
शिक्षण संचालक (माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे ०१

 


Pariksha Pe Charcha 2024 Registration Online Apply परिक्षा पे चर्चा 2024 नोंदणी ऑनलाईन अर्ज करा त्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे दिनांक २०/१२/२०२३
Pariksha pe Charcha Contest for students
मा.पंतप्रधान महोदय यांच्यासमवेत परीक्षा पे चर्चा- ७ सन २०२४ या कार्यक्रमांतर्गत इयत्ता सहावी ते बारावीचे विद्यार्थी तसेच पालक व शिक्षक यांचे करिता आयोजित स्पर्धेबाबत परिपत्रक वाचण्या साठी किंवा पीडीफ प्रतीसाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

Previous
Next Post »

1 comments:

Click here for comments
Unknown
admin
January 11, 2024 at 9:16 PM ×

Akshada Dilip Chaudhari

Congrats bro Unknown you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon