DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER

January 2024

Department of Higher Education, Ministry of Education Government of India

वय वर्षे १६ वर्षांखालील मुलांमुलीसाठी कोचिंगमध्ये 'नो एंट्री', केंद्र सरकारचा मोठा निर्णय..!
━━━━━━━━━━━━━
🪀 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि इतर महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करून जॉईन करा..!*_ 

👇🏻

लिंक 👉 LINK 
━━━━━━━━━━━━━

आता खासगी कोचिंग सेंटर्सच्या मनमानीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने तयारी केली आहे. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता कोणीही कुठेही आणि केव्हाही खाजगी कोचिंग सेंटर उघडू शकणार नाही. यासाठी सर्वप्रथम त्याला नोंदणी करावी लागेल. एवढेच नाही तर आता १६ वर्षांखालील मुलांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली आहे. इतकंच नाही तर कोचिंग सेंटर्स कोणत्याही विद्यार्थ्याकडून मनमानी शुल्क आकारू शकणार नाहीत.
    केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. कोचिंग सेंटर्सचं नियमन आणि त्यांना कायदेशीर चौकटीत आणण्याची गरज होती. तसेच खासगी कोचिंग क्लासेसच्या अनियंत्रण वाढीवर रोख लावण्यासाठी ही मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत.

कोचिंगच्या घटनांमध्ये सुविधांचा अभाव तसेच त्यांनी अवलंबलेल्या अध्यापनाच्या पद्धतींबाबत सरकारकडं आलेल्या तक्रारींनंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

काय आहेत नव्या मार्गदर्शक सूचना?

● कोणतेही कोचिंग सेंटर पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांना नियुक्त करू शकत नाहीत.
● कोचिंग सेंटर्समध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी संस्था दिशाभूल करणारी आश्वासने देऊ शकत नाहीत
● पालकांना दर्जा किंवा चांगल्या गुणांची हमी देऊ शकत नाहीत.
● संस्था १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाही.
● विद्यार्थ्यांची नोंदणी ही माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच व्हायला हवी.
● दिशाभूल करणारी जाहीर कोणतीही कोचिंग संस्था करु शकत नाही.
● कोचिंग सेंटर्स नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या कोणत्याही शिक्षक किंवा व्यक्तीची सेवा घेऊ शकत नाहीत.
● या मार्गदर्शक तत्त्वांच्या समुपदेशन प्रणाली असल्याशिवाय संस्थेची नोंदणी केली जाणार नाही.
● कोचिंग सेंटर्सकडे ट्यूटरची पात्रता, अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा कालावधी, वसतिगृहाची सुविधा आणि आकारले जाणारे शुल्क यांचा अद्ययावत तपशील असलेली वेबसाइट असावी.

PDF COPY AVAILABLE HERE. 👉 LINK 


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon