वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके
Vaidykiy Pratipurti Deyak Information
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य,
मध्यवर्तीइमारत, डॉ. अॅनी बेझंट रोड, पुणे-४११ ००१.
दूरध्वनी : (020) 24530396
e-mail: doesecondary1@gmail.com
दिनांक :- ०७/११/२०२३.
क्र. शिसंमा/२०२३/टि-७/वै.दे/ऑप्मालाईन / ६०२4
प्रति,
१) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. सर्व
२) शिक्षण निरीक्षक, (उत्तर/दक्षिण/पश्चिम), मुंबई
01 DEC 2023
३) अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, माध्यमिक, सर्व
विषय :- सन २०२३-२४ मध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके अदा करण्यासाठी परवानगी मिळणेबाबत.
संदर्भ- १) दि. २६/१०/२०२३ रोजीची व्हीसी.
२) शासन पत्र क्र. वेतन-१२२३/प्र.क्र.१०१/टिएनटी-३ दि. २० नोव्हेंबर, २०२३.
उपरोक्त विषयास अनुसरून सादर करण्यात येते की, दि. २६/१०/२०२३ रोजी व्हीसीमध्ये वैद्यकीय प्रतिपूतों देयके अदा करण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयाकडून लेखाशीर्षनिहाय मागणी करण्यात आली होती. तसेच विविध संघटनेकडून मागणी करण्यात आली होती.
तथापि शासन पत्र क्र. वेतन-१२२३/प्र.क्र.१०१/टिएनटी-३ दि. २० नोव्हेंबर, २०२३ अन्वये ऑनलाईन पद्धतीने देयक अदा करण्याची प्रणाली विकसित करण्यास साधारणपणे १ महिन्याचा कालवधी लागणार असल्याने सदर प्रणाली मार्फतच थकीत देयक अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी असे शासनाने निर्देश दिलेले आहे.
सन २०२३-२४ मध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करणेसाठी शालार्थ प्रणालीमध्ये सुविधा विकसित करण्याची कार्यवाही सुरू असून शालार्थ प्रणालीमध्ये सदरची सुविधा उपलब्ध झालेनंतर २२०२०४४२, २२०२०४७८ व २२०२०४६९ या लेखाशीर्षाखाली उपलब्ध तरतूदीमधून वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
तथापि सदरची वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ही आपल्या कार्यालयास प्राप्त झालेल्या आवक क्रमांकानुसार अदा करण्याची दक्षता घ्यावी. तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके अदा करणेबाबत वित्त विभाग, आरोग्य विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार व शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके अदा करण्यात यावी. शासनाच्या ध्येयधोरणाच्या विसंगत कार्यवाही केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहीत्र याचा सांद
(संपत सुर्यवंशी)
१/१२/२३
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon