ZP Aantar Jilha Badli EK aagau Vetanvadh
आंतर जिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचा-यास संबंधित जिल्हा परिषदेत आगाऊ वेतनवाढ देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन,
ग्राम विकास व जलसंधारण विभाग, शासन आदेश क्र. लोआप्र-२००२/प्र.क्र.६३ / आस्था ५, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक :- ३ ऑक्टोबर, २००३.
वाचा : १) शासन निर्णय, ग्राम विकास विभाग क्र. डीएसआर-२४८९/ सीआर 2CC / 9 * C , दिनांक ३१/१०/१९८९. २) शासन पत्र, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र.अराप १०८९/५२७८/
प्र.क्र 989C / 94 दिनांक ३१ जुलै १९९७.
आदेश
हेही वाचा
👇👇👇👇👇
सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत
जिल्हा परिषदेकडील वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचा-यांना आगाऊ वेतनवाढी देण्याबाबतचे सर्व समावेशक आदेश अ.क्र. १ येथील शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यांत आले आहेत. तथापि, त्यात आंतर जिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचा-यास आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी किंवा कसे याबाबतचा उल्लेख नाही.
२. दरम्यान अशा आंतर जिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचा-याची सेवा ज्येष्ठता दुस-या जिल्हा परिषदेत शून्य होते असे सर्व जिल्हा परिषदांना अ.क्र. २ येथील दिनांक ३१ जुलै, १९९७ च्या शासन पत्रानुसार कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे अशा कर्मचा-यास आगाऊ वेतनवाढ द्यावी किंवा कसे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती.
३. प्राप्त परिस्थितीत, आंतर जिल्हा बदलीने बदलून आलेल्या अशा कर्मचा-यांचा त्याच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे आगाऊ वेतनवाढीसाठी विचार करावयाचा झाल्यास, या विभागाच्या दिनांक ३१/१०/१९८९ च्या शासन आदेशानुसार जुन्या व नवीन जिल्हा परिषदेतील संबंधीत कर्मचा-याची एकाच पदावरील किमान सलग तीन वर्षे सेवा झालेली असावी. तसेच संबंधित कर्मचा-यांच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अभिलेख्यांची प्रतवारी दिनांक ३१-१०-१९८९ च्या शासन आदेशानुसार असावी.
४. हे आदेश पूर्वलक्षी प्रभावाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम २४८ नुसार प्रदान केलेल्या शक्तीनुसार लागू करण्यात येत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
( रा. का. पवार )
सह सचिव, महाराष्ट्र शासन.
Teachers who are inter-district transferred from one district to another are given an advance pay increment.
zp teachers aantar jilha badli ek aagau Vetanvadh PDF Download Circular
ZP Aantar Jilha Badli EK aagau Vetanvad
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon