mahagai Bhatta darat sudharna
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जुलै, २०२३ पासून सुधारणा करण्याबाबत
महाराष्ट्र शासन वित्त विभाग
शासन निर्णय क्रमांकः मभवा-१३२३/प्र.क्र.१६/सेवा-९ मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, दिनांक: २३ नोव्हेंबर, २०२३
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
वाचा - भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभाग कार्यालयीन ज्ञापन क्रमांक: १/४/२०२३-इ.।। (बी), दिनांक २० ऑक्टोबर, २०२३
शासन निर्णय -
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.
२. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जुलै, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२ % वरुन ४६% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२३ ते दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे नोव्हेंबर, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.
४. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३११२३१६३३१६१७०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(वि. अ. धोत्रे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
प्रत,
१. राज्यपालांचे सचिव
२. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
३.उप मुख्यमंत्र्यांचे सचिव
४. सभापती, विधानपरिषद यांचे खाजगी सचिव, विधानभवन, मुंबई
परिपत्रक पीडीएफ स्वरूपात वाचण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
DA Calculator पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon