DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

UDISE Plus Not Updated No Salary Teacher

UDISE Plus pranali Shala Vidyarthi  shikshak mahiti adyavat nahi 

UDISE Plus Not Updated No Salary to teachers 

युडायस प्लस अद्यावत नाही तर शिक्षकांना वेतन नाही

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व किडा विभाग

समग्र शिक्षा

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

महत्वाचे :-

जा.क्र.मप्राशिप/ समग्र शिक्षा/यु-डायस/संगणक/२०२३-२४/3107

प्रति,

दिनांक : 23 NOV 2023

१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.

२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व.

३) शिक्षण निरीक्षक - उत्तर, दक्षिण व पश्चिम, मुंबई. 

४) शिक्षणाधिकारी/प्रशासनाधिकारी, महानगरपालिका, सर्व.

विषय: सन २०२३-२४ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती नोंदविणेबाबत

संदर्भ

१) स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग शिक्षा मंत्रालय, भारत सरकारयाचे पत्र क्र. D.O.No. २३-४/२०२३ Stats दि. २५/०८/२०२३. 

२) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, यांचे पत्र क्र. संकीर्ण २०२३/प्र.क्र.२७०/एसडी-१ दि. ३०/०८/२०२३.

३) या कार्यालयाचे पत्र जा.क्र. मप्राशिप/समग्र शिक्षा/संगणक/ U-DISE / २०२३-२४/२५९१ दि. १३/०९/२०२३.

      उपरोक्त संदर्भिय विषयान्वये राज्यातील मान्यता प्राप्त सर्व शाळांची माहिती दि. ३१ ऑक्टोबर, २०२३ रोजी पर्यंत भरून अंतिम करण्याकरिता कळविण्यात आले आहे परंतू दि. २२ ऑक्टोबर, २०२३ रोजीच्या यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार ८८.०८% शाळांची भौतिक माहिती अद्ययावत केलेली आहे, ७६.२७% शाळांमधील शिक्षकांची माहिती अंतिम केलेली आहे, ७१.७०% विद्यार्थ्यांची माहिती अंतिम केलेली आहे. २५,७८८ शाळांनी शिक्षकांची अद्यापपर्यंत माहीती भरण्याकरिता सुरुवातही केली नाही, तर १२,९४७ शाळांनी भौतिक माहिती भरणेकरिता चालढकल करित असल्याकारणाने माहिती पूर्ण न झाल्यामुळे राज्य व केंद्र शासनास सन २०२४-२५ व सन २०२५-२६ समग्र शिक्षा, स्टार्स व PM Shri योजनांचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक सादर करण्यासाठी विलंब होत आहे. याबाबत आपणास कळविण्यात येते की, जिल्ह्यातील शासकीय व अनुदानित शाळांना दि. ३० नोव्हेंबर, २०२३ पर्यंत यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती अंतिम करण्याकरिता कळविण्यात यावे. शाळांनी माहिती अद्ययावत न केल्यास सदर शाळांमधील शिक्षकांचे वेतन अदा करण्यात येवू नये. जिल्हा व तालुका स्तरावरून वेतन पथकांनी सदर शाळांकडून यु- डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांची सर्व माहिती अद्ययावत केल्याचे मुख्याध्यापक यांचेकडून प्रमाणित करून घ्यावे, त्यानंतरच वेतन अदा करण्यासाठी आदेशित करावे. माहिती अद्ययावत न झाल्यास सदर शाळेमधील विद्यार्थी शासनाकडून देण्यात येणाऱ्या लाभापासून (उदा. मोफत गणवेश, पाठयपुस्तके, शैक्षणिक सोयी-सुविधा, स्कॉलरशिप इ.) वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही..

माहिती भरतांना तांत्रिक अडचण येत असल्यास तालुका, जिल्हा व राज्य स्तरावरील टेक्नोसेव्ही शिक्षक, एम.आय.एस. कोऑर्डीनेटर व संगणक प्रोग्रामर यांचेशी संपर्क करण्यात यावा.

सोबत: वरीलपमाणे सहपत्र

(प्रदीपकुमार डांगे, भा.प्र.से.) राज्य प्रकल्प संचालक म.प्रा.शि.प., मुंबई.

परिपत्रक पीडीएफ स्वरूपात वाचण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon