परिपत्रक १३ सप्टेंबर २०२३
महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक
संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे जा.क. राशैसप्रपम/
मूल्यमापन / पायाभूत चाचणी VS४/२०२३-२४/४३४५ दि. १३ सप्टेंबर २०२३ |
प्रति, १)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जि.प. (सर्व), २)
शिक्षणाधिकारी,
बृहन्मुंबई मनपा, ३) शिक्षण निरीक्षक,
मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम), ४)
प्रशासन अधिकारी,
म.न.पा./न.पा./न.प (सर्व), |
विषय: पायाभूत चाचणीचे गुण PAT (महाराष्ट्र)
या चाटबॉटवर नोंदविणेबाबत.... |
संदर्भ
: या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/ मूल्यमापन / पायाभूत चाचणी /
२०२३-२४/३६७५. दि.८ ऑगस्ट २०२३ |
वरील विषयान्वये STARS
प्रकाल्पामधील SIG २ Iimproved
Learning Assessment System नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात
इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्याथ्र्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT)
अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन
चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ चे आयोजन करण्यात येत आहे. उपरोक्त संदर्भानुसार
राज्यात पायाभूत चाचणीचे आयोजन दि. १७ से १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शासकीय व
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व
माध्यम) गणित (सर्व माध्यमा तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची पायाभूत चाचणी
घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत चाचणी शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात
आलेले होते. तसेच चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून
याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील असेही कळविण्यात आलेले होते. विद्या समीक्षा केंद्र (VSK),
पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा
चाटबाट पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर
पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर पायाभूत
चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व
याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक सोबत देण्यात येत आहे. तसेच PAT (महाराष्ट्र) या चदि. १४ सप्टेंबर २०१३ रोजी दुपारी ठीक १२:०० ते ०१:३०
या कालावधीत युट्युबद्वारे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येईल. संबंधित
शिक्षकांना याबाबत प्रशिक्षण युट्युबद्वारे घेण्याबाबत कळविण्यात यावे.
प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी पायाभूत चाचणीचे गुण दि. १४ ते १८ सप्टेंबर
२०२३ या कालावधीत PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणे
आवश्यक आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी
आपल्या कार्यालयातील एका अधिकान्याकडे PAT (महाराष्ट्र)
जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात यावी. सदर जिल्हा समन्वयक यांना
जिल्हातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे
यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा घाटबॉटवर पायाभूत चाचणीचे
गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये
पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता तिसरी ते आठवी शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे
गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक
मदतीसाठी श्री. वेंकटेश अनंतरागन
८०००४२४०७६४ यांचेशी संपर्क करण्यात यावा. तरी
आपल्या अधिनस्थ शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची
आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे. गुण भरण्यासाठी लिंक LINK 👉 यु-ट्यूब लिंक: CLICK HERE PAT
चाटबॉट मार्गदर्शिका CLICK HERE संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे |
चाटबॉटवर
पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना
व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक सोबत देण्यात येत आहे यु-ट्यूब लिंक आणि PAT चाटबॉट
मार्गदर्शिकासाठी खलील CLICK HERE वर टिचकी मारा 👇 |
परिपत्रक ०८ ऑगस्ट २०२३
महाराष्ट्र
शासन शालेय
शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
पुणे ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३० |
विषय
: STARS
प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी आयोजनाबाबत.... संदर्भ
: १. राज्यातील शिक्षणपध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे
बळकटीकरण (Strengthening
Teaching Learning And Results for States) केंद्रपुरस्कृत
प्रकल्प मान्यता देण्याबाबत शासन निर्णय, दिनांक ११
फेब्रुवारी २०२१. २.
राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे
बळकटीकरण (Strengthening Teaching - Learning And Results for States) केंद्र पुरस्कृत प्रकल्प राज्य अनुदान वितरण वित्तीय
नियमावली मार्गदर्शक तत्वे. ३.
STAR प्रकल्प अतर्गत मंजूर PAB मिटिंगचे इतिवृत्त,
दि. ३ मे २०२३` |
वरील
विषयान्वये संदर्भ क्र. २ नुसार STARS प्रकल्प मधील SIG
२ (Improved Learning Assessment systems) २.२
अंतर्गत सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या
विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (PAT) आयोजन
करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यास अनुसरून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात
पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित
मूल्यमापन चाचणी २ अशा तीननियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. सदर
चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या
विषयांच्या इयत्ता तिसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने
इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी
होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होणार
होईल. सदर चाचण्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत यामुळे
विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये. चाचण्यांचा मुख्य उद्देश
विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे
शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती- कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.. पायाभूत
चाचणी उद्देश/ उपयोग / फायदे :- |
१)
विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती संपादणूक पडताळणे २)
अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यासाठीमदत करणारी चाचणी असेल. ३)
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूक
वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मदत होईल. ४)
अध्ययनात मागे असणा-या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून
कृतिकार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस
दिशा प्राप्त होईल. ५)
इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादणूक स्थिती समजण्यास मदत
होईल. |
तीन
नियतकालिक मूल्यांकन चाचण्या (PAT) संभाव्य कालावधी |
अ.क्र. |
तीन
नियतकालिक मूल्यांकन चाचणी प्रकार |
कालावधी |
१ |
पायाभूत
चाचणी |
माहे
ऑगस्ट २०२३ तिसरा आठवडा |
२ |
संकलित
मूल्यमापन चाचणी,
सत्र -१ |
माहे
ऑक्टोबर २०२३ शेवटचा आठवडा किंवा माहे नोव्हेंबर पहिला आठवडा २०२३ |
३ |
संकलित
मूल्यमापन चाचणी,
सत्र -२ |
माहे
एप्रिल २०२४ पहिला / दुसरा आठवडा |
STARS PROJECT PAT CHACHNYA
नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. |
चाचणीचा अभ्यासक्रम : मागील इयत्तेच्या अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती /मुलभूत क्षमता यावर आधारित असेल. |
पायाभूत चाचणी वेळापत्रक 👇 |
Read more .......
Circular DOWNLOAD pdf 👇
मागील
इयत्तेच्या अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती / मुलभूत क्षमता यावर आधारित विद्यार्थ्यांना
ऊपयोगी आशा ऑनलाईन प्रश्न मंजुषा आदर्श उत्तरासह सोडविण्यासाठी हवे असेल त्या इयत्तेवर
टिचकी मारा |
विषय - भाषा मराठी |
चाचणी सोडविण्यासाठी |
इयत्ता |
|
तिसरी |
|
चौथी |
|
पाचवी |
|
सहावी |
|
सातवी |
|
आठवी |
CLICK HERE |
विषय
- गणित |
|
इयत्ता |
|
तिसरी |
|
चौथी |
|
पाचवी |
|
सहावी |
|
सातवी |
|
आठवी |
|
विषय
- तृतीय भाषा इंग्रजी |
|
इयत्ता |
|
तिसरी |
|
चौथी |
|
पाचवी |
|
सहावी |
|
सातवी |
|
आठवी |
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon