DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

UDISEPLUS



महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय 
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

क्र. शिसमा / २०२३ /टि. ८/संचमान्यता / ६४००
दिनांक :२८ डिसेंबर, २०२३ 
प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व) शिक्षण निरिक्षक (पश्चिम/उत्तर/दक्षिण) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व)

विषय :- यु-डायस प्लस प्रणालीवर माहिती नोंदविणेबाबत....

    उपरोक्त विषयाबाबत आपल्या वारंवार सूचना देऊन शंभर टक्के शाळांमधील १०० टक्के विद्याथ्यांची युडायस प्रणालीमधील संबंधित सर्व मुद्दे पडताळणी करुन यु-डायस प्लस प्रणालीवर वर्ग करण्याची कार्यवाही दि.३१.१२.२०२३ पर्यंत करणेबाबत निर्देश देण्यात आलेले होते.
यु-डायस प्रणालीवरील १,०८,३२६ शाळांमधील २,०८,७६, ६२५ विद्यार्थ्यांपैकी २,०३,७७,७३७ विद्याथ्यांची माहिती यु- डायस प्लस प्रणालीमध्ये वर्ग करण्यात आलेली असून अद्यापही ४,९८,८८८ विद्यार्थ्यांची माहिती वर्ग करण्याची कार्यवाही प्रलंबित आहे. यु-डायस प्लस प्रणालीवरील शासकीय ७५,१०३, खाजगी अनुदानित १,५५,४२३, खाजगी विनाअनुदानित ३८,७८५, स्वयंअर्थसहाय्यित २,२३,४४० व अनाधिकृत ६, १३७ विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीवर वर्ग करण्याची कारवाई प्रलंबित आहे.
    यु-डायस प्रणालीवरील माहिती तपासून यु-डायस प्लस प्रणालीमध्ये वर्ग करण्याची कार्यवाही विहित मुदतीत म्हणजेच दि.३१.१२.२०२३ पर्यंत १०० टक्के न झाल्यास राज्याच्या प्राप्त होणाऱ्या परिणाम होणार आहे. तरी, आपल्या सनियंत्रणाखाली असलेल्या शाळांची माहिती १०० टक्के वर्ग करण्याची कार्यवाही दि. ३१.१२.२०२३पूर्वी पूर्ण करणे अनिवार्य असल्याने विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी ऑनलाईन व्ही.सी. व्दारे दररोज क्षेत्रीयस्तरावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा दररोज आढावा घेऊन कार्यवाहीचा संख्यात्मक अहवाल संचालनालयास दररोज सादर करावा. तसेच शिक्षणाधिकारी यांनी क्षेत्रीयस्तरावर दररोज झालेल्या कामाचा ऑनलाईन आढावा घेऊन सदर कामकाज तत्परतेने पूर्ण करण्याची कार्यवाही करण्याबाबत सूचित करावे.
    यु-डायस प्रणालीवरील माहिती यु-डायस प्लस प्रणालीवर १०० टक्के वर्ग करण्याची कार्यवाही दि. ३१.१२.२०२३ नंतर करता येणार नसल्याने सदर काम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने दि. २९.१२.२०२३ या कार्यालयीन दिवसाबरोबर दि. ३०.१२.२०२२ व दि. ३१.१२.२०२३ या अनुक्रमे शनिवार व रविवार या सुट्टी दिवशीचे नियोजन करुन कार्यवाही पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी. आपल्या विभागातील कार्यक्षेत्रामधील यु-डायस प्रणालीवरील माहिती यु-डायस प्लस प्रणालीवर वर्ग करण्याची १०० टक्के कार्यवाही न झाल्यास शासन निर्देशानुसार संबंधितांविरुध्द जबाबदारी निश्चित करण्यात येवून प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे याची गांभिर्याने नोंद घ्यावी.

(संपत सूर्यवंशी) 
शिक्षण संचालक, 
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)


Request Letter of Headmaster for Student Entry Class 2 to 12 in UDISE Plus 2023-24 Not Having National ID
अत्यंत महत्वाचे.
Udise पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांची काही कारणास्तव नोंदणी/एन्ट्री झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांची माहिती खालील लिंकवर भरण्यात यावी. लिंक भरताना सोबतच्या नमुन्यातील मुख्याध्यापक प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. या लिंकमध्ये भरलेल्या माहितीवरून जिल्हास्तरावरून विद्यार्थ्यांची नोंदणी/एन्ट्री केली जाणार आहे.

 लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा



मुख्याध्यापकांचे पत्र नमुना पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा



महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग समग्र शिक्षा

निपुण भारत

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदमुंबई

दिनांक 19 OCT 2023

युडायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून देणेबाबत.


 परिपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 



Also Read

प्रति,

सर्व सन्मा.मुख्याध्यापक

विषय - Udise Plus 2023 मध्ये रक्तगट भरणे बाबतची सूचना बाबत

आताच Mpsp, कार्यालय मुंबई, यांच्या  प्राप्त सूचनानुसार Udise Plus मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा रक्तगट भरताना अडचण येत होती, तरी ज्या विद्यार्थ्याचे रक्तगट मिळवण्यास अडचण येत आहे. त्यांनी सध्या Under Investigation - Result will be updated soon हा ऑप्शन निवडून माहिती पुढे भरावी तसेच रक्तगट माहिती प्राप्त झाल्यास पुन्हा रक्तगट निवडून माहिती Update करून घ्यावी. 

त्यानंतर Facility Profile मध्ये प्रत्येक विद्यार्थी बाबत उंची व वजन ही माहिती सुध्दा Update करून घ्यावी. 

ज्या मुख्याध्यापक यांनी अगोदरच काम केलेले आहे व विद्यार्थी Green दिसत आहे अश्या शाळांना सुद्धा रक्तगट, वजन व उंची हा पर्याय उपलब्ध असून त्यांनी देखील प्रत्येक विद्यार्थी Update करून घ्यावा.

मा. प्रकल्प संचालक

MPSP, मुंबई यांच्या सूचनानुसार



यु-डायस प्लस पोर्टल वर विद्यार्थी promotion / प्रमोट कसे करावे  ?

Udise Plus 2023-24 Students Update promotion

खालील पायऱ्या अनुसरा

https://udiseplus.gov.in

सर्वप्रथम https://udiseplus.gov.in या वेबसाईटवर जाणे. 

 संकेतस्थळाला जोडले जाण्यासाठी

CLICK HERE

त्यानंतर



Student Module निवडा

Select state :Maharahtra.. Go click

MAHARASHTRA टिचकी मारा Click on

तुमच्या शाळा माविद्यालयाचा USER ID PASSWORD CAPTCHA ही माहिती व्यवस्थित भरा

Login for student.... Click

 Sign in

Login टिचकी मारा Click on



२०२३-२४ निवडा

२०२३-२४ click here 

Select class....click

Select division... Click

Progression Activity... Click

विद्यार्थ्यांची नावे येथील

Progression status... Select.. Click... Promoted click

Percentage भरणे राऊंड फिगर मध्ये

No of days साधारणता २२० च्या आसपास भरणे

Schooling status... योग्य पर्याय निवडणे( इयत्ता दहावी साठी लेफ्ट स्कूल विथ टीसी या पर्यायावर क्लिक करणे) 

जर सेम स्कूल असेल तर डिव्हिजन वर क्लिक करणे

Update या बटनावर क्लिक करणे.

यशस्वी असा मेसेज येतो. 

या प्रकारे आपण आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी अद्यावत अपडेट करून घ्यावेत. जेव्हा संपूर्ण शाळेची माहिती अपडेट होईल त्यावेळी फायनलाईज या बटणावर क्लिक केल्यास हे विद्यार्थी यावर्षीचा यु डायस प्लस वर दिसतात. 

 हे ही वाचा UDISE म्हणजे काय ?

CLICK HERE


निपुण भारत

आज़ादी का अमृत महोत्सव

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रिडा विभाग

समग्र शिक्षा

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

अत्यंत महत्वाचे व कालमर्यादित

जा.क्र.मप्राशिप/समग्र शिक्षा/यु-डायस/संगणक/२०२३-२४/2310

दिनांक: - 9 AUG 2023 

प्रति,

१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.

२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व.

३) शिक्षण निरीक्षक - उत्तर, दक्षिण व पश्चिम, मुंबई. ४) शिक्षणाधिकारी/प्रशासनाधिकारी, महानगरपालिका, सर्व.

विषयः सन २०२२-२३ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदविलेल्या ४,०७१ शाळांमध्ये प्रत्येकी १०० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्येत घट झाल्यामुळे करावयाच्या कार्यवाहीबाबत.

संदर्भ: मा. सचिव, शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये दिलेल्या सूचना दि. ०८ ऑगस्ट, २०२३.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सन २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षातील विद्यार्थ्यांची सविस्तर नोंदणी यु-डायस प्लस सन २०२२-२३ मध्ये सुरू आहे. दि. ०८ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या अहवालानुसार ४,०७१ शाळांमध्ये प्रत्येकी १०० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्येने घट झालेली आहे. त्याची यादी आपणास तपासणीसाठी सोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे. व्यवस्थापननिहाय राज्याचा अहवाल पुढील प्रमाणे आहे.

विद्यार्थी माहिती:- Read More DOWNLOAD PDF COPY

परिपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा


महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व किडा विभाग

समग्र शिक्षा

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

मप्राशिप / समग्र शिक्षा/संगणक/U-DISE /2023-24 / 1816

प्रति,

१) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व

२) मा. विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, मुंबई.

३) शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, सर्व.

विषय: यु-डायस प्लस सन २०२२-२३ प्रणालीमध्ये शाळांची माहिती तपासून अंतिम करण्याबाबत. संदर्भ: भारत सरकार, शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र क्रमांक: D.O.No.23-7/2022-Stats दि. 26 जून, 2023.

            यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षक माहिती भरण्याकरिता भारत सरकारकडून माहे जानेवारी, पासून यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सुविधा उपलब्ध करून दिलेली या प्रणालीमध्ये उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार केंद्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना व निर्देशांक (Samagra Shiksha, TARS, Mid Day Meal, PMShri, PGI, SEQI माहितीचा उपयोग होतो. यु-डायस प्रणालीमध्ये पूर्ण न झाल्याने माहे मे, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली परंतु राज्याची अद्यापपर्यंत माहिती पूर्ण न झाल्याने भारत सरकारकडून व्यक्त केलेली आहे.

            सन २०२२-२३ यु-डायस प्लसमध्ये आधार सीडिंग डेटा विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती घेण्यासाठी प्रणालीमध्ये सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आधार सीडिंग डेटानुसार पुढील वर्षामध्ये केंद्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांना निधी मंजूर करणार असल्याबाबत कळविले आहे.केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार आपणास कळविण्यात येते की, दि. ३० जून २०२३ पर्यंत राज्यातील शाळा, विद्यार्थी व शिक्षक माहिती यु-डायस प्रणालीमध्ये आधार सीडिंगकरून पूर्ण करण्यात यावी अन्यथा यु-डायस प्रणालीमध्ये उपलब्ध करून दिलेली माहिती कोणताही बदल करता येणार नाही

सोबत : भारत सरकारकडील अंतिम पत्र. करण्यात येईल व त्यानंतर नोंद घेण्यात यावी.

(सरोज जगताप)

सहा. संचालक (कार्यक्रम) म.प्रा.शि.प., मुंबई.

 दिनांक २८ जून २०२३ चे महत्वपूर्ण परिपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा


महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई दिनांक ०३ फेब्रुवारी २०२३ चे महत्वपूर्ण परिपत्रक
    भारत सरकारकडून प्राप्त झालेल्या सूचनानुसार सन २०२२-२०२३ या वर्षातील सर्व शाळा शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती नोंदणी दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने संगणीकृत करून पूर्ण होईल याबाबत नियोजन करावे जेणेकरून अंतिम माहिती भारत सरकारला वेळेत सादर करणे सोयीचे होईल भारत सरकारकडून याबाबत माहे फेब्रुवारी २०२३ च्या तिसऱ्या आठवड्यामध्ये सर्व राज्यांचा आढावा घेण्यात येणार असल्याची सूचित केले आहे 

UDISEPLUS 

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई 
दिनांक ०३ फेब्रुवारी २०२३ चे महत्वपूर्ण परिपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा
CLICK HERE

हेही वाचाल  

Student Database Management System (SDMS)

यु डायस प्लस  मध्ये लॉग ईन होण्यासाठी लिंक 


महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई दिनांक ३० मार्च २०२१ चे महत्वपूर्ण परिपत्रक वाचण्यासाठी 
 CLICK HERE येथे क्लिक करा सन २०२०-२१ या वर्षाची सर्व शाळांची माहिती यु डायस प्लस या ऑनलाइन प्रणाली द्वारे संगणीकृत करणे बाबत मार्गदर्शक सूचना अवश्य वाचा

  • शाळा स्तरावरून करण्यात येणारी कार्यवाही 
  • केंद्र स्तरावरून करण्यात येणारी कार्यवाही 
  • तालुकास्तरावरून करण्यात येणारी कार्यवाही 
  • जिल्हास्तरावरून करण्यात येणारी कार्यवाही 
  • राज्यस्तरावरून करण्यात येणारी कार्यवाही 
  • यु-डायस माहितीचा उपयोग 

परिपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यु डायस प्लस  UDISE PLUS इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या शाळेशी संबंधित विविध माहिती संकलित करते आणि त्यांना शैक्षणिक श्रेणी आणि प्रकार प्रदान करते.
भारत सरकार शिक्षा मंत्रालयाकडून समग्र शिक्षा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने देशातील सर्व शाळांची माहिती ऑनलाईन पद्धतीने संगणिकृत करण्यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्र भारत सरकार यांच्या साह्याने यु डायस प्लस प्रणाली विकसित केलेली आहे यु डायस प्लस प्रणालीमध्ये संकलित केलेल्या माहितीनुसार समग्र शिक्षा मिड डे मिल योजना शिष्यवृत्ती योजना इत्यादी योजना करिता निधी मंजूर करण्यात येतो यु-डायस प्लस प्रणाली मधून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे केंद्र शासनाकडून समग्र शिक्षा योजनेची वार्षिक नियोजन व अंदाजपत्रकास राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राज्यनिहाय शैक्षणिक निर्देशांक निर्देशांकाची प्रभावीपणे अंमलबजावणी व नियंत्रण करण्याच्या नियोजन केलेले आहे
    राज्यातील पूर्व प्राथमिक इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहे डिसेंबर 2022 पर्यंत टप्प्याटप्प्याने भरण्याकरता कळविण्यात आले आहे प्रथम टप्प्यामध्ये शाळांची प्रोफाइल व शिक्षकांची सविस्तर माहिती नोंदविण्याकरता भारत सरकारकडून प्रभावी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे दिनांक 2 फेब्रुवारी 2023 च्या प्रणालीमधील अहवालानुसार राज्यातील 220 शाळांची प्रोफाइल माहिती भरणे बाकी आहे
राज्य प्रकल्प संचालक मप्राशिप मुंबई

UDISEPLUS UDISE+ UDISEPLUS UDISE UDISE CODE School Directory Management  School Data Capture How to fill up online for udise plus application form Guidelines UDISE Plus Portal udise plus format Unified District System for Education Plus Student Database Management System School Profile & Facilities ManagementThe UDISE PLUS collects different information regarding a school from class 1 to 12 and provides them with educational categories and types
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon