DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Maharaja Sayajirao Gaekwad

Maharaja Sayajirao Gaekwad



Animated Interactive Dynamic 

महाराज सयाजीराव गायकवाड स्मृतिदिन
जन्म - ११ मार्च १८६३ (कवळाणे,नाशिक)
स्मृती - ६ फेब्रुवारी १९३९ (वडोदरा,गुजरात)
वडील : खंडेराव सयाजीराव गायकवाड 
आई : जमनाबाई 
पत्नी : चिमणाबाई 
वारस : प्रतापसिंह गायकवाड
महाराज सयाजीराव गायकवाड यांचा जन्म नाशिकच्या कवळाणे गावी झाला. बडोद्याचे महाराजा खंडेराव गायकवाड यांच्या मृत्यू नंतर बडोद्याच्या राजघराण्यात ते दत्तक गेले आणि महाराजा म्हणून सिहासनावर आरूढ झाले. महाराजा सयाजीराव गायकवाड हे १८७५ ते १९३९ दरम्यान बडोदा संस्थानाचे राजे होते.
    न्यायव्यवस्था, ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन, सक्तीचे प्राथमिक शिक्षण, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण, हरिजनांसाठी शाळा, अस्पृश्यता निवारण, संस्कृत ग्रंथ प्रकाशन, कला शिक्षणाची सोय अशा सुधारणा त्यांनी आणल्या. बालविवाह बंदी, स्त्रियांना वारसाहक्क, विधवा विवाह, कन्याविक्रय बंदी, पडदा पद्धती बंद इ. सुधारणा करून स्त्रियांना आधुनिक युगाचे दालन उघडून दिले. १८८६ मध्ये मुंबई येथील एका समारंभात त्यांनी ज्योतिबा फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी दिली. अशा या आदर्श राजाचे ६ फेब्रुवारी १९३९ रोजी निधन झाले.
त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन !
महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या जीवन कार्यावर व जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी प्रश्न मंजुषा सोडवा आणि आपल्या ज्ञानात भर घाला सर्व इयत्ता व सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्या करीता तसेच भाषण निबंध माहिती या साठी उपयुक्त प्रश्न मंजुषा सोडवा 
प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी 
Solve Quiz Interactive And Animated Questions And Answers 
CLICK HERE  👇

1➤ महाराज सयाजीराव गायकवाड यांचा जन्म कधी झाला ?

=> ११ मार्च १८६३

2➤ महाराज सयाजीराव गायकवाड यांचा जन्म कोठे झाला ?

=> कवळाणे,नाशिक (महाराष्ट्र)

3➤ महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या वडिलाचे नाव काय होते ?

=> खंडेराव सयाजीराव गायकवाड

4➤ महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आईचे नाव काय होते ?

=> जमनाबाई

5➤ महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या पत्नीचे नाव काय होते ?

=> चिमणाबाई

6➤ महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या वारसाचे नाव काय होते ?

=> प्रतापसिंह गायकवाड

7➤ महाराजा सयाजीराव गायकवाड हे ..................... दरम्यान बडोदा संस्थानाचे राजे होते.

=> १८७५ ते १९३९

8➤ महाराज सयाजीराव गायकवाड यांनी कोणत्या सुधारणा केल्या ?

=> न्यायव्यवस्था, ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन, सक्तीचे प्राथमिक शिक्षण, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण, हरिजनांसाठी शाळा, अस्पृश्यता निवारण, संस्कृत ग्रंथ प्रकाशन, कला शिक्षणाची सोय अशा सुधारणा त्यांनी आणल्या.

9➤ महाराज सयाजीराव गायकवाड यांनी स्त्रियांसाठी कोणत्या सुधारणा केल्या ?

=> बालविवाह बंदी, स्त्रियांना वारसाहक्क, विधवा विवाह, कन्याविक्रय बंदी, पडदा पद्धती बंद इ. सुधारणा करून स्त्रियांना आधुनिक युगाचे दालन उघडून दिले

10➤ महाराज सयाजीराव गायकवाड स्मृतिदिन कधी असतो ?

=> ६ फेब्रुवारी १९३९

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon