DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Priyadarshini Mrs Indira Gandhi प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी




 Iron lady of India 
    India's strongest politician Mrs. Indira Gandhi was born on 19 November 1917. Mother Kamala and father Pandit Jawaharlal Nehru. He was blessed with various good things. His birth in the building 'Anand Bhavan' spread a spirit. The grandparents of freedom movement leader Motilalji Nehru and his wife Swarooparani were also very happy. Indira got the name 'Indira' from her grandparents. But Nehru used to call him 'Priyadarshini'.
    Since childhood, the love of 'Swadeshi' and 'Swadesh' was born in his mind. Once a visitor from Wilayat had brought him a beautiful pink frock. But she kept the frock in a corner of the room and sat staring at them. Mother insisted on wearing the frock, "Then I won't wear foreign clothes!" He confirmed this and told his mother. They left their foreign toys and clothes in the foreign clothes holi.
    At the age of thirteen, i.e. in 1930, he established a monkey army of his relatives and worked to convey the messages of the leaders. They took out processions against the British, issued slogans, and continued education along with all these things. Initially he studied at Allahabad, then Pune and later at Rabindranath's Shanti Niketan. In the open environment of Shantiniketan they became vast.
    Through hard work and self-reliance, he also acquired various arts. Even Rabindranath Tagore himself appreciated his success in the art of dance. She was keen to tour India with Shantiniketan's art troupe, but had to go to Switzerland to take care of her mother. And missed his chance to tour India.
His father Nehru was in jail many times as he was a prominent leader in the independence movement. Mother's illness was getting worse. But even in that situation she stood firm, Kamalaji died on February 18, 1936. Then there was a big shock on him. His father tried to put him back in Shantiniketan. But Feroze Gandhi was admitted to 'Oxford' at the behest of a bright young man who was an acquaintance of the Nehru family.
During this period, through the letter which Panditjini sent to Indiraji, he got a full understanding of the history of all India. During this period, Hitler started attacking the British. As the weather worsened, Indiraji returned to India alone by plane. His courage was appreciated by all. Later Feroze Gandhi also came to India. And became active in politics here.
Indirajee married Feroze Gandhi on 26th February 1942 despite the opposition of Vijayalakshmi Krishna. Feroze Gandhi and Indiraji contributed a lot to the movement of this country.
A college student was lathicharged by British soldiers during a procession. But Indiraji was at the forefront. They were also hit. But they did not leave the tricolor, and did not let it fall down. On the contrary, she said to the officer who beat the women, "I am Nehruji's daughter, I am afraid, I will not cry, I will not leave my tricolor flag." Many such stories can be told.
Raising two handsome sons, Rajiv and Sanjeev, they pulled the cart of the world on one side. In 1959, she was elected as the President of the Congress. He did great works. Organization strengthened. In 1960, her husband Feroz Gandhi passed away. Pandit Jawaharlal Ji passed away in 1964. She stood firm despite blows upon blows.
In Lalbahadur Shastri's cabinet, he managed the affairs of the Nabhovani cabinet neatly and played a major role as the first Prime Minister of the country from 24 January 1966 to 24 March 1977 after the death of Shastriji. He implemented the first ten-point program to eradicate poverty. He divided India-hating Pakistan into two parts, ``Bangla Desh'' and ``Pakistan'' by providing military assistance to free the ravaged subjects of East Bengal of Pakistan who were constantly attacking India. Considering his extraordinary performance, the Government of India. He was honored with the "Bharat Ratna" title in 1971.
He called 'Emergency' in 1975 with the intention of bringing the country's economy, which was deteriorating due to continuous strikes and layoffs, to a halt. But the democracy loving people of India were upset by it. In the 1977 Lok Sabha elections, the Congress lost power and the power went to the 'Janata Paksha'. But as the constituent parties of that party started fighting among themselves, Congress won a resounding victory in the 1980 elections. And Indiraji again became the Prime Minister from January 14, 1980 to October 31, 1984.
Just as he implemented schemes for the salvation of the poor, Indian scientists launched satellites into space and created India's dominance in the world.
    In a speech she delivered on October 30, 1984, the day before her assassination, she said, "I died in the service of my country. I will be proud of him. Drop by drop of my blood I will spend for the glory and development of this country, and make this country strong and vibrant."
Mrs. Indira Gandhi was the only long-standing leader of a fragile country like India, i.e. Prime Minister. A woman Prime Minister like her, who threw herself into the freedom movement and worked tirelessly for the development of the country after independence, is hard to find.
Mrs. Indira Gandhi was assassinated on October 31, 1984.
Tribute to Mrs. Indira Gandhi!
Smt Indira Gandhi : Quiz


Solve question MCQs Quiz that shed light on their life work and add to your knowledge Useful question MCQs Quiz for all class and all competitive exams
To solve the question MCQs Quiz

श्रीमती इंदिरा गांधी

जन्म - १९ नोव्हेंबर १९१७
स्मृती - ३१ आक्टोबर १९८४

    भारतातील बलवान राजकारणी श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला.आई कमला आणि वडील पंडीत जवाहरलाल नेहरू. यांच्या कडून विविध उत्तम गोष्टींचे बाळकडू त्यांना जन्म:ता मिळाले. 'आनंद भवन' या वास्तूत त्यांच्या जन्माने एक चैतन्य पसरले. स्वातंत्र्य आंदोलनातील नेते मोतीलालजी नेहरू त्यांच्या पत्नी स्वरुपारांणी या आजी-आजोबांना पण अतिशय आनंद झाला. इंदिरा जींना ‘इंदिरा’ हे नाव आजी-आजोबां कडून मिळाले. पण नेहरू त्यांना 'प्रियदर्शनी' म्हणून बोलवायचे.
    लहानपणा पासून ‘स्वदेशी’ आणि 'स्वदेश' यांचे प्रेम त्यांच्या मनात निर्माण झाले होते. एकदा त्यांच्याकडे विलायतेहून आलेल्या पाहुण्यांनी एक सुंदर गुलाबी फ्रॉक त्यांना आणला होता. पण तो फ़्रॉक खोलीतल्या एकां कोपऱ्यात ठेवून त्या त्यांच्या कडे एकटक पाहात बसल्या. आईंनी तो फ़्रॉक घालण्यास आग्रह केला, "तेव्हा मी विदेशी कपडे परिधान करणार नाही !" असे ठासून त्यांनी आईला सांगितले. आपली विदेशी खेळणी, कपडे त्यांनी विदेशी कपड्यांच्या होळीत टाकून दिले. 
    वयाच्या तेराव्या वर्षी म्हणजे १९३० साली त्यांनी आपल्या सवंगड्यांची वानरसेना स्थापन करून नेत्यांचे संदेश पोचवण्याचे काम केले. ब्रिटिशां विरुद्ध मिरवणुका काढल्या, घोषना दिल्या, या सर्व गोष्टी बरोबर शिक्षणही चालूच ठेवले. प्रारंभी अलाहाबाद, मग पुणे व नंतर रविंद्रनाथांच्या शांती निकेतन मध्ये त्यांनी शिक्षण घेतले. शांतीनिकेतनातल्या मुक्त वातावरणात त्या विशाल बनल्या. 
    कष्ट, स्वावलंबनाच्या जोरावर त्यांनी विविध कलाही आत्मसात केल्या. नृत्याच्या कलेतील त्यांच्या यश्याचे तर खुद रविंद्रनाथ टागोरांनी कौतुक केले होते. शांतीनिकेतनाच्या कला पथकातून भारतभ्रमण करायला त्या उत्सुक होत्या, पण त्यांना त्यांच्या आईच्या सुश्रुषेसाठी त्यांना स्वित्झरलंड ला जावे लागले. आणि त्यांची भारत भ्रमणाची संधी हुकली. 
    स्वातंत्र आंदोलनातील प्रमुख नेते असल्यामुळे त्यांचे वडील नेहरू बऱ्याच वेळी तुरुंगात असायचे. आईचे आजारपण तर बळावतच चालले होते. पण त्याही प्रसंगात त्या ठामपणे उभ्या राहिल्यात, १८ फेब्रुवारी १९३६ रोजी कमलाजींचे निधन झाले. तेव्हा त्यांच्यावर खूप मोठा आघात झाला. वडिलांनी त्यांना पुन्हा शांतीनिकेतन मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. पण फिरोज गांधी नेहरू घराण्यातील परिचित असलेल्या हुश्यार अन उमद्या तरुणाच्या सांगण्या वरून त्यांना 'ऑक्सफ्रर्ड' मध्ये दाखल करण्यात आले. या काळात पंडीतजिनी इंदिराजींना जी पत्र पाठविली त्याद्वारे त्यांना सबंध भारताच्या इतिहासाची पुरेपूर जाणीव झाली. याच काळात हिटलर ने इंग्रजवर हल्ले चढवायला प्रारंभ केला. वातावरण चिघळत चालले, म्हणून विमानाने एकट्या इंदिराजी भारतात परत आल्या. त्यांच्या साहसाचे साऱ्यांनी कौतुक केले. मागोमाग फिरोज गांधीही भारतात आले. आणि येथील राजकारणात सक्रीय झाले. 
    विजयालक्ष्मी कृष्णा या आत्यांचा विरोध असतानाही इंदिराजीनचा २६ फेब्रुवारी १९४२ रोजी फिरोज गांधी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. फिरोज गांधी व इंदिराजी यांनी या देशाच्या चळवळीत मोठे योगदान दिले. एका मिरवणुकीत ब्रिटीश सोल्जरांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर लाठीमार केला. पण त्यात अग्रभागी इंदिराजी होत्या. त्यांनाही मार लागला. पण त्यांनी तिरंगा सोडला नाही, व तो खालीही पडू दिला नाही. उलट स्त्रियांवर लाठीमार करणाऱ्या त्या अधिकाऱ्याला त्या म्हणाल्या “मी नेहरूजी कि कन्या हुं, मै डरुंगी नही, मै चिल्लाउंगी नही, अपना तिरंगा झेंडा छोडुंगी नही।” अश्या अनेक शोर्याच्या गोष्टी सांगता येतील. 
    राजीव आणि संजीव या दोन देखण्या मुलांना वाढवत त्यांनी एकीकडे संसाराचा गाडा ओढला. १९५९ साली त्या काँग्रेस च्या अध्यक्षा म्हणून निवडल्या गेल्या. त्यांनी प्रचंड कामे केली. संघटण मजबूत केले. १९६० ला पती फिरोज गांधी यांचे निधन झाले. १९६४ साली पंडीत जवाहरलालजींचे निधन झाले. आघातंवर आघात होत असतानाही त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या.
    लालबहाद्दूर शास्त्रींच्या मंत्रीमंडळात त्यांनी नभोवाणी मंत्री मंडळाचा कारभार नेटकेपणाने सांभाळला आणि शास्त्रीजीच्या मृत्यूनंतर २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ पर्यंत देश्याच्या पहिल्या पंतप्रधान म्हनून त्यांनी मोठी भूमिका बजावली. त्यांनी गरिबी हटवन्या करीता प्रथम दहाकलमी कार्यक्रम राबविला. सतत भारतावर आक्रमण करणाऱ्या पाकीस्थांनच्या पूर्व बंगाल मधील गांजलेल्या प्रजेला स्वतंत्र करण्यासाठी लष्करी मदत करून त्यांनी भारत द्वेष्ट्या पाकीस्तान चे ‘बांगला देश' व ‘पाकीस्तान‘ असे दोन तुकडे केले. त्यांची असामान्य कामगिरी लक्षात घेऊन भारत सरकारने। त्यांना १९७१ मध्ये ”भारतरत्न” किताबाने सन्मानित केले. 
    सततचे संप व टाळेबंदी या मुळे देश्याची बिघडू लागलेली अर्थव्यवस्था ताळ्यावर आणण्याच्या हेतूने त्यांनी १९७५ मध्ये 'आणीबाणी‘ पुकारली. पण भारतातील लोकशाही प्रेमी जनता त्यामुळे नाराज झाली. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला हार खावी लागून ‘जनता पक्ष्या‘ च्या हाती सत्ता गेली. पण त्या पक्षाचे घटक पक्ष आपापसात भांडू लागल्याने १९८० च्या निवडणुकीत कॉंग्रेसने दैदिप्तमान विजय मिळविला. व इंदिराजी पुन्हा १४ जानेवारी १९८० ते ३१ आक्टोंबर १९८४ पर्यंत पंतप्रधान झाल्या. 
    त्यांनी गरिबांच्या उद्धारासाठी जश्या योजना कार्यान्वित केल्या, त्याच प्रमाणे भारतीय वैज्ञांनिकाच्या कडून अवकाशात उपग्रह सोडून जगात भारताचा दबदबा निर्माण केला. 
    आपल्या हत्तेच्या आदल्या दिवशी ३० आक्टोंबर १९८४ रोजी त्यांनी केलेल्या एका भाषणात त्या म्हणाल्या होत्या, ”माझ्या देश्याची सेवा करताना मला मृत्यू आला. तर मला त्याचा अभिमानच वाटेल. माझ्या रक्ताचा थेंब अन थेंब मी या देश्याच्या वैभवासाठी आणि विकासासाठी खर्च करीन, आणि हा देश बलवान व चैतन्यदायी बनवेन." 
    भारता सारख्या खंड्प्राय देश्याच्या दीर्घकाळ राहिलेल्या एकमेव नेता म्हणजेच पंतप्रधान म्हणून श्रीमती इंदिरा गांधी ह्या होत. स्वातंत्र्य चळवळीत झोकून देणारी आणि देश स्वतंत्र्य झाल्यावर त्याच्या विकासासाठी अविरत झटणारी त्यांच्या सारखी स्त्री पंतप्रधान तर शोधूनही मिळायची नाही. 
श्रीमती इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी हत्या करण्यात आली. 
श्रीमती इंदिरा गांधी यांना आदरांजली !

संदर्भ : इंटरनेट

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon