DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

HSC STUDENTS Pandit Deendayal Upadhyay

बारावीनंतर विद्यार्थ्यांना ५१ हजारांचा भत्ता

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना :

काय आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना ?

बारावीनंतर विविध पदवी, पदव्युत्तर पदवी त्याप्रमाणे १०वी आणि १२ वीच्या गुणांवर आधारित पदविका शिक्षण घेण्याकरता ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्याथ्र्यांना हॉस्टेलची सोय आणि निर्वाहभत्ता देणे, हा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सरकारने पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना सुरू केली आहे. त्यानुसार शहरामध्ये शिक्षण घेत असलेल्या, परंतु ज्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा आदिवासी विद्यार्थ्यांना या योजनेतून रोख रक्कम देण्यात येते. मिळालेल्या रोख रकमेतून विद्याथ्यांना त्याच शहरात निवासाची सोय करता यावी, हा या योजनेमागील मुख्य हेतू आहे.

कागदपत्रे काय लागणार?

आधार कार्ड, जातप्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, स्कूल मार्क पत्रके, बोनाफाइड प्रमाणपत्र, खाते क्रमांक, आयएफएससी कोड, एनआयसीआर कोड

५१ हजारांचा भत्ता भोजन भत्ता २८ हजार शिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना भोजनाचा येणारा खर्च हा जास्त असतो. त्यासाठी २८ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

निवास भत्ता १५ हजार या दरम्यान शहरात राहण्यासाठी येणारा खर्च भागावा म्हणून शासनाच्या वतीने प्रतिवर्ष २५ हजार रुपये निवास भत्ता दिला जातो.

निर्वाह भत्ता ८ हजार या दरम्यान शिक्षणासाठी तसेच वैयक्तिक वापराच्या वस्तू खरेदी करता याव्यात, यासाठी आठ हजार रुपये प्रतिवर्ष असा निर्वाह भत्ता दिला जातो..

कोणाला मिळणार लाभ ?

विद्यार्थी यासाठी तो ६० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असावा. त्याच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे२८ वर्षापेक्षा कमी वय असेल तरच या योजनेचा लाभ घेता येईल. शिक्षणात खंड असेल अथवा मध्यावधी प्रवेश घेतला असेल तरीही विद्यार्थी योजनेस पात्र असेल. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना लाभ धनगर समाजातील विद्यार्थ्याला हा लाभ मिळतो. 

अर्ज कोठे करायचा?


आम्हाला जॉईन व्हा! 
नोकरीविषयक 🎓

सर्वप्रथम, योजनेच्या अधिकृत स्वयं महाऑनलाइन संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर खाली Login to your Account हे पृष्ठ प्रदर्शित होईल. स्क्रीनच्या उजव्या बाजूला, ग्रीन कलर बॉक्स अस्तित्वात आहे, जो वेबसाइटवर अपडेट दर्शवितो. विद्यार्थ्यांच्या तारखा, अनिवार्य गोष्टी आदी...

प्रथमच अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांने नवीन विद्यार्थी (New student) म्हणून रजिस्ट्रेशन पर्याय निवडावा. त्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन

 पृष्ठ उघडेल, त्यामध्ये आधार क्रमांक, नाव, मोबाइल नंबर, लिंग, जन्मदिनांक, पासवर्ड आदी माहिती भरावी. त्यानंतर save या बटणावर क्लिक करावे. अशा प्रकारे तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल...

Also Read -
पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा Pandit Deendayal Upadhyay Online Job Fair
पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 
Pandit Deendayal Upadhyay Online Job Fair
Rojgar Mahaswayam
ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन !!
रोजगार आणि स्वयं रोजगाराची सुवर्णसंधी
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार आणि स्वयंरोजगार मेळावा,
प्रधानमंत्री कौशल विकास योजना, कौशल्य, उद्योजगता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य
जिल्हाधिकारी व महानगरपालिका नागपूर द्वारा आयोजित
फॉर्च्युन फाऊंडेशन प्रस्तुत
यूथ एंपावरमेंट समिट २०२३
दि. १७, १८ आणि १९ फेब्रुवारी २०२३
सुचना 
नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, अकोला मधील युवक आणि युवतींसाठी
सामान्यांसाठी वय मर्यादा किमान १८ वर्षे पूर्ण ते ३५ वर्षे आणि दिव्यांगांसाठी किमान वय मर्यादा १८ वर्षे पूर्ण असणे गरजेचे
सर्व इंटरव्यू आमदार निवास नागपूर येथे होतील, आपल्याला इंटरव्यू ची तारीख आणि वेळ SMS मार्फत कळवण्यात येईल.
इंटरव्यू ला येताना बायोडेटाच्या किमान ५ प्रती सोबत आणाव्यात 
नोंदणीसाठी 👇

जाहिरात पाहण्यासाठी 

✅ नोंदणी करण्यासाठी 


आम्हाला जॉईन व्हा! 
नोकरीविषयक 🎓
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon