DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

भारतीय वायुसेना दिन : प्रश्नमंजुषा Indian Air Force Day Quiz

 Indian Air Force Day

 भारतीय वायुसेना दिन : प्रश्नमंजुषा 

                                             स्पृशं दीप्तम् 

 दि ०८ ऑक्टोबर १९३२ रोजी अधिकृतपणे ब्रिटिश साम्राज्याचे सहाय्यक हवाई दल म्हणून स्थापन करण्यात आले ज्याने दुसऱ्या महायुद्धात भारताच्या विमानसेवेला रॉयल उपाधीने सन्मानित केले.
                 भारतीय हवाई दलाचे ब्रीदवाक्य नभः स्पृशं दीप्तम्  आहे
HAL HF-24 Marut  हे १९६० चे भारतीय लढाऊ-बॉम्बर विमान आहे. हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड (HAL) ने विकसित केले आहे, ज्यात कर्ट टँक मुख्य डिझायनर आहे. हे पहिले भारतीय-विकसित जेट विमान आहे, आणि चाचणीच्या टप्प्यापलीकडे आणि यशस्वी उत्पादन आणि सक्रिय सेवेमध्ये जाणारे पहिले +
        आशियाई जेट लढाऊ विमान आहे. १७  जून  १९६१ रोजी, प्रकाराने आपले पहिले उड्डाण केले  ०१ एप्रिल १९६७  रोजी, पहिले उत्पादन मारुत अधिकृतपणे IAF ला देण्यात आले.

ज्ञानयात्री तंत्रस्नेही  समुहाचा उपक्रम

         आजची विशेष माहिती

✈️आज ८ ऑक्टोबर

वायुसेना दिन

भारतीय वायुसेनेचे ध्येय वाक्य आहे :

नभ:स्पृशं दीप्तम्।
हे वाक्य गीतेतल्या एका श्लोकात आले आहे. श्लोक असा -
नभ:स्पृशं दीप्तमनेकवर्णं
व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा
धृतिं न विन्दामि शमं च विष्णो॥
                         ....भगवद्गीता ११.२४

---भारताचे भूतपूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन् ह्यांनी हे वाक्य सुचविले.

अर्थ :- हे विष्णो, आकाशस्पर्शी ज्योतीसारख्या आणि अनेकवर्णयुक्त, उघडया मुखाच्या आणि प्रज्वलित विशाल नेत्रांच्या तुला पाहून भयभीत झालेल्या मजमध्ये धैर्य आणि शांती नाहीसे झाले आहेत.

इतिहास
८ ऑक्टोबर, इ.स. १९३२ मध्ये भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते. १२ मार्च इ.स. १९४५ रोजी वायुदलाचे नाव रॉयल इंडियन एयर फोर्स झाले.
विमाने
     इ.स. १९४७ मध्ये विमानांना पिस्टन वर चालणारी इंजिने बसवलेली असत. जेट इंजिनांच्या आगमनानंतर त्याची जागा नंतर वेगवान जेट विमानांनी घेतली. प्रथम नॅट, हंटर, कॅनबेरा यासारखी ब्रिटिश बनावटीची विमाने वायुसेनेत सहभागी केली गेली. त्या नंतर तंत्रज्ञानाच्या कसोटीवर नंतर त्यांची जागा फ्रेंच बनावटीच्या विमानाने घेतली. भारतीय परराष्ट्र धोरणामुळे आणि रशियाने उत्तम सहकार्य केल्याने दणकट बनावटीची रशियन लढाऊ आणि मालवाहू विमाने सहभागी करण्यात आली. तसेच रशियन हेलिकॉफ्टर्स सहभागी करण्यात आली.
      सद्याच्या काळात आधुनिक रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर सी-४ आय ही संगणकीय प्रणाली वायुसेनेकडे आहे. हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी इत्यादी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे सेनेत सहभागी करण्यात आली आहेत. तसेच अत्याधुनिक लढाऊ विमानांची भर पडल्यामुळे भारतीय वायुसेना जगातील सर्वोच्च व सर्वोत्तम वायुदल आहे.
भारतीय वायुसेना दिन : प्रश्नमंजुषा  Indian Air Force Day Quiz
प्रश्न मंजुषा सोडवा 
 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon