DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

विषुवदिन शरदसंपात Sharad Sampat Vishuvdin Autumnal Equinox

 विषुवदिन 
 शरदसंपात 
 Autumnal Equinox 

  विषुवदिन किंवा वसंतसम्पात / शरदसंपात प्रश्न मंजुषा सोडवा  

 प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी खालील CLICK HERE वर टिचकी मारा 

 सर्व स्पर्धा परीक्षा  देणाऱ्या व सर्व इयत्तांच्या विद्यार्थ्यासाठी उपयुक्त प्रश्न मंजुषा 

    दि. २३ सप्टेंबर ला विषुवदिन आहे. ह्या दिवशी आकाशात सूर्य बरोबर प्रुथ्वीच्या विषव्रुत्तासमोर असतो, म्हणजे प्रुथ्वीचा केंद्रबिंदू-विषव्रुत्त- सूर्याचा केंद्रबिंदू-सूर्याचे विषव्रुत्त हे एका रेषेत व एका प्रतलाय असतात.अशी स्थिती वर्षातून दोन वेळा येते म्हणजे विषुवदिन वर्षातून दोन वेळा येतात. एकदा मार्च महिन्यात व दुसऱ्यांदा सप्टेंबर महिन्यात. ह्यापैकी मार्च येणाऱ्या विषुवदिनाला मराठीत वसंत संपात तर इंग्रजीत Vernal Equinox म्हणतात, तर सप्टेंबर मध्ये येणाऱ्या विषुवदिनाला मराठीत शरदसंपात तर इंग्रजी मध्ये Autumnal Equinox म्हणतात. Equinox हा लँटिन शब्द असून Equi म्हणजे equal व Nox म्हणजे night. म्हणजे equal night & day म्हणजे रात्र व दिवस समान कालावधीचा असणे. आजच्या दिवशी संपूर्ण प्रुथ्वीवर रात्र व दिवस हे समान म्हणजे १२ + १२ तासाच्या कालावधीतचे असतात. आजच्या दिवशी उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवादरम्यानच्या भागात सूर्य ( नाममात्र १० मिनिटाचा फरक सोडल्यास ) एकाच वेळेलाच उगवतो व एकाच वेळेला मावळतो. हे शरद संपात व वसंत संपात बिंदू स्थिर नाहीत. ते दरवर्षी ५०.२ कोनीय सेकंदानी मागे सरकतात.
पुढील ५ वर्षातील शरदसंपात विषुवदिन.
१) शनिवार २३ सप्टेंबर २०२३.
२) रविवार २२ सप्टेंबर २०२४.
३) सोमवार २२ सप्टेंबर २०२५.
४) बुधवार २३ सप्टेंबर २०२६.
५) गुरूवार २३ सप्टेंबर २०२७.

  विषुवदिन किंवा वसंतसम्पात / शरदसंपात प्रश्न मंजुषा सोडवा  

 प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी खालील CLICK HERE वर टिचकी मारा 


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon