ReadToMe
ReadToMe आता Android ॲप मध्ये उपलब्ध
Read To Me: Student Edition
Read To Me Teacher Dashboard
रिड टू मी स्टुडंट एडिशन
इंग्लिश भाषा वाचन आणि आकलनासाठी Read to me: Student Edition हे एक अत्यंत
महत्वपूर्ण असे ॲप आहे. महाराष्ट्र शासन आणि इंग्लिश हेल्परच्या वतीने
सुरू करण्यात आलेले हे ॲप सर्व मंडळांच्या सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिली
ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इंग्लिश विषयाचा
पाठ्यक्रम या ॲपवर उपलब्ध असून अनेक फीचर्सने युक्त असे हे क्रांतिकारी ॲप
प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपापल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून
घ्यावे. हे ॲप कसे डाउनलोड करायचे हे समजून घेण्यासाठी हा खालिल CLICK HERE वर टिचकी मारून व्हिडीओ अवश्य पहा.
राज्यातील २०००० पेक्षा अधिक शाळांनी 'Right to Read' या प्रकल्पांतर्गत 'ReadToMe' या software चा लाभ घेतला आहे. महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार करून EnglishHelper ने आता हे software विद्यार्थी आवृत्तीच्या स्वरुपात Android फोनसाठी देखील उपलब्ध करून दिले आहे.
इंग्रजीचे वाचन व आकलन सुधारण्यासाठी सदर अॅप उपयुक्त असून राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात आपल्या शाळांची संपादणूक वाढविण्यासाठी त्याचा अवश्य लाभ घेण्यात यावा. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणामध्ये प्रामुख्याने आकलनासह वाचन कौशल्यावर भर आहे.
ReadToMe च्या विद्यार्थी आवृत्तीची (Students' Edition) वैशिष्ट्ये
१. इंग्रजी भाषा पाठ्यपुस्तकातील सर्व घटकांचा समावेश
२. इयत्ता १ली ते १२वी च्या सर्व पाठ्यपुस्तकांचा समावेश
३. वाचन होत असलेला शब्द ठळक दाखविला जातो त्यामुळे शब्द व उच्चार साहचर्य निर्माण होते.
४. चित्रमय शब्दकोषामुळे आकलन सुलभ होते.
५. शब्दकोष अॅपमध्येच उपलब्ध असल्यामुळे वेगळ्या शब्दकोषाची (dictionary) गरज नाही.
६. शब्दाचे स्पेलिंगसह उच्चारण ऐकण्याची सुविधा
७. वाचनाचा वेग नियंत्रित (कमी-अधिक) करता येतो.
८. पाठ्यपुस्तकासोबतच इतरही काही संसाधने (Resources) उपलब्ध
९. विद्यार्थ्यांच्या वापराचे संनियंत्रण (Monitoring) शिक्षकांना सहज शक्य
लाभार्थी शाळा :
१) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा इ.१ली ते १२वी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, कटक मंडळे
२) आदिवासी विकास विभागाच्या सर्व शाळा
३) समाजकल्याण विभागाच्या सर्व शाळा
४) सर्व अनुदानित शाळा
हे सर्व लाभ कसे मिळवायचे ?
हे सर्व जाणून घेण्यासाठी
खालील दुव्याचा (लिंकचा) वापर करून पाहायला विसरू नका.
सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, इ.१ली ते १२वी च्या वर्गांना इंग्रजी भाषा शिकविणारे सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच सर्व पर्यवेक्षीय अधिकारी (विस्तार अधिकारी [शिक्षण], गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी) तसेच सर्व अधिव्याख्याता, ज्येष्ठ अधिव्याख्याता, विषय सहाय्यक, विषय साधन व्यक्ती, विशेष साधन व्यक्ती (समावेशित शिक्षण), विशेष शिक्षक यांनी पूर्ण प्रक्रिया समजून घ्यावी.
ReadToMe विद्यार्थी आवृत्तीचा अधिकाधिक वापर करून राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणामध्ये आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर आणण्याचा संकल्प करूया !
दुवा (लिंक): Link
Read To Me: Student Edition
सर्व माध्यमांच्या, सर्व बोर्डांच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश वाचन
व आकलन सुधारण्यासाठीचे Read To Me Student Edition हे एक अत्यंत
महत्वपूर्ण ॲप आहे. ॲप DOWNLOAD करण्यासाठी खालिल CLICK HERE वर टिचकी मारा
हे ॲप डाऊनलोड करण्यासाठीची महत्वपूर्ण लिंक Link
Read To Me: Teacher Dashboard
इयत्ता पहिली ते बारावीच्या प्रत्येक शिक्षकासाठी महत्वपूर्ण असलेले Read To Me Teacher Dashboard डाऊनलोड करण्यासाठीची लिंक Link
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon