Acharya Vinoba Bhave Quiz
आचार्य विनोबा भावे : प्रश्नमंजुषा
Acharya Vinoba Bhave Quiz
विनायक नरहरी भावे Vinoba Narhari Bhave
गाथा बलिदानाची
विनम्र अभिवादन !
आचार्य विनोबा भावे स्मृतिदिन
************************
जन्म - ११ सप्टेंबर १८९५
स्मृती - १५ नोव्हेंबर १९८२
थोर गांधीवादी आचार्य आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक विनोबा भावे यांचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ रोजी झाला.
भगवद्गीतेचे सार सोप्या रसाळ शैलीत ‘गीताई’ आणि ‘मधुकर’ सारख्या ग्रंथांतून सांगणार्या विनोबांची भेट ७ जून १९१६ रोजी मोहनदास गांधी नावाच्या एका महात्म्याशी झाली आणि त्यांच्या आयुष्यानेच एक नवे वळण घेतले. त्याक्षणापासून ब्रह्मचर्याची शपथ घेऊन त्यांनी जीवनसाधनेस सुरूवात केली.
वाई मुक्कामी स्वामी केवलानंद सरस्वतींच्या चरणाशी उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, शांकरभाष्य व पांतजलयोगाचे शिक्षण घेतले. पुढे १९२१ मध्ये जमनालाल बजाजांनी साबरमतीच्या आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. तिचे संचालक म्हणून ८ एप्रिल १९२१ रोजी महात्माजींच्या १९४० त्या वैयक्तिक सत्याग्रहाचे गांधीजींनी निवडलेले पहिले ते सत्याग्रही होते.
विनोबांनी १९५१ ते ५३ हा भूदान यात्रेचा कालावधी वगळता सारे आयुष्य वर्ध्याच्या पवनार आश्रमात काढले. भारत सरकारने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देऊन सन्मान केला.
विनोबा भावे यांचे १५ नोव्हेंबर १९८२ रोजी निधन झाले.
विनोबा भावे यांना आदरांजली !
*संदर्भ : इंटरनेट*
आचार्य विनोबा भावे यांचे जीवन चरित्रावर व जीवन कार्यावर अधारीत प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी खालिल
CLICK HERE वर टिचकी मारा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon