DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ Reconstructed Bridge Study

सेतू अभ्यास अभ्यास परिपत्रक डाऊनलोड येथे करा. खालिल CLICK HERE वर टिचकी मारा आणि डाऊनलोड येथे करा. 

👆दि. २७/०६/२०२२ चे परिपत्रक Bridge Course 

 पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत. 

 सेतू अभ्यास अभ्यास उत्तर चाचणी उपलब्ध झाली आहे 

खालिल CLICK HERE वर टिचकी मारा आणि डाऊनलोड येथे करा. 

सर्व इयत्तेच्या व सर्व विषयाच्या pdf
मराठी इंग्रजी हिंदी उर्दू माध्यमाच्या pdf
सेतू  अभ्यासक्रम उत्तरचाचणी
सर्व माध्यमांच्या
सर्व इयत्तेच्या
सर्व विषयांच्या


सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी नंतरची  विद्यार्थी अध्ययन स्थिती तपासणे बाबत परिपत्रक 

  

दि. ०३/०६/२०२२ चे परिपत्रक Bridge Course 

मार्गदर्शक व्हिडिओ पहावा 

 

पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022-2023 
Bridge Course 2022-2023

 कृती पत्रिका व पूर्व चाचणी उपलब्ध करून देण्यात आली आहे डाऊनलोड करा 

इयत्ता २ री ते १० वी विषय  मराठी , गणित ,इंग्रजी , विज्ञान 



 

पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणे बाबत

पुनर्रचित सेतू अभ्यास - २०२२-२३
पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत.. 
दि. ०३/०६/२०२२ चे परिपत्रक
CLICK HERE
 
पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत..
पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची सुरुवात ९ जून पासून शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी
इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी
• पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३० दिवसांचा
• मराठी,उर्दू आणि इंग्रजी माध्यमासाठी
 पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची शालेय स्तरावर अंमलबजावणी
 इ.2री ते इ.10वी साठी
 सेतू अभ्यास नियोजन
17 व 18 जून ला पूर्व चाचणी
20 जून ते 23 जुलै सेतू अभ्यास
25 जुलै ते 26 जुलै उत्तर चाचणी
 महत्त्वाच्या सूचना व शासन परिपत्रक
 विदर्भातील शाळांसाठीचे नियोजन
1 व 2 जुलै ला पूर्व चाचणी
4 जुलै ते 6 ऑगस्ट सेतू अभ्यास
8 ते 10 ऑगस्ट उत्तर चाचणी
    कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षामध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. या आव्हानात्मक परिस्थितीमुळे विद्यार्थ्याचा अध्ययन -हास झालेला आहे हे विविध सर्वेक्षणानुसार निदर्शनास येत आहे. तसेच, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी दिसून येत आहे. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. राज्यस्तरावरून ‘शाळा बंद पण शिक्षण सुरु” या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून सुरु राहावे याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांचा झालेला हा अध्ययन -हास भरून काढण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यस्तरावरून विकसित केलेल्या ४५ दिवसांच्या सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आलेली होती. सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास करण्यात आलेला असून यामध्ये सेतू अभ्यास परिणामकारक असल्याचे निष्कर्ष मिळालेले आहेत.
    शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शाळा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरु झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडसर निर्माण झाले आहेत . त्यामुळे राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ही सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पुनर्रचित सेतू अभ्यासाचे स्वरूप
१. इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.

२. सदर अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमतांवर आधारित आहे.

३. पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर अभ्यास मराठी,उर्दू आणि इंग्रजी माध्यमासाठी तयार करण्यात आलेला आहे.

४. सदर पुनर्रचित सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यासाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.

५. सदर पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे.तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.

६. सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे.

७. पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्व चाचणी परिषदेच्या   CLICK HERE  या संकेतस्थळावर दि. ९ जून पासून उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उत्तर चाचणी दि. २३ जुलै / दि.६ ऑगस्ट, २०२२ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

सेतू अभ्यास परिपत्रक अभ्यास परिपत्रक डाऊनलोड येथे करा. 
 
 
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon