DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Bridge Course सेतू अभ्यास २०२३ - २०२४ उद्बोधन

सेतू अभ्यासक्रम 2023-2024 (Bridge Course 2023-2024)
इयत्ता २ री ते ते १०
मराठी माध्यम
उर्दू माध्यम
सेतू अभ्यास पूर्व चाचणी : मराठी माध्यम
इयत्ता २ री ते ते १०
गणित मराठी इंग्रजी विज्ञान सामाजिक शास्त्र
सेतू अभ्यास पूर्व चाचणी : उर्दू माध्यम
इयत्ता २ री ते ते १०
इंग्रजी

सेतू अभ्यास डाऊनलोड येथे करा. खालिल CLICK HERE वर टिचकी मारा आणि डाऊनलोड करा. 

CLICK HERE

सेतू अभ्यास २०२३ - २०२४ उद्बोधन

Bridge Course

Maharashtra State Council of Educational Research & Training (SCERT)

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांचे कडून 

आज दिनांक २७ जून २०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता मार्गदर्शन

WATCH VIDEO 👉  CLICK HERE


सेतू अभ्यासक्रम Bridge Course 

सेतू अभ्यास अभ्यास 

दि. २७/०६/२०२२ चे परिपत्रक Bridge Course 

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र

विषय :- सेतू अभ्यास (Bridge course) २०२३-२४ ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत.....

संदर्भ :- १. सन २०२३-२४ करिता केंद्रीय प्रकल्प मान्यता मंडळाची (PAB) ऑनलाईन बैठक दि. ११/०१/२०२३.

२. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र दि. १३/२/२०२३

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी दिसून येत आहे. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. यासठी मागील दोन वर्षात ऑनलाईन स्वरुपात सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास करण्यात आलेला असून यामध्ये सेतू अभ्यास परिणामकारक असल्याचे निष्कर्ष मिळालेले आहेत. त्यामुळे या वर्षीही सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यासाठी सेतू अभ्यास छापील स्वरुपात देण्यात येत आहे. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय शाळा याचा

शैक्षणिक वर्ष २०२३ - २४ मध्ये मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यासाठी सेतू अभ्यास छापील स्वरुपात देण्यात येत आहे. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय शाळा याचा समावेश असणार आहे. अन्य शाळा व्यवस्थापनासाठी सेतू अभ्यास परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार त्याचा वापर शाळा/संस्था करू शकतात.

सेतू अभ्यास (२०२३-२४ ) स्वरूप :-

१. सदर सेतू अभ्यास हा २० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर सेतू अभ्यास मराठी आणि उर्दू माध्यमासाठी तयार करून छापील स्वरुपात देण्यात आलेला आहे.

२. इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी प्रथम भाषा, गणित, आणि इंग्रजी तर इयत्ता सहावी ते दहावीसाठी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.

३. सदर सेतू अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहे.

४. सदर सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यास पुस्तिकेच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.

५. सदर सेतू अभ्यासातील कृतिपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता काही विषयांनी ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.

६. सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे. त्यानुसार शिक्षकांनी सदर सेतू अभ्यास विद्यार्थ्याकडून सोडवून घेणे आवश्यक आहे.

७. पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त सेतू अभ्यासाची पूर्व चाचणी परिषदेच्या CLICK HERE या संकेतस्थळावर दि. २७ जून २०२३ पासून उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच उत्तर चाचणी दि. २४ जुलै २०२३ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील.

सेतू अभ्यास (२०२३-२४) अंमलबजावणी कालावधी

सेतू अभ्यास (२०२३-२४) अंमलबजावणी कालावधी

अ.क्र.

करावयाची कार्यवाही

अंमलबजावणी कालावधी

०१

पूर्व चाचणी

दि. ३० जून ते ३ जुलै २०२३

०२

२० दिवसांचा सेतू अभ्यास

दि. ४ जुलै ते २६ जुलै, २०२३.

०३

उत्तर चाचणी

दि. २७ ते ३१ जुलै २०२३.


सेतू अभ्यासाची अंमलबजावणी :- १. सदर सेतू अभ्यास मराठी व उर्दू व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी.

२. सदर सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात.

३. मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या २० दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात याची.

४. सदर कृतिपत्रिका ( worksheets) शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्यात.

५. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे अपेक्षित आहे. काही विषयातील अधिक माहिती घेऊ या मधील प्रश्न विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात.

६. सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चाचणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात. पूर्व व उत्तर चाचणी गुणांचा तुलनात्मक तक्ता तयार करून शिक्षकांनी आपल्या स्तरावर ठेवावा.

७. सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करावी.

उपरोक्त प्रमाणे सदर सेतू अभ्यासाबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक तसेच संबंधित पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्वाना अवगत करावे. सदर सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी योग्य ती सर्व कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी. सेतू अभ्यासाची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर शाळा भेटींच्या आधारे जिल्हानिहाय सेतू अभ्यास २०२३- २४ अहवाल शिक्षणाधिकारी व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयाने अंमलबजावणी झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत प्रस्तुत कार्यालयास ईमेलद्वारे विनाविलंब सादर करावा.

संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे - ३०

 

सेतू अभ्यास अभ्यास परिपत्रक डाऊनलोड येथे करा. खालिल CLICK HERE वर टिचकी मारा आणि डाऊनलोड येथे करा. 

CLICK HERE

सेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी Bridge Course 

सेतू अभ्यास अभ्यास उत्तर चाचणी उपलब्ध झाली आहे 

खालिल CLICK HERE वर टिचकी मारा आणि डाऊनलोड येथे करा. 

सर्व इयत्तेच्या व सर्व विषयाच्या pdf
मराठी इंग्रजी हिंदी उर्दू माध्यमाच्या pdf
सेतू  अभ्यासक्रम उत्तरचाचणी
सर्व माध्यमांच्या
सर्व इयत्तेच्या
सर्व विषयांच्या



सेतू अभ्यास अभ्यास परिपत्रक डाऊनलोड येथे करा. 

CLICK HERE
 
मित्रांनो     Click to Download    टिचकी मारा १५ सेकंद थांबा त्यानंतर 

          Download File           वर टिचकी मारा 

CLICK HERE
Download File
 
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon