DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

जागतिक जैवविविधता दिवस : प्रश्नमंजुषा International Biological Diversity Day Quiz


मित्रांनो,संपूर्ण लेख वाचल्यानंतर 
सामान्य ज्ञानात भर घालणारी प्रश्न मंजुषा नक्की सोडवा 

जैवविविधतेचे रक्षण करून वसुंधरेची निगा राखूया,
समृद्ध निसर्गासाठी सारे कटिबद्ध होऊया....!
आज २२ मे जागतिक जैवविविधता दिन 
    विश्वाला दिलेली विधात्याने भिन्नता, जतन करून ठेवू ही जैविविधता, आता निसर्ग रक्षणासाठी पुढाकार घेऊया पर्यावरणातील जैवविविधतेच संवर्धन करूया..जागतिक जैवविविधता दिन निमित्त निश्चय करूया,
कृतीशीलते मधून पर्यावरणाचे संतुलन जपुया!
 
    जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील भुस्थित, सागरी व जलीय परिसंस्था ज्यांचा सजीव भाग आहेत अशा सर्व परिसंस्थांमधील जीवनाची असणारी विविधता होय. एकच परिसंस्थेत अगर परिसंस्थेच्या संबंधित क्रियांमध्ये निरनिराळ्या जातीच्या भिन्न संस्थेच्या सजीवांच्या एकत्रीकरणाला 'जैवविविधता' असे म्हणतात. याच जैवविविधतेच्या समस्यांविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी तसेच वेगवेगळ्या प्रजातींच्या नोंदीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी २२ मे या दिवशी “जागतिक जैवविविधता दिन" साजरा केला जातो. विविधतेने नटलेल्या जीवसृष्टीचा आदर करत, जोपासना करत ती वृद्धिंगत करणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. 
जगातील सर्व सजीवांची गणती अजूनही सुरू आहे. नव्या प्रजाती अद्यापही सापडत आहेत. पृथ्वीवरील जैवविविधता खरोखरीच थक्क करणारी आहे. शाश्वत विकासासाठी जैवविविधतेचे संरक्षण करण्याचा संकल्प करूयात. 
 
    संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केल्यानुसार २००० पासून जगभर २२ मे हा दिवस ‘जागतिक जैवविविधता दिवस’ म्हणून साजरा केला जातो.पृथ्वीवर वनस्पती व प्राण्यांच्या लाखो प्रजाती आहेत. जगातील सर्व सजीवांची गणती अजूनही चालू आहे. प्राण्यांच्या, वनस्पतींच्या, कीटकांच्या नव्या प्रजाती अद्यापही सापडत आहेत! जगातील माहित असलेल्या सजीवांपैकी ७८ टक्के प्रजातींची नोंद आपल्याकडे आढळते. या विविधतेच्या जपणुकीचे महत्व आणि माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी हा ‘बायोडायव्हर्सिटी डे’ जगभर साजरा केला जातो.
 
    जैवविविधतेचे स्थान लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी भारत सरकारने २००२ मध्ये कायदा बनवला आहे. तर महाराष्ट्रात २००८ पासून जैवविविधता नियम लागू आहेत. त्यामध्ये रहिवाशांनीच आपल्या परिसराची जैवविविधता नोंदवही बनविण्याची संकल्पना आहे. सरकारी तसेच संस्थात्मक पातळीवर या दिवसानिमित्त अनेक उपक्रम राबविले जातात. 'जैवविविधता मंडळे' स्थापन करून कामे वाटून घेतली जातात. स्थानिक पातळी वरील जैवविविधता मंडळे आपल्या परिसरातील वृक्ष, फुले, फळे, वेली, झुडपे, नदी, ओढे, नाले, विहिरी, तळी तसेच एकूण वृक्षाच्छादित प्रदेश यांची माहिती असणारी नोंदवही ठेवतात. परिसरात आढळणारे पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी, पावसाचे प्रमाण, पिके, स्थानिक वाण, चवी, औषधी वनस्पती यांचीही माहिती संकलित केली जाते.
 
    जैवविविधतेला क्षती पोहोचवणाऱ्या बाबी समजून घेऊन वैयक्तिक पातळीवरही त्या टाळल्याने फरक पडू शकतो. अधिवास जपणे, प्रदूषण कमी करणे, शाश्वत शेतीच्या पद्धती, सेंद्रिय शेती अवलंबणे, हरित क्षेत्राची वाढ करणे, पशु पक्षांच्या प्रजाती जपणे इत्यादी पाऊले उचलून आपण जैवविविधता सांभाळू शकतो.
    पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे ह्या जीवांना व वनस्पतींना क्षती पोहोचते. तो बदल नियंत्रणात ठेवणे मानवाच्या हातात आहे. आपण संकल्प करुया की तंत्रज्ञानाच्या अधिक आहारी न जाता अधिकाधिक नैसर्गिक जीवन जगू आणि पृथ्वीवरील जैवविविधता जपू. जागतिक जैवविविधता दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
सामान्य ज्ञानात भर घालणारी प्रश्न मंजुषा नक्की सोडवा 
प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी 
  CLICK HERE  
 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon