DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रश्नमंजुषा Freedom Fighter Vinayak Damodar Savarkar Quiz

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक ईप्रमाणपत्र प्राप्त करा 
ईप्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ईमेल आवश्यक आहे 
८० % गुण मिळणे आवश्यक राहील 
तुमचे नाव अचूक नोंदवा 
सर्व गोष्टींची पूर्तता करून सुद्धा इप्रमांपात्र ई प्रमाणपत्र मिळाले नाही तरच तुमचा स्वतःचा Whats App नंबर या पोस्टच्या खाली असलेल्या COMMENT SECTION मध्ये नक्की टाका / नोंदवा ई प्रमाणपत्र  वेळेनुसार पाठविण्यात येईल 
Freedom Fighter Vinayak Damodar Savarkar Quiz
प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी 
CLICK HERE
 
● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या 
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर 
जन्म - २८ मे १८८३स्मृती - २६ फेब्रुवारी १९६६ 
    भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तिरस्कार करणारे समाजसुधारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. 
    सावरकर हे लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात.
यह तीर्थ महातीर्थो का है, 
मत कहो इसे काला पानी, 
तुम सुनो यहॉं के धरतीके, 
कण-कण से गाथा बलिदानी।
    सावरकर १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. नाशिकच्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना लंडनला अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली. 
 
    ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. 
    मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही. 
    मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य. तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. 
बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली. अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. 
 
    पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर, असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजसुधारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर; अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात. अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले.
    सावरकरांनी १९२७ मध्ये उःशाप हे पहिले नाटक लिहिले. ते नाटक "नाट्यकला प्रसारक मंडळाने" रंगभूमीवर आणले. सावरकरांनी सन्यस्तखड्ग नाटक लिहिले. त्यातील शतजन्म शोधताना हे नाट्य गीत अंगावर रोमांच उभे करते. हे नाटक बळवंत नाटक मंडळाने १९३२ मध्ये सादर केले. उत्तरक्रिया हे त्यांचे नाटक भारत भूषण संगीत मंडळाने सदर केले.
    दत्ताराम यांना लहानपणी ऐका रानीत कीचकवध नाटकातील सैरंध्रीची भूमिका पाठ करवून घेवून सावरकरांनी त्यांच्याकडून दुसऱ्या दिवशी सैरंध्री उत्कृष्ट करवून घेतली. १९४३ साली सांगलीस झालेल्या अखिल महाराष्ट्र नाट्य संमेलनाच्या शाताद्भी महोत्सवाच्या अध्यक्षपदाचा मन सावरकरांना मिळाला आहे. सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले.
 
    १९२१ मध्ये अंदमानच्या तुरुंगात असताना त्यांनी उर्दू आणि देवनागरी हस्ताक्षरात लिहिलेल्या २ गझल अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरां मधला देशाभिमान आणि लेखक जागा असल्याच्या खुणा पटवणाऱ्या अशा या गझला व गीत आहे.
विनायक दामोदर सावरकर यांचे २६ फेब्रुवारी १९६६ रोजी निधन झाले. 
विनायक दामोदर सावरकर यांना आदरांजली !

संदर्भ : इंटरनेट
प्रश्नमंजुषा सोडवा 

प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी 
CLICK HERE
 

 

Previous
Next Post »

1 comments:

Click here for comments
Unknown
admin
February 26, 2023 at 10:22 AM ×

Nice

Congrats bro Unknown you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon