कार्यालय शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद वाशिम
कार्यालयाचा पत्ता: नवीन जि.प. इमारत वाशिम
Email :eo.sec.wsm@gmail.com
जा.क्र.जि.प./शिक्षण/माध्य/ 1005/2024
दि. 30/4/2024
प्रति,
मुख्याध्यापक / प्राचार्य सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा वाशिम
विषय :- शैक्षणिक सत्र सन 2023-24 मधील शेवटच्या कार्यदिन बाबत
संदर्भ :- 1 या कार्यालयाचे सुधारित सुटी नियोजन दि.26/10/2023 2. मा.शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे पत्र क्र. 2206 दि. 18 एप्रिल 2024
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये शैक्षणिक सत्र 2023-24 मधील सुट्यांचे नियोजन आपणास यापूर्वीच अवगत केलेले
आहे. तथापि बऱ्याच शाळांकडून शेवटचा कार्यदिन व सत्र सुरू होण्याचा दिन कोणता ग्राहय धरावा याबाबत विचारणा होत आहे. त्याअनुषंगाने कळविण्यात येते की, 1. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यासाठी (दीर्घ सुट्टी लागू असलेले) शैक्षणिक सत्र 2023-24 मधील शेवटचा कार्यदिन दि.06 मे 2024 असून दिनांक 07 मे 2024 पासून उन्हाळी सुट्टी राहील आणि शैक्षणिक सत्र सन 2024-25 मध्ये
शाळापूर्व तयारीसाठी दिनांक 26 जून 2024 पासून शाळा सुरू होतील.
2. विद्यार्थ्यांसाठी दि.01 जूलै 2024 पासून शाळा सुरू होतील.
3. जिल्हयात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोणत्याही शाळेने विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत शाळेत बोलावू नये.
(राजेंद्र शिंदे)
शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद वाशिम
हेही वाचा -
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, अकोला.
ईमेल:-eosecondaryzpakola@gmail.com पत्ताः जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परिसर, संतोषी माता मदिरामागे अकोला.
जा.क्र/जिपअ/शिविमा/विअ/ २३.९/२०२४.
दिनांक : ३०/०४/२०२४
प्रति,
प्राचार्य/मुख्याध्यापक,
सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व वरीष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालय अकोला जिल्हा.
विषयः- माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रातील सुट्टयाबाबत.
संदर्भः - १. महाराष्ट्र शासन राजपत्र, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-४०००३२, दि.०९/११/२०२३.
२. मा. जिल्हाधिकारी अकोला यांचे पत्र क्र. २१०४ दि.३०/११/२०२४.
३.मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) व मा.शिक्षण संचालक (प्रार्थामक शिक्षक) संचालनालय पुणे यांचे पत्र क्र.२२०६ दि.१८/०४/२०२४.
उपरोक्त विषयानुसार सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रातील सुट्टया संदर्भिय शासननिर्णय अन्वये खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.
प्रथम सत्र दि.०१/०७/२०२४ ते दि.२६/१०/२०२४ पर्यंत एकूण ९४ कामाचे दिवस राहील.
१. २. दिवाळी सुट्टी दि.२८/१०/२०२४ ते दि.१२/११/२०२४ पर्यंत एकूण १२ दिवस राहील.
३. द्वितीय सत्र दि.१३/११/२०२४ ते दि.०३/०५/२०२५ पर्यंत एकूण १३९ कामाचे दिवस राहील.
४. दि.०३/०५/२०२५ हा सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील कामाचा शेवटचा दिवस राहील.
५. शाळेचे एकूण कामाचे २३२ दिवस राहतील.
६. मुख्याध्यापक अधिकारातील ०३ सुट्टया दि.०७/०७/२०२४ पर्यंत निश्चित करून या कार्यालयास कळवाव्यात.
७. मा. जिल्हाधिकारी यांनी निश्चित केलेल्या स्थानिक सुट्टया तसेच शासन स्तरावर जाहिर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्टया शाळांना घेणे बंधनकारक राहील. ८. ज्या शाळांना उन्हाळ्याची किंवा दिवाळीची दिर्घ सुट्टी कमीकरून त्याऐवजी धार्मिक सणाच्या प्रसंगी घ्यावयाच्या
सुट्टया समायोजनान शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प. अकोला यांच्या परवाणगीने घेता येईल.
९. प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परीचर हे कर्मचारी सोडून इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिर्घ सुट्टया अनुज्ञेय राहणार नाही.
१०. दि.०१ मे २०२५ रोजी महाराष्ट दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात यावा.
(डॉ. सुचिता पाटेकर) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद अकोला
हेही वाचा -
माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, बुलढाणा
प्रति,
मुख्याध्यापक सर्व,
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,
जिल्हा बुलढाणा
विषय :- शैक्षणिक सत्र 2023-24 मधील शेवटचे कार्यदिन बाबत
संदर्भ :- मा. शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय), म.रा. पुणे यांचे पत्र जा.क्र. शिसंमा-24/(ओ-01)/ उन्हाळी सुट्टी/एस-1/2206, दि. 18 एप्रिल 2024.
उपरोक्त विषयास अनुसरून शैक्षणिक सत्र 2023-24 मधील माध्यमिक शाळांचे एकुण कामाचे दिवस 230 होणे आवश्यक आहेत. त्यानुसार 230 दिवस काम होणेसाठी बुलढाणा जिल्हा अंतर्गत सर्व माध्यमिक शाळांचा शेवट कार्यदिन दि. 06/05/2024 असेल त्या दिवशी विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करावेत.
वरील संदर्भीय पत्रानुसार शैक्षणिक सत्र 2024-25 हे दि. 01/07/2024 पासून सुरु करण्यात यावे. शैर्भाणक सत्र 2024-25 मधील इतर सर्व सुट्ट्यांचे नियोजन यथावकाश आपणाला पुरविण्यात येईल. याची नोंद घ्यावी.
(अनिल काळम शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, बुलढाणा
प्रतिलिपी :-
गटशिक्षणाधिकारी सर्व, जिल्हा बुलढाणा यांना माहिती तथा कार्यवाहीस्तव सादर
हेही वाचा -
शिक्षण विभाग जिल्हा परिषद, नांदेड
जि.प. प्रशासकिय इमारत, छत्रपती शिवाजी महाराज पुतळया जवळ, स्टेशन रोड, नांदेड, 431602. फोन नं. (02462-233241)
Email. rmsananded@gmail.com
1/2131
प्रति.
29 APR 2024
1. गटशिक्षणाधिकारी पं.स.. (सर्व) जिल्हा परिषद, नांदड
2. प्राचार्य/मुख्याध्यापक/ प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा) जि. नांदेड
विषय :- राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करणे तसेच शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करणे बाबत.
संदर्भ :-
1. माध्यमिक शाळा संहिता 52.1,53.2,53.3 वइ 52.2 नुसार
2. शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण-2023/प्र.क्र.105/एस.डी.-4 दिनांक 20.4.2023
3. मा. शिक्षण संचालक प्राथ. माध्य. व उच्च माध्य, शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे-1 यांचे परिपत्रक क्र. शिसंमा-24/ (ओ-01) / उन्हाळी सुट्टी/एस-1/2206 दि. 18.4.2024
उपरोक्त संदर्भ क्र. 3 अन्वये जिल्हयातील राजामंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुटयाबाबत कळविण्यात आले आहे. त्याप्रमाणे नांदेड जिल्हातील (सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांना सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षातील सुटया खालील प्रमाणे उन्हाळी व दिवाळी सुटया राहतील. も
1. उन्हाळी सुट्टी: दिनांक 2 मे 2024 ते दिनांक 14 जून 2023 पर्यंत दि.15 जून 2024 पासून नियमित शाळा सुरु होतील.
2. दिवाळी सुट्टी: दिनांक 28.10.2024 ते 16.11.2024 (एकुण 20 दिवस) दिनांक 17.11.2024
रोजी रविवार असल्याने दिनांक 18.11.2024 पासुन नियमित शाळा सुरु होतील. 3. इतर सुट्टी : (i) मा. जिल्हाधिकारी घोषित स्थानिक सुट्टी 03
(ii) शाळा /संस्था घोषित स्थानिक सुट्टी 02 (शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयाची पूर्व परवानगी आवश्यक राहील.)
4. दिनांक 1 में 2024 रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात यावा.
5. इतर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दीर्घ सुटया अनुज्ञेय नाहीत. मात्र दीर्घ सुट्यांच्या कालावधीत ज्या सार्वजनिक सुटया असतील त्या सुट्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय राहतील. दीर्घसुटया कालावधीमध्ये खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापनाच्या परवानगी शिवाय
मुख्यालय सोडू नये व शिक्षकेत्तर कर्मचा-यानी मुख्याध्यापकांच्या परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये.
6. शासन निर्णय / परिपत्रक, वरिष्ठ कार्यालयाचे पत्र यानुसार सुट्टीमध्ये बदल करण्याबाबत निर्देश / आदेश प्राप्त झाल्यास त्यानुसार वरील सुटयांच्या कालावधीत बदल होऊ शकतो.
7. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार इयत्ता 6 वी ते 8वी चे एकूण प्रत्यक्ष अध्यापनाचे किमान 1000 घडयाळी तास कार्यदिन किमान 222 राहतील याची दक्षता घ्यावो. व इयत्ता 9 वी ते 10 वी चे कार्यदिन माध्यमिक शाळा संहितेनुसार किमान 230 राहतील याची नोंद घ्यावी,
उपरोक्त अटीच्या अधिन राहुन शाळेच्या सुट्यांचे नियोजन करण्यात येऊन त्याचे उल्लंघन होणार नाहो याची दक्षता मुख्याध्यापकांनी घ्यावी.
शिक्षणाधिकारी (प्रा.)
जिल्हा परिषद, नांदेड
शिक्षिणाधिकारी (मा)
जिल्हा परिषद, नांदेड
हेही वाचा -
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे ४११ ००१
ई-मेल- doesecondary1@gmail.com
फोन नं. ०२०-२६१२६४६३
महत्त्वाचे परिपत्रक
क्रःशिसंमा-24/(ओ-01)/उन्हाळी सुट्टी/एस-1/2206 दि. 18 एप्रिल, 2024.
प्रति,
18 APR 2024
1. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.
2. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व.
3. शिक्षण निरीक्षक (उत्तर/पश्चिम/दक्षिण), बृहन्मुंबई.
विषय : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024 चो उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरु करणेबाबत.
संदर्भ: शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-2023/प्र.क्र.105/एस.डी.4. दि. 20/04/2023.
उपरोक्त संदभर्भीय परिपत्रकान्वये शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024 ची उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरु करणेबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
1. राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्याथ्यांना गुरुवार, दि.02 में, 2024 पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
2. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्याव्यांना सूटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.
3. पुढील शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा शनिवार दि. 15 जून, 2024 रोजी सुरु करण्यात याव्यात.
4. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा 30 जून रोजी रविवार येत असल्याने सोमवार दि.01 जुलै, 2024 पासून सुरु करण्यात याव्यात.
वरील सूचना आपल्या अधिनस्थ सर्व मान्यता प्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व अन्य माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.
शासन परिपत्रक:-
👇👇👇👇👇
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक शिक्षण संचालनालय) म.रा., पुणे.
(संपतं सुर्यवंशी)
शिक्षण संचालक
प्रत:
1. मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना माहितीस्तव सविनय सादर.
(माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय)
म.रा., पुणे.
2. मा. आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कायर्यालय, मध्यवर्ती इमारत, पुणे-01
यांना माहितीस्तव सविनय सादर
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करणे तसेच शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- २० एप्रिल, २०२३.
शासन परिपत्रक:-
विषयः राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांची सन २०२३ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन २०२३ - २४ सुरू करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय,
दि. २० एप्रिल, २०२३ शासन परिपत्रक PDF DOWNLOAD
सन २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षातील दिर्घ सुट्ट्या बाबत नियोजन
दिर्घ सुट्ट्याबाबत सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सैनिकी शाळा मधील सन २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षातील सत्र व सुट्ट्या खालील प्रमाणे निर्धारित करण्यात येत आहेत
पहिले सत्र
दुसरे सत्र
दिवाळी सुट्टी
उन्हाळी सुट्टी
सार्वजनिक व इतर सुट्ट्या
माननीय जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या सुट्ट्या
मुख्याध्यापकांच्या अधिकारातील सुट्ट्या
एकूण सुट्ट्या
सविस्तर माहितीसाठी खालील पत्र वाचा
CLICK HERE 👇
सार्वजनिक सुट्ट्या सन २०२३
PUBLIC HOLIDAYS - 2023
Download pdf
स्थानिक सुट्ट्या जाहीर करतांना काळजी घ्या
शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र शासन
राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना स्थानिक पातळीवर काही विशिष्ट दिवसांना सुट्ट्या जाहीर केल्या जातात.या सुट्ट्या जाहीर करतांना खालील बाबींचे पालन करणे आवश्यक आहे.. पुढे वाचा खालील लिंकवर क्लिक करून
शाळा स्थानिक सुट्ट्या
School local holidays
Download pdf करा
जयंती
व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत.
सन
२०२३ मध्ये मांत्रालय,शासकीय
/दनमशासकीय कायालयात साजरे करावयाच्या जयंती /राष्ट्रीय दिन कार्यक्रमाची यादी
जयंती
व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत.
सन
२०२३ मध्ये मांत्रालय,शासकीय
/दनमशासकीय कायालयात साजरे करावयाच्या जयंती /राष्ट्रीय दिन कार्यक्रमाची यादी
Download pdf करा
महाराष्ट्र शासन दिनदर्शिका सन २०२४ Maharashtra Government Calendar Year 2023
महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय दिशादर्शिका सन २०२३ Maharashtra Government Commissionerate of Education Guidelines Year 2023
सुट्टी नियोजन 2022-2023
सन २०२२ -२३ या शैक्षणिक वर्षातील दिर्घ
सुट्ट्या बाबत नियोजन
दिर्घ सुट्ट्याबाबत सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक
विद्यालय सैनिकी शाळा मधील सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील सत्र व
सुट्ट्या खालील प्रमाणे निर्धारित करण्यात येत आहेत
पहिले सत्र
दुसरे सत्र
दिवाळी सुट्टी
उन्हाळी सुट्टी
सार्वजनिक व इतर सुट्ट्या
माननीय
जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या सुट्ट्या
मुख्याध्यापकांच्या अधिकारातील
सुट्ट्या
एकूण सुट्ट्या
सविस्तर माहितीसाठी खालील पत्र वाचा
Download pdf CLICK HERE
राज्यातील सर्व डीएड अध्यापक विद्यालयांच्या सन 2022 ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ सुरू करणे बाबत
सोमवार
दिनांक ०२ मे २०२२ ऊन्हाळी सुट्टी लागू करून सदर
सुट्टीचा कालावधी रविवार दिनांक 12 जून 2022 पर्यंत ग्राह्य धरण्यात येऊन
पुढील शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये दुसरा सोमवार दिनांक 13
जून २०२२ रोजी अध्यापक विद्यालय सुरू करण्यात येतील तसेच जून
महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील
अध्यापक विद्यालय चौथा सोमवार दिनांक 27 जून २०२२ रोजी सुरू
करण्यात येतील
मित्रांनो Click to Download टिचकी मारा १५ सेकंद थांबा त्यानंतर
Download File वर टिचकी मारा
CLICK HERE
राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2021-22 ची
उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन 2022-23 सुरू करण्याबाबत*
शाळांना उन्हाळी सुट्ट्या कधीपासून असतील?
पुढील शैक्षणिक सत्र कधी सुरू होईल?
जाणून घ्या आजचा शासन निर्णय
राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2021-22 ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन 2022-23 सुरू करण्याबाबत शासन निर्णय दि 11 एप्रिल 2022
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon