DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

राष्ट्रीय विज्ञान दिन National Science Day

राष्ट्रीय विज्ञान दिन 

दरवर्षी २८  फेब्रुवारी रोजी सर सी. व्ही. रामन यांच्या  रामन परिणाम या  संशोधन कार्याबद्दल  त्यांना  मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या अनुषंगाने देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. 

        डॉ सी व्ही रमण यांना चंद्रशेखर व्यंकटरमन या नावानेही ओळखले जाते. वयाच्या ११ व्या वर्षी मॅट्रिक आणि वयाच्या  १३ व्या वर्षी १२ वी उत्तीर्ण झालेला तो अतिशय कुशाग्र मनाचा माणूस होता.डॉ सीव्ही रामन यांनी विविध शोध लावले आणि त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. फायनान्शिअल सिव्हिल सर्व्हिसेसमध्येही ते उत्तीर्ण झाले. परंतु, विज्ञानाविषयीच्या त्यांच्या आवडीमुळे त्यांना विविध संशोधने करण्याची प्रेरणा मिळाली आणि म्हणूनच त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे त्यांना नोबेल पारितोषिकही मिळाले. डॉ. सी.व्ही रामन यांच्या जीवनावर आणि त्यांनी केलेल्या शोधांवर प्रकाश टाका आणि सामान्यज्ञान प्रश्न सोडवा.

पश्न मंजुषा सोडवा 👇 

डॉ सी व्ही रमण : प्रश्नमंजुषा Dr C V Raman Quiz Raman Effect सोडवा सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 


राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२ National Science Day 2022 च्या निमित्ताने शाळांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणेबाबत


    दरवर्षी २८  फेब्रुवारी रोजी सर सी. व्ही. रामन यांच्या  रामन परिणाम या  संशोधन कार्याबद्दल  त्यांना  मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या अनुषंगाने देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय,भारत सरकार यांचे मार्फत राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२  साजरा करण्यासाठी यावर्षी शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एकात्मिक दृष्टीकोन हा विषय निश्चित केला असून त्या अनुषंगाने विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.  त्याच धर्तीवर विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयासंबंधित माहिती व समस्या याबाबत शास्त्रीय माहितीचा प्रसार करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, विज्ञान विषयाबाबत अभिरुची विकसित करणे या विविध हेतूने राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त स्तरनिहाय खालील शैक्षणिक कार्यक्रम ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने  दि.२१ ते २८ फेब्रुवारी २०२२  या कालावधीत घेण्यात यावेत. 

    पत्रात दिलेल्या तक्त्याप्रमाणे शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा/कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटापर्यंतचा सुस्पष्ट व्हिडिओ ,फोटो  व इतर साहित्य फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर इ.समाज संपर्क माध्यमांवर 
#scienceday2022,
#nationalscienceday2022 
या हँशटँगचा वापर करून पोस्ट अपलोड करावी. 

SUBSCRIBE FOR NEXT UPDATE 




 

 
आपण समाज संपर्क माध्यमांवर अपलोड केलेल्या पोस्ट अपलोड करण्यासाठी
या लिंकवर नोंदविण्यात यावी. उत्कृष्ट उपक्रमास राज्यस्तरावरून प्रसिद्धी देण्यात येईल.

 जागतिक विज्ञान दिन : प्रश्नमंजुषा World Science Day Quiz सोडवा  सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा  सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon