DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन : प्रश्नमंजुषा International Mother Language Day Quiz

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन : प्रश्नमंजुषा International  Mother Language Day Quiz 
आज 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन' म्हणून पाळला जातो.
    बांगला देशी विद्यार्थ्यांनी उर्दू सोबत बांग्ला भाषेलाही राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा म्हणून १९५२ साली निदर्शने केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस युनोस्को तर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.

Subscribe to Next Update -

    भाषा हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. आपली भाषा ही आपली व आपल्या संस्कृतीची ओळख असते. फक्त 'एक संपर्काचे माध्यम' इतकाच भाषेचा उपयोग आणि तिची व्याप्ती नाही. मानवी भाषेला सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैयक्तिक असे अनेक पदर आहेत. आणि म्हणूनच ती मानवी जीवनाचे इतके महत्त्वाचे अंग आहे.
    आजूबाजूच्या जगातून मिळणाऱ्या ज्ञानाला, सौंदर्याला, आनंदाला भरभरून प्रतिसाद देण्याचे एकमेव साधन म्हणजे आपली मातृभाषा. घरच्या अंगणात खेळावं इतकी सहजता आणि इतके आपलेपण मातृभाषेत बोलताना असते. म्हणूनच कदाचित सगळ्यांसाठी मातृभाषा हा इतका भावनिक पातळीवरचा विषय होऊन बसतो. 
    'मातृभाषा आणि तिच्यावर येऊ घातलेली संकटं' हा अनेकदा चर्चेचा विषय होतो. मातृभाषेशी नातं इतकं दृढ असतं की 'आपली मातृभाषा हरवत चालली आहे' अशा विचारानेही बहुतांश लोक अस्वस्थ होतात; आणि ते रास्तही आहे. 
इंग्रजीचा 'किलर लँग्वेज' म्हणून जगभर पडत चाललेला प्रभाव बऱ्यादा लोकांना चिंताजनक वाटतो.
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठीआपुल्या घरीच हाल सोसते मराठी !हे असे असंख्य खेळ पाहते मराठीशेवटी मदांध तख्त फोडते मराठी !
    असं सुरेश भटांनी सांगितलं असलं तरी आज मराठी माणसाला, मराठी माणसाशी, मराठी भाषेत बोलायला लाज वाटते, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आपण महाराष्ट्रात अनुभवत आहोत. 
    यू नो, यू सी हे शब्द मराठी वाक्यात आले नाहीत, असं होत नसतं. १९२४ मध्ये केसरीतून सावरकरांनी मराठी भाषेचे शुद्धिकरण ही लेखमाला लिहिली, त्यात त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली होती. याच विषयावरून दत्तो वामन पोतदार आणि त्यांच्यात झालेला वादही प्रसिद्ध आहे. 
    "परकीय भाषेतील शब्द आत्मसात करून ते पचवून टाकले, ही आमची विजय-चिन्हंच नाहीत का?" असा प्रश्न दत्तोपंतांनी सावरकरांना विचारला. त्यावर त्यांचं उत्तर होतं, "ती काही आमची विजय-चिन्हं नाहीत ; ते तर आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत".सावरकरांचं हे म्हणणं एका अर्थानं योग्यही आहे. आपल्या भाषेत शब्द उपलब्ध असतानाही दुसऱ्या भाषेचा आधार का घ्यावा?
    सावरकरांनी अनेक पर-शब्दांना मराठमोळे प्रतिशब्द सुचवले. हे शब्द किचकट होते, संस्कृतप्रचूर होते आणि समजायला परभाषी शब्दांपेक्षाही कठीण होते अशी टीका काहीजण करतात. पण दिनांक, नगरपालिका, महापालिका, महापौर, हुतात्मा, दूरदर्शन, दूरध्वनी, प्राध्यापक, नेतृत्त्व हे सावकरांनीच शोधलेले, सुचवलेले शब्द आहेत. आजही ते सर्रास वापरले जातात. मराठी भाषेचं सौंदर्यही त्यातून जाणवतं. 

Subscribe to Next Update -

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन : प्रश्नमंजुषा सोडवा 

 

संदर्भ : इंटरनेट
अशाच प्रकारचे  दर्जेदार शैक्षणिक साहित्या प्राप्त करण्यांसाठी आपल्या साठी तयार करण्यात आलेल्या WhatsApp / Telegram Channel या समुहात खालिल ओळीला स्पर्श करून सामील व्हा.





आझादी का अमृत महोत्सव” 

उत्सव आझादी का

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  अकोला जिल्हा Akola District Quiz  सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा जालना जिल्हा Jalna District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा नाशिक जिल्हा Nashik District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  सोलापूर  Solapur District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon