DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Std10th ENGLISH Internal Assessment / Assignment

Admission Form Online Form Filling "Live English" 

"Living English !"  Form Filling

मार्गदर्शक व्हीडीओ बघा 

 



SSC परीक्षेच्या तयारीसाठी खालील सर्व 160 प्रश्नमंजुषा सोडवा


●═══════〇═══════●

● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या 
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा

Live English! FORM FILING

    विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाच्या युगात भविष्यात नेहमीच ऑनलाईन फॉर्म भरावे लागणार आहेत भविष्यात ऑनलाईन फॉर्म भरताना त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये त्यासाठी हा सर्व खटाटोप आहे नमुना फॉर्म (अर्ज) भरणे हे कौशल्य आहे ते व्यावहारिक व जीवनावश्यक कौशल्य आहे सध्या (हल्ली) फॉर्म च्या साह्याने offline online खूपशी माहिती जमा केली,मिळविली जाते फॉर्म भरण्याचे रटाळ काम हल्ली online forms मुळे खूप मनोरंजक व विलक्षण अनुभव देणारे झाले आहे.

    Offline Forms आणि Online Forms भरण्या विषयीची माहिती पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 38,39 वर माहिती दिलेली आहे.पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 40 वर आपल्याला एका विद्यार्थ्याची माहिती असलेला एक नमुना फॉर्म भरून दाखवलेला आहे त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची अचूक माहिती लिहून स्वतःचा फॉर्म भरावयाचा आहे. माझ्या मदतीने किंवा साह्याने प्रात्यक्षिकासह आपल्याला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची माहिती जाणून घ्यावयाची आहे आणि तेही प्रात्यक्षिकासह व आकर्षक प्रमाणपत्रासह

चला तर मग व्हिडिओच्या डिस्क्रीप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक ला टिचकी मारून फॉर्म भरण्यास सुरुवात करूयात.

    विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तक पान क्रमांक 40 वर दिलेल्या प्रवेश फॉर्मचे निरीक्षण व अभ्यासून ऑनलाईन फॉर्म भरणे अगोदर लागणारी माहिती स्वतःजवळ कलेक्ट करून ठेवावी

    ऑनलाइन फॉर्म भरण्या संदर्भात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता विद्यार्थ्यांना अडचणी आल्याचे दिसून येत आहे या अडचणींचे निराकरण खालीलप्रमाणे करण्यात येत आहे.

१) सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी दिलेल्या लिंकला/ दुव्याला क्लिक मारून/टिचकी मारून उघडावे

२) लिंक ओपन झाल्यानंतर आपला वैध ई-मेल टाका

३) त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव इंग्रजी कॅपिटल मध्ये भरावे आपण या ठिकाणी जे नाव नोंदवाल तेच आपल्या प्रमाणपत्रावर छापून/मुद्रित होऊन येणार आहे त्यामुळे नाव भरत असताना काळजी घ्यावी

४) ड्रॉप-डाऊन मेन्यू मधून आपली वर्ग तुकडी निवडावी

५) आता आपल्यासमोर इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 38,39 व 40 हे दिसतील त्याचे नीट वाचन करावे

६) स्क्रोल करून खाली आल्यानंतर नेक्स्ट Next या बटनावर क्लिक करावे त्यानंतर

आपल्या समोर दुसरा विभाग/सेक्शन येईल

७) या सेक्शनमध्ये मध्ये विद्यार्थ्यांनी इंग्रजी कॅपिटल मध्ये आपले स्वतःचे प्रथम नाव मधले नाव आणि आडनाव नोंदवावे

८) आता महत्त्वाचा मुद्दा असून याठिकाणी विद्यार्थ्याला आपला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करावयाचा असल्यामुळे या ठिकाणी ऍड फाईल ला क्लिक करावे त्यानंतर आपल्या समोर Insert file अशाप्रकारचा विंडो ओपन होईल


Upload My Drive ...

Select file from your device

यावर क्लिक करावे आपण जर मोबाईलवरून फॉर्म भरत असाल तर आपल्यासमोर गॅलरी किंवा माय फाइल ओपन होईल
त्यामधून ज्या ठिकाणी आपला पासपोर्ट साईज फोटो ठेवलेला आहे त्याला सिलेक्ट करून ओपन बटनावर क्लिक करावे
संगणकावरून फॉर्म भरत असाल तरी तीच पद्धत आहे ज्या ड्राईव्हवर आपला फोटो आहे त्याठिकाणी जाऊन आपला फोटो
सिलेक्ट करून ओपन open बटणावर क्लिक करावे त्यानंतर Upload वर क्लिक करावे अपलोडिंग होण्यासाठी थोडा वेळ
लागू शकतो


८) वडीलाचे प्रथम नाव मधले नाव आणि आडनाव नोंदवावे

९) आईचे प्रथम नाव मधले नाव आणि आडनाव नोंदवावे

१०)आपल्याला कोणत्या वर्गात प्रवेश पाहिजे ड्रॉप-डाऊन मेन्यू मधून निवड करावी

११) वाहतुकीची सुविधा आवश्यकता आहे नाही यावर क्लिक करावे

१२) आपला पूर्ण पत्ता या ठिकाणी नोंदवा

१३) त्यानंतर आपल्या मेडिकल हिस्टरी संदर्भात थोडक्यात माहिती नोंदवावी जसे की शारीरिक व्याधी असल्यास

१४) त्यानंतर आपल्या सध्या शिकत असलेल्या शाळेचे म्हणजे शेवटच्या शाळेचे नाव नोंदवावे

१५) जन्मतारीख नोंदवत असतानी जन्म महिना जन्मदिवस जन्म वर्ष सिलेक्ट करावे

१६) तुम्ही कोणत्या वर्गात उत्तीर्ण झालात तो वर्ग याठिकाणी नोंदवावा१७) त्यानंतर आपल्यामध्ये असलेल्या विशेष गुणाची आवडीची निवडीची नोंद याठिकाणी करावी

१८) त्यानंतर आपल्या समोर Section 3 येईल या ठिकाणी आपल्या वडिलांचे शिक्षण नोंदवावे

१९) वडिलांचा व्यवसाय नोंदवावा

२०) त्यानंतर मोबाईल नंबर नोंदवावा

२१) वडिलाचा ई-मेल असल्यास नोंदवावा नसल्यास आवश्यक नाही

२२) या ठिकाणी वडिलांप्रमाणेच आपल्या आईच्या संदर्भातल्या माहितीची नोंद या ठिकाणी करावी

२३) जर आपले भाऊ किंवा बहीण या शाळेत शिकत असतील तर त्याची नोंद त्या वर्गासमोर करावी आणि कोणत्या वर्षापासून शिकत आहेत त्या वर्षाची निवड करावी नसल्यास आवश्यक नाही

२४) त्यानंतर शेवटचा मुद्दा जे कागदपत्र आपल्याला अपलोड करावयाची आहेत या ठिकाणी आपण आपला फोटो अपलोड करण्याची जी कार्यवाही केली त्याप्रमाणे या ठिकाणी अशा प्रकारची कार्यवाही करावी आणि फॉर्म शेवटी Submit वर Click करावे धन्यवाद

खालील दिलेल्या Click Here वर टिचकी मारून ऑनलाइन फॉर्म  भरण्याचा सराव करूयात 




Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon