DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

जागतिक पुरुष दिवस: प्रश्नमंजुषा World Men's Day Quiz

 जागतिक पुरुष दिवस: प्रश्नमंजुषा World Men's Day Quiz


************************

१९ नोव्हेंबर जागतिक पुरुष दिन

*************************

आज जागतिक पुरुष दिन !
 
     !!! सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!

    दर वर्षी ८ मार्चला जागतिक महिला दिवस असतो. त्या महिला दिवसाचं कवित्व ८ मार्च संपून दुसरा दिवस येतो तेव्हा हळू हळू कमी व्हायला लागतं. आता हा भाग वेगळा कि तो महिला दिवस वगैरे काहीही असलं तरी महिलेचं जगणं काही त्याच्याने बदलत नाही. नोकरी करणाऱ्या महिलांना हा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी साजरा होणारा सणच असतो. त्यांच्यासाठी दिवसभर शुभेच्छांचा धो धो पडणारा पाऊस आणि संध्याकाळ होईपर्यंत तो ओसरणारा पूर सावरत घर गाठणं म्हणजे ८ मार्च. पण जागतिक पुरुष दिनाच्या वाट्याला तर तेही नसतं. आश्चर्य वाटलं ना जागतिक पुरुष दिन ऐकून. हो तर आज म्हणजे १९ नोव्हेम्बर हा दिवस दर वर्षी जागतिक पुरुष दिवस म्हणून साजरा केला जातो किंवा मानला जातो.

    १९ नोव्हेम्बर हा जगभरातल्या पुरुषांसाठी काही खास दिवस आहे. भारत किंवा जगातले बहुतांश देश पुरुषप्रधान असल्याने स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा मिळावा यासाठी जागतिक महिला दिन मोठ्या थाटात साजरा होतो. पण जागतिक पुरुष दिनाबद्दल काही माहिती आपल्याला नसतेच.

    दर वर्षीप्रमाणे आज १९ नोव्हेंबरला जागतिक पुरुष दिवस साजरा होणार. पण हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस का साजरा केला जातो? किंवा मुळात बरेच जणांना तर हा प्रश्न असेल कि खरंच असा काही दिवस आहे का? कि सोशल मीडियाने काहीतरी नवी टुम काढलीये हि. आणि असेलच असा दिवस तर तो केव्हापासून सुरु झाला हा प्रश्न बरेच जणांना पडला आहे. चला याबद्दलच आज विस्ताराने बोलू.
    सर्वात प्रथम ७ फेब्रुवारी १९९२ ला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. अमेरिका, कॅनडा आणि युरोपच्या काही देशांमध्ये हा दिवस साजरा केला गेला. पण १९९५ पासून हा दिवस साजरा होणे बंद होत गेले. याला कदाचित कारण हेही असू शकते कि महिलांमध्ये कुठल्याही गोष्टीचा उत्सव करण्याचा उत्साह हा उपजतच असतो. पण तरीही बऱ्याच देशांमध्ये हा ७ फेब्रुवारीचा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा होतच राहिला.

    पुढे १९९८ साली त्रिनिदाद आणि टोबॅगो मध्ये पुन्हा एकदा पुरुष दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. यावेळी दिवस ठरवला गेला १९ नोव्हेंबर. डॉ. जीरोम तिलकसिंह यांनी हा दिवस सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. पुढे हळू हळू ७० देशांमध्ये हा दिवस पुरुष दिवस म्हणून मानला जाऊ लागला. आणि युनेस्कोने पण या दिवसाला मान्यता दिली.

            हेही वाचा

👇 👇 👇 👇 👇


जागतिक महिला दिन माहितीपूर्ण लेख व प्रश्नमंजुषा सोडवा World Men's Day Quiz त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

            

    भारतात या दिवसाची जागृती यायला तसा बराच वेळ गेला. सेव्ह इंडियन फॅमिली या फाउंडेशनने २००७ साली सर्वात आधी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. पुढे ऑल इंडिया मेन्स वेल्फेअर फाउंडेशनने महिला विकास मंत्रालया सारखं पुरुष विकास मंत्रालय सुरु व्हावं हि सुद्धा मागणी केली. आणि जागतिक पुरुष दिवस सर्वांना माहित व्हावा यासाठी प्रयत्न सुरु ठेवले. आणि साधारण हे वर्ष पहिलेच असे वर्ष आहे कि याबद्दल बऱ्याच लोकांपर्यंत हि माहिती पोहोचली. आता पुरुषांनीच महिलांसारखा उत्साह ठेऊन या दिवसाचा इव्हेंट केला तर लवकरच हा पण दिवस फेमस होईल, नाही का ?

    आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे महत्त्वआंतरराष्ट्रीय पुरुष दिन प्रामुख्याने पुरुष आणि मुलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, लिंग संबंध सुधारण्यासाठी, लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुरुष रोल मॉडेल्स हायलाइट करण्यासाठी साजरा केला जातो.3 पैकी एक पुरुष घरगुती हिंसाचाराचा बळी आहे. पुरुष स्त्रियांपेक्षा ४ ते ५ वर्षे आधी मरतात. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता दुप्पट असते. पुरुष दिन हा पुरुषांच्या ओळखीच्या सकारात्मक पैलूंवर काम करतो. 
पुरुष दिन साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट पुढीलप्रमाणे आहेत-                                                                                
- पुरुष आदर्शांना प्रोत्साहन देणे.                                                                                    

- समाज, समुदाय, कुटुंब, विवाह, मुलांची काळजी आणि वातावरणात पुरुषांचे सकारात्मक योगदान साजरे करणे                                                                                                                                                                     
- पुरुषांच्या आरोग्यावर आणि कल्याणावर लक्ष केंद्रित करणे; सामाजिक, भावनिक, शारीरिक आणि आध्यात्मिक.          

- पुरुषांवरील भेदभाव उघड करणे.                                                                                                                

- लैंगिक संबंध सुधारणे आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे.- एक सुरक्षित, चांगले जग निर्माण करणे.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कसा साजरा केला जातो ?                                                                                        पुरुष दिन हा पूर्णपणे पुरुषांचा दिवस आहे. परदेशात या दिवशी पुरुषांसाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याला पार्टी दिली जाते, फिरायला पाठवले जाते. मात्र, भारताबद्दल बोलायचे झाले तर हळूहळू हा दिवस साजरा करण्यावर भर दिला जात आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय पुरुष दिनही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कसा साजरा केला जातो?पुरुष दिन हा पूर्णपणे पुरुषांचा दिवस आहे. परदेशात या दिवशी पुरुषांसाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याला पार्टी दिली जाते, फिरायला पाठवले जाते. मात्र, भारताबद्दल बोलायचे झाले तर हळूहळू हा दिवस साजरा करण्यावर भर दिला जात आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय पुरुष दिनही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.


********************************
चला तर मग सोडवूया ......... 
जागतिक पुरुष दिवस: प्रश्नमंजुषा World Men's Day Quiz वर आधारित प्रश्नमंजुषा  

 

संदर्भ : Google    

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon