DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Maha TAIT Exam 2023

TEACHERS APTITUDE AND INTELLIGENCE TEST (TAIT)   
Commencement of Call letter Download 19 - 02 - 2023
Closure of Call letter Download 03 - 03 - 2023


Hall Ticket / Call Letter / प्रवेशपत्र Download link आणि अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळाला भेट द्या 👇 


डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर, TAIT परीक्षेची घोषणा, पाच वर्षांची प्रतिक्षा संपली..
Maha TAIT Exam 2023

    पाच वर्षापासून रखडलेली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता TAIT Exam Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test चाचणीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची घोषणा काल झाली असून राज्य परीक्षा परिषदेकडून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 22 फेब्रुवारी 2023 ते तीन मार्च 2023 या दरम्यान ऑनलाईन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे. यासाठी उमेदवारांना 8 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
    राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये शिक्षकांची भरती करण्यासाठी *‘पवित्र पोर्टल’* विकसित करण्यात आले आहे. या संगणकीय प्रणालीद्वारे भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने 2017 मध्ये घतला होता. त्यानुसार डिसेंबर 2017 मध्ये TAIT परीक्षा महापरीक्षा पोर्टलच्यावतीने ऑनलाइन घेण्यात आली होती. त्यानंतर अजून पाच वर्षे उलटली तरी परीक्षा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील तीन लाखाहून अधिक डीएड-बीएड धारक आणि 54 हजार पात्र शिक्षक या अभियोग्यता चाचणीसाठी प्रतिक्षेत आहेत. मात्र परिषदेकडून वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता त्यांची प्रतीक्षा संपल्याची प्रतिक्रिया ते व्यक्त करीत आहेत.

 असे आहे वेळापत्रक ..!
▪️ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी - 31 जानेवारी 2023 ते 8 फेब्रुवारी 2023
▪️परीक्षा शुल्क भरण्यासाठी कालावधी - 8 फेब्रुवारी 2023 रात्री 11. 59 पर्यंत
▪️प्रवेशपत्र ऑनलाईन मिळण्याचा कालावधी- 15 फेब्रुवारीपासून 2023 पासून
▪️ऑनलाईन परीक्षा तारखा - 22 फेब्रुवारीपासून ते 3 मार्चपर्यंत ( उमेदवार संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधानुसार बदल होण्याची शक्यता आहे.)
अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळाला भेट द्या 👇 

Also read - 

MAHA TET Answer Key

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२१

Maharashtra Teacher Eligibility Test - 2021 

Interim Answer Key

शिक्षक शिक्षक पात्रता परीक्षा TET 2021
अंतिम उत्तरसूची
परीक्षा दिनांक 21 नोव्हेंबर 2021
पेपर - 1: पहिली ते पाचवी शिक्षकांकरिता (माध्यम मराठी)
पेपर - 2 : सहावी ते आठवी शिक्षकांकरिता (वैकल्पिक विषय: गणित, विज्ञान)
पेपर - 2 : सहावी ते आठवी शिक्षकांकरिता (वैकल्पिक विषय: सामाजिक शास्त्र)

Sr.No

Paper

1

Paper I Interim Answer Key

2

Paper II - Maths-Science Interim Answer Key

3

Paper II - Social-Science Interim Answer Key





MAHA TET

शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन MAHATET  TET Exam 

फेब्रुवारी २०१३  पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य नसल्याबाबत

 


TAIT ( Teacher Aptitude and Intelligence Test ) शिक्षक अभियोग्यता चाचणी

 फेब्रुवारी 2022 मध्ये होणार !

 TAIT (शिक्षक अभियोग्यता चाचणी ) काय आहे? पात्रता व इतर माहिती जाणून घ्या येथून
TAIT ( Teacher Aptitude and Intelligence Test ) शिक्षक अभियोग्यता चाचणी
 फेब्रुवारी 2022 मध्ये होणार !
 TAIT (शिक्षक अभियोग्यता चाचणी ) काय आहे? पात्रता व इतर माहिती जाणून घ्या येथून
अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आयोजना संदर्भात पत्र काढण्यात आलेले आहे परंतु ही परीक्षा अनुसूचित जातीच्या पेसा मधील उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आलेली आहे अशी बातमी आहे त्यामुळे वरील पत्रासंदर्भात स्वतः शहानिशा करावी आणि पूर्ण माहिती मिळवावी,कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये.
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी 2022 मध्ये होणार Teacher Aptitude and Intelligence Test 2022
अवर सचिव,महाराष्ट्र शासन,शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचे दि. १५/११/२०२१ यांचे दि. १५/११/२०२१ चे परिपत्रक सविस्तर वाचा



शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन MAHATET  TET Exam 

शिक्षक पात्रता परीक्षा-2021

राज्यात होणार लवकरचं मोठी शिक्षक भरती..!

शिक्षक पात्रता परीक्षा 2021(MahaTET) वेळापत्रक जाहीर..!


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ चे आयोजन
दि १० ऑक्टोबर २०२१ रोजी होणार  
अर्ज करण्याची अंतिम मुदत दि २५ ऑगस्ट २०२१
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ जाहीर केली आहे. 
यंदा MAHATET 2021 परीक्षा दि  १० ऑक्टोबर २०२१ रोजी होणार असून त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम  मुदत दि २५ ऑगस्ट २०२१ आहे. 
इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत शिक्षक होण्यासाठी सर्व शाळांमध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. 
 
       MAHATET 2021 परीक्षेशी संबंधित सर्व माहिती, 
ऑनलाईन अर्ज करण्याबाबतच्या सूचना महाराष्ट राज्य परीक्षा परिषदेच्या

Click Here 


या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. टीईटी परीक्षा पेपर १ व २ साठीचे वेळापत्रक, परीक्षा फी, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका आराखडा व संदर्भ पुस्तके यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
MAHA TET 2021 वेळापत्रक
१.ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी – ३ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१
२. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढणे – २५ सप्टेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१
३.  टीईटी पेपर १ दिनांक व वेळ - १० ऑक्टोबर २०२१ वेळ सकाळी १०.३० ते १.००
४. टीईटी पेपर २ दिनांक व वेळ - १० ऑक्टोबर २०२१ वेळ दुपारी २.०० ते ४.३०

परीक्षा शुल्क
१. सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा. / भ.ज. -  ५०० रुपये (फक्त पेपर १ / २ ) / ८०० रुपये (दोन्ही पेपर)
२. अनु.जाती, अनु.जमाती व दिव्यांग  - २५० रुपये (फक्त पेपर १ / २ ) / ४०० रुपये (दोन्ही पेपर )

 MAHA TET परीक्षा 2021 प्रश्नपत्रिका आराखडा,अभ्यासक्रम व तयारी

(1)TET पेपर 1 अभ्यासक्रम, तयारीची दिशा व उपयुक्त संदर्भ पुस्तक
१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)
       यामध्ये बालकांच्या मानसशास्त्रावर आधारित ६ ते ११ वर्षे वयोगटाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यात अध्ययन, अध्यापन, विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन यावर आधारित प्रश्नांचा समावेश होतो.
महत्वाचे संदर्भ पुस्तक
१.संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते(सहावी आवृत्ती),के सागर पब्लिकेशन्स, पुणे 
२.मराठी भाषा(30 गुण)
      यामध्ये मराठी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
महत्वाची संदर्भ पुस्तके
 के'सागर/बाळासाहेब शिंदे/डॉ.आशालता गुट्टे/विनायक घायाळ
३ इंग्रजी व्याकरण(३० गुण)
    यामध्ये इंग्रजी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
महत्वाची संदर्भ पुस्तके
के सागर/बाळासाहेब शिंदे 
४.गणित (३० गुण)
    यामध्ये विविध गणितीय घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात. 
महत्वाची संदर्भ पुस्तके
नितीन महाले/शांताराम अहिरे/ सतीश वसे
५.परिसर अभ्यास (३० गुण)
     यामध्ये परिसर अभ्यास,विज्ञान,भूगोल, इतिहास,नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तकांवर आधारित बेसिक प्रश्न विचारले जातात.
महत्वाची संदर्भ पुस्तके
१.पाचवी ते दहावीची संबंधित विषयाची पाठ्यपुस्तके/प्रा.अनिल कोलते/विनायक घायाळ
घटकांच्या एकत्रित तयारीसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ
TET पेपर पहिला व दुसरा संपूर्ण मार्गदर्शक - के'सागर (चौथी आवृत्ती)
 परीक्षभिमुख दृष्टीकोनासाठी मागील प्रश्नपत्रिका व प्रश्नपत्रिका सराव अत्यंत आवश्यक
TET पेपर एकच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती व अभ्यासाचा परीक्षाभिमुख दृष्टीकोन विकसित होण्यासाठी मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे, प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत सोडविण्याचा सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे.२०१३ ते २०१९ पर्यंत TET परीक्षा ६ वेळा आयोजित करण्यात आली होती, या परीक्षेच्या ६  प्रश्नपत्रिका समजून घेऊन अभ्यासास सुरवात केल्यास परीक्षभिमुख अभ्यास होईल, तसेच परीक्षेसाठी कोणते घटक महत्वाचे आहे, ते लक्षात येईल.
प्रश्नपत्रिका महत्वाचे संदर्भ पुस्तक
TET पेपर पहिला सराव प्रश्नपत्रिका व TET परीक्षेच्या २०१३  ते २०१९  च्या मागील ६ प्रश्नपत्रिका संग्रह उत्तरांसह - डॉ.शशिकांत अन्नदाते,के सागर पब्लिकेशन्स,पुणे

(२)TET पेपर 2 अभ्यासक्रम,तयारीची दिशा व उपयुक्त संदर्भ पुस्तके 

१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(३० गुण)
यामध्ये बालकांच्या मानसशास्त्रावर आधारित ११ ते १४ वर्षे वयोगटाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यात अध्ययन, अध्यापन,विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन यावर आधारित प्रश्नांचा समावेश होतो.
महत्वाचे संदर्भ पुस्तके 
१.संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते(सहावी आवृत्ती),के' सागर पब्लिकेशन्स, पुणे 
२ .मराठी भाषा(३० गुण)
यामध्ये मराठी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
महत्वाची संदर्भ पुस्तके
के सागर/बाळासाहेब शिंदे/ डॉ.आशालता गुट्टे/विनायक घायाळ
३ .इंग्रजी व्याकरण(३० गुण)
यामध्ये इंग्रजी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
के सागर/बाळासाहेब शिंदे
४.गणित व विज्ञान (६० गुण)
यामध्ये गणितासाठी 30 व विज्ञान साठी  30 गुण आहेत.    
४.१- गणित (३० गुण)
यामध्ये विविध गणितीय घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात. 
नितीन महाले/शांताराम अहिरे/सतीश वसे
४.२ - विज्ञान (३० गुण) विज्ञान विषयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व आरोग्यशास्त्र यावरील मूलभूत संकल्पनांवर आधारित  प्रश्न विचारले जातात.
प्रा.अनिल कोलते/कविता भालेराव/विनायक घायाळ
५.सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल (६० गुण)
५.१ - इतिहास (३० गुण) 
  इतिहासात प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारत यावर आधारित मूलभूत प्रश्न विचारले जातात.
महत्वाची संदर्भ पुस्तके
१.पाचवी ते बारावी शालेय इतिहास पाठ्यपुस्तके
५.२ - भूगोल.(३० गुण)
भूगोल विषयात महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल , जगाचा भूगोलचे बेसिक प्रश्न विचारले जातात.
१.इयत्ता पाचवी ते बारावी भूगोल विषयाची पाठ्यपुस्तके 
TET पेपर दोन साठी सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाचा संदर्भ
१.TET सराव प्रश्नपत्रिका पेपर दुसरा (मागील प्रश्नपत्रिकांसह)- विनायक घायाळ व विद्या देशपांडे, के सागर पब्लिकेशन्स,पुणे

टीईटी परीक्षा तयारी महत्वाच्या बाबी

★ बेसिक संदर्भ पुस्तके वाचण्यावर भर द्यावा.
★मागील टीईटी पेपर एक व पेपर दोनच्या मागील प्रश्नपत्रिका बघून अभ्यासाची स्ट्रॅटेजी तयार करा.
★टीईटी परीक्षेत ९०+ गुण मिळवण्याच्या हेतूने प्रामाणिकपणे अभ्यास करा.
★वेळेचा अपव्यय करणाऱ्या सर्व बाबींपासून दूर रहावे.
★बालमानसशास्त्र विषय चांगला समजून घेतल्यास व वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याचा सराव केल्यास दोन्ही पेपरमध्ये अधिक गुण मिळवता येतील.
★परीक्षेसाठी घटकनिहाय संदर्भ पुस्तके वाचावीत.
★इतिहास, भूगोल, विज्ञान व गणित विषयांची पाचवी ते दहावी पर्यंतची पाठ्यपुस्तके वाचावीत.
★शक्य असल्यास नोट्स काढा/पाठ्यपुस्तकातीळ महत्वाच्या मुद्यांना अधोरेखित / अंडरलाइन करा.
★प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत सोडविण्याचा सराव करावा.
★टीईटी परीक्षा होईपर्यंत फेसबुक, व्हाट्सप पासून दूर राहिल्यास बराच अभ्यासक्रम कव्हर होईल.
★परीक्षेला सकारात्मकतेने "टीईटी पास होणारच" या आत्मविश्वासाने सामोरे जा.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ ऑनलाईन फॉर्म भरणे सूचना,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचना खाली नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत.

१. ऑनलाईन नोंदणी.

२. पोर्टल लॉगिन.

३. आवेदनपत्र भरणे.

४. अर्जातील माहितीची पडताळणी करणे.

५. ऑनलाईन परीक्षा शूल्क भरणे

६. आवेदन पत्राची प्रिंट घेणे  सविस्तर वृत्त 👇
 
हे हि वाचा 

हे हि वाचा 



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon