DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

राज्य अभ्यासक्रम आराखडा


708, सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे 

प्रसिद्धी निवेदन-

 (२२/०५/२०२४)

इयत्ता ३री ते १२वी इयत्तांचा पाठ्यक्रम तयार करणेसाठी मार्गदर्शक, राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- २०२४ मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे मार्फत तयार करण्यात आला आहे. सदर मसुदा परिषदेच्या

 

 या संकेतस्थळावर दिनांक. २३/०५/२०२४ पासून जनतेच्या प्रतिक्रियांसाठी खुला करण्यात आला आहे.

राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- २०२४ मसुद्याबाबत सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ञ, शैक्षणिक प्रशासन यांनी आपले अभिप्राय दिनांक. ०३/०६/२०२४ पर्यंत खालील लिंक वर नोंदवावेत अथवा पोस्टाने पाठवावेत असे आवाहन करण्यात येत आहे.

अभिप्राय नोंदवत असतांना त्यामध्ये आपले नाव, मोबाइल नं. इमेल, पत्ता, कार्यालय, जिल्हा इत्यादी तपशील देण्यात यावा. तसेच अभिप्राय व सूचना सप्रमाण व सकारण नोंदविल्या जाव्यात त्यामध्ये क्षेत्र, विषय, स्तर, पृष्ठ क्रमांक, मूळ मसूद्यातील तपशील, आवश्यक बदल, बदलाचे कारण, कोणत्या मुद्यामध्ये दुरुस्ती आवश्यक वाटते याचा तपशील, सुधारित मजकूर कसा असावा, यांचा समावेश असावा.

टीप : पोस्टाने अभिप्राय पाठवणार असल्यास त्यावर SCF-SE राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- २०२४ बाबत अभिप्राय (अभ्यासक्रम विकसन विभागासाठी) असे ठळक अक्षरात लिहून, वरील पत्त्यावर पाठवावेत.

अभिप्राय नोंदवण्याचा कालावधी दिनांक २३/०५/२०२४ ते ०३/०६/२०२४

अभिप्राय नोंदविण्यासाठी LINK
 

(राहूल रेखावार, भा.प्र.से.) संचालक 2110724 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

गुगल फॉर्म भरण्यासंदर्भांत सर्वसामान्य सूचना

1. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमध्ये राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण विकसन संदर्भातील प्रक्रिया सुरू आहे.

2. राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण संदर्भात शिक्षकमुख्याध्यापकपर्यवेक्षकीय यंत्रणा यांच्याकडून अभिप्राय घेण्यासाठी सदर फॉर्मची निर्मिती केली आहे

3. आपल्या अभिप्रायाचा उपयोग राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण निर्मिती करताना होणार आहे. त्यामुळे  आपले अभिप्राय अनमोल असतील.

4. अध्ययन-अध्यापन करत असलेल्या विषयाशी संबंधित अथवा आवडीच्या विषयासंदर्भात आपले योगदान द्यावे.

5. सदर फॉर्म भरताना मराठी किंवा इंग्रजी भाषांचा वापर करू शकता.


1. राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण -भाषागणितविज्ञानकलाशारीरिक शिक्षणसामाजिक शास्त्रआंतरविद्याशाखीय शिक्षण 

2. राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण-व्यावसायिक शिक्षण 

3. राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण-आंतरसमवाय क्षेत्र (Cross Cutting Theme) 

4. राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण अभिप्राय-शालेय संस्कृती व प्रक्रियासहाय्यभूत प्रणाली 



संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्रपुणे.

हे ही वाचाल
आमचे गुरुजी या नावाने संबंधित शिक्षकांचा फोटो त्या त्या वर्गामध्ये सन्मानपूर्वक प्रदर्शित करणे बाबत माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांचे परिपत्रक
वाचा किंवा डाउनलोड करा 

  CLICK HERE 

शिक्षक सर्वसाधारण बदल्या 2022
आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला प्रारंभ
आंतरजिल्हा बदली फार्म भरण्याचा कालावधी दिनांक 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2022
फॉर्म भरण्यासाठी...

राज्यातील अल्पसंख्यांक समाजाचे शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करणेबाबत शासन आदेश दिनांक -१७/११/२०२१

 


राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंमलबजावणी NEP / राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मिती - तज्ज्ञ निवड SCF 

NEP 2020  National Education Policy 




सहभागींसाठी मार्गदर्शक तत्त्वे - 

1. या सर्वेक्षणात नवीन शिक्षण धोरण 2020 च्या अंमलबजावणीशी संबंधित 100 प्रश्न आहेत जे
चार क्षेत्रांमध्ये विभागले गेले आहेत- शालेय शिक्षण, बालपण काळजी,आणि शिक्षण,शिक्षक शिक्षण
आणि प्रौढ शिक्षण त्यांच्यासह शिक्षक आणि शिक्षक शिक्षकांसह विविध भागधारकांकडून प्रतिसाद मिळवण्यासाठी
स्वारस्य किंवा कामाचे क्षेत्र.
2. दिलेले प्रश्न दोन प्रकारचे आहेत- मल्टी-सिलेक्ट आणि सिंगल-सिलेक्ट-प्रश्न.
3. बहु-निवडक प्रश्न, ज्यात तुम्ही राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP),
2020 च्या शिफारसी आणि दृष्टीकोनाच्या अंमलबजावणीसंदर्भात
अनेक दृष्टीकोन आणि पुढाकार शोधण्याच्या उद्देशाने एकापेक्षा जास्त पर्याय निवडू शकता.
४. एकल-निवडक प्रश्न ज्यामध्ये तुम्हाला फक्त एकच पर्याय निवडावा लागेल
ज्याचा उद्देश भागधारकांचे विचार आणि दृष्टीकोन समजून घेण्यासाठी एखाद्या
मुद्द्यावर केंद्रित प्रतिसाद मिळवणे आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० pdf Download करण्यासाठी खलील लोगोला टिचकी मारा 



5. प्रश्न चार भागांमध्ये विभागले गेले आहेत जे चार संच बनवतात जेणेकरून आपण आपल्या
कार्यक्षेत्र किंवा आवडीच्या क्षेत्रासाठी आपल्या आवडीनुसार आणि आवडीनुसार आपला संच निवडू शकता आणि संबंधित संचामध्ये दिलेल्या प्रश्नांना उत्तर देऊ शकता. तथापि, आपणास विनंती केली जाते की सर्व
क्षेत्रातील शक्य तितक्या चार संचांमध्ये प्रत्येक प्रश्नाला आपले मौल्यवान प्रतिसाद द्या. तुमचे प्रतिसाद
आम्हाला ट्रेंड आणि संदर्भ प्रदान करतील, जे दर्जेदार शालेय शिक्षण, बालपण काळजी
आणि शिक्षण,शिक्षक शिक्षण आणि प्रौढ शिक्षणासाठी एक रोड मॅप तयार करण्यात मदत करतील.
सर्वेक्षणात मिळालेले प्रतिसाद एकूण स्वरूपात वापरायचे आहेत, एखाद्या व्यक्तीचा प्रतिसाद
म्हणून नाही.
प्रश्नांची वर्गवारी:
शालेय शिक्षण- प्र. 1-50
लवकर बालपण काळजी आणि शिक्षण- प्र. क्र. 51-60
शिक्षक शिक्षण- प्रश्न क्रमांक 61-90
प्रौढ शिक्षण- प्रश्न क्रमांक 91-100 


अंमलबजावणी बाबत आपल्या काही शंका / अभिप्राय / शिफारशी देवू शकता.




राज्य अभ्यासक्रम आराखडा  SCF 

State Curriculum Framework

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मिती - तज्ज्ञ निवड


       नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत राज्य अभ्यासक्रम  आराखडा तयार करण्यात येणार आहे. राज्य  अभ्यासक्रम  आराखडा विकसित करतानाच २५ पोझिशन पेपर तयार  करण्यात येणार आहेत. 

          नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मितीची प्रक्रिया सर्वसमावेशक व राज्यातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्या समवेत तयार करण्यात येणार आहे.  

१. राज्य अभ्यासक्रम आराखडा-शालेय शिक्षण  
२. राज्य अभ्यासक्रम आराखडा- बालपणातील काळजी व शिक्षण   
3. राज्य अभ्यासक्रम आराखडा- शिक्षक शिक्षण 
४. राज्य अभ्यासक्रम आराखडा -  प्रौढ शिक्षण
उपरोक्त नमूद प्रमाणे चार राज्य अभ्यासक्रम आराखडे व २५ पोझिशन पेपर विकसित करण्यासठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मधील प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, अध्यापक विद्यालयातील प्राचार्य  व  अध्यापकाचार्य,  शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, विषय तज्ज्ञ, विशेष तज्ज्ञ, केंद्रप्रमुख,  प्राथमिक / माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक तसेच विद्यापीठातील प्राध्यापक, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, शासनाच्या विविध विभागातील अधिकारी, अशासकीय संस्थांचे  सदस्य या मधील इच्छुक  तज्ज्ञांचे सहकार्य घेतले जाणार आहे. 


तरी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा, पोझिशन पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेऊन योगदान देण्याची इच्छा व आवश्यक तज्ज्ञत्व असणाऱ्यांनी  खालिल  










  या वेबसाईटवर  आवेदन करावे.  सदर आवेदन पत्र भरण्याची अंतिम तारीख १७.०९.२०२१ आहे. 

           अर्ज केलेल्या तज्ज्ञांमधून विहित पद्धतीने आवश्यक तज्ज्ञांची निवडप्रक्रिया सदर कार्यालयामार्फत पार पाडण्यात येईल व निवड झालेल्या संबंधिताना इमेल/पत्राद्वारे पुढील प्रक्रियेबाबत सूचित करण्यात येईल. 

             तरी याबाबत आपल्या अधिनस्त असणा-या कार्यक्षेत्रातील इच्छुक तज्ज्ञ व्यक्तींना उपरोक्त वेबसाईटवर अचूक माहिती  भरण्याबाबत अवगत करण्यात यावे.   
                                

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon