DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

जागतिक पर्यावरणावर आधारित चाचणी सोडवा World Environment Day Quiz

World Environment Day Quiz

जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जगभर ५ जून रोजी साजरा केला जातो

जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा उद्देश काय?

विकासाबरोबरच जगभरात पर्यावरणाचीही हानी होत आहे. जंगले नष्ट होत आहेत. नद्या-नाल्यांचे प्रवाह बदलले जात आहेत. त्यामुळे जगभरात प्रदूषणाची पातळी वाढत आहे. वाढते प्रदूषण आणि निसर्गाचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी जनजागृती मोहिम राबवण्यासाठी पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिवशी लोकांना पर्यावरणाबाबत जागरूक केले जाते. निसर्गाला प्रदूषित होण्यापासून वाचवा, असे आवाहन नागरिकांना केले जात आहे.

2023 जागतिक पर्यावरण दिनाची थीम

 ‘बीट प्लास्टिक पॉल्यूशन’ 

इतिहास काय सांगतो ?

जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्टॉकहोम कॉन्फरन्स ऑन द ह्यूमन एन्व्हायर्नमेंट (५ जून १९७२) येथे केली

पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन पहिल्यांदा 1972 साली संयुक्त राष्ट्र संघाने पर्यावरण दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून 5 जून हा पर्यावरण दिन जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने जरी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याची घोषणा केली असली, तरी पहिल्यांदाच स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे 5 जून 1972 रोजी पर्यावरण परिषद झाली होती.

अलिकडील वार्षिक थीम आणि प्रमुख उपक्रम आणि यजमानपद

2020 थीम - "निसर्गासाठी वेळ" 

2021थीम - "इकोसिस्टम रिस्टोरेशन"

2022 थीम - "फक्त एक पृथ्वी"  

2023 थीम - ‘बीट प्लास्टिक पॉल्यूशन

2024 थीम -'भूमि बहाली, मरुस्थलीकरण और सूखा सहनशीलता'


"पर्यावरण संवेदनशील व सजग" भावी पिढीच्या निर्माणाकरिता राज्यातील ७५०० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये आठवडयातील नियमित तासांव्यतिरिक्त तीन तास निसर्गाच्या सांनिध्यात प्रत्यक्ष सहभागातून उपक्रम, कृतिकार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातील ७५०० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये "पर्यावरण सेवा योजना" Environmental Service Scheme (ESS) राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेची रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे :- वाचण्यासाठी किंवापीडीएफमध्ये डाऊनलोडसाठी या ओळीला स्पर्श करा

जागतिक पर्यावरण दिन प्रश्नमंजूषा सोडविण्यासाठी 
CLICK HERE   

 

जागतिक पर्यावरण दिन प्रश्नमंजूषा सोडवा आणि महारष्ट्र  शासनाचे  प्रमाणपत्र प्राप्त करा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

हेही वाचा 

 जागतिक पर्यावरण अभियान  UNESCO CLUB'S and Association of INDIA PLANT A TREE - NATIONAL CAMPAIGN 2021वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon