DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना सरल प्रणालीत इ ९ वी मध्ये किती गुण भरले / मिळाले ते कसे चेक करावे ?

         इयत्ता १० च्या परीक्षा – २०२१  कोरोना-१९ च्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आलेल्या आहेत इयत्ता, दहावीचे मूल्यमापन करण्यासाठी दहावी विधागीय मंडळाने एक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे त्यामध्ये आपल्याला इयत्ता दहावीच्या  विद्यार्थ्यांचे गुण भरायचे आहेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कशा प्रकारे करायचे याचे परिपत्रक अगोदरच  बोर्डाकडून आपल्याला प्राप्त झाले आहे तुम्ही सदरील परिपत्रक वाचले नसतील तर खाली दिलेल्या लिंक वरून ते परिपत्रक वाचू शकता 

इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचे ‘असे’ होणार मूल्यांकन

इ. ९ वीचा विषयनिहाय अंतिम निकाल १००  गुणांचे - ५० गुणात रूपांतर

इ. १० वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन १०० गुणांचे – ३० गुणात रूपांतर

इ. १० वी चे अंतिम तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत - २० गुण 

या प्रमाणे आपल्याला गुणांचे मूल्यमापन करायचे आहे

     नववीचे १००  गुणाचे रूपांतर ५०  गुणांमध्ये करतेवेळेस सरल प्रणाली मध्ये नोंदवलेले गुण आणि आपण संगणक प्रणाली मध्ये  भरणार असलेले गुण हे दोन्ही सारखेच असले पाहिजे असे परिपत्रकात म्हंटले आहे, आणि त्याची पडताळणी विविध पथकांद्वारे केली जाणार आहे.त्या मुळे गुण काळजीपूर्वक भरावे .

        लक्षात घ्या सरल प्रणालीत फक्त एकूण गुण बघता येतात आपल्याला विषयनिहाय गुण भरायचे आहेत. विषय निहाय गुण आपल्याला मागील वर्षीच्या निकाला वरून भरायचे आहेत, सरल प्रणालीत भरलेले एकूण गुण व आपल्या वार्षिक निकालातील एकूण गुण सारखेच असले पाहिजे.कारण आपण भरलेले गुण हे सरल प्राणलीतील गुणांद्वारे पडताळणी केली जाणार आहे परिपत्रकानुसार !

त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम स्टुडंट पोर्टल वर जाऊन लॉगिन करायचे आहे 

लॉगिन करण्यासाठी Click Here 


अधिक माहिती साठी खालील व्हिडिओ बघा

विद्यार्थ्याची आधार नोंदणी व अद्यावतीकरण आणि आधार क्रमांक  

Student Portal वर अद्यावत करणे बाबत 

इयत्ता १० वी ची होणार २०० गुणांची परीक्षा ?

कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर दहावीची २०० गुणांची परीक्षा शालेय शिक्षण विभागाकडून लवकरच प्रस्ताव

        इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या पद्धतीने जाहीर करावा याबाबत केवळ चर्चा सुरू असली तरी कोरोना मुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्णपणे निवडल्यानंतर विद्यार्थ्यांची शंभर ते दोनशे गुणांची परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे तसेच यासंदर्भातील प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले कोरोना पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या सीबीएसई बोर्डने सुद्धा दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत गुणाच्या आधारे जाहीर करण्याचे निश्चित केले परंतु राज्य शासनाने स्थापन केलेल्या समितीकडून केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत काय करायचे याबाबत चर्चा सुरू आहे परंतु विद्यार्थ्याकडे इयत्ता दहावीची परीक्षा दिल्याचे काहीतरी प्रमाणपत्र असावे त्यामुळे शालेय शिक्षण विभागाकडून सर्व विषयावर आधारित शंभर ते दोनशे गुणांची एकच परीक्षा घेण्याचा विचार केल्या जात आहे कोरोना मुळे विद्यार्थी सध्या परिस्थिती परीक्षा केंद्रावर येऊन परीक्षा देऊ शकत नाहीत त्यामुळे कोरोणाची परिस्थिती निवळल्यानंतर सुमारे दोन तासाची बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित परीक्षा घेण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून चाचपणी केली जात आहे या परीक्षेत मिळालेले गुण हीच विद्यार्थ्यांची इयत्ता दहावीची गुणपत्रिका असणार आहे असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप याबाबत कुठलाही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. 


हे ही वाचा 




साभार दैनिक लोकमत न्यूज नेटवर्क 



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon